Showing posts with label अ. Show all posts
Showing posts with label अ. Show all posts

Aaipan De Re आईपण दे रे

आईपण दे रे, देवा, नवस किती करू ?
फूल वेलीला येऊ दे, एक होऊ दे लेकरू

वांझपणाचं औक्ष असून नसून सारखं
बाळावाचुनिया घर सर्व सुखाला पारखं

बाळा अंगीच्या धुळीनं ज्यांची मळतात अंगं
त्यांच्या होऊन दुनियेत कोण भाग्यवंत सांग

Lyrics - ग. दि. माडगूळकर
Music - श्रीनिवास खळे
Singer - कृष्णा कल्ले
Movie - जिव्हाळा

आस तू भास तू ताल तू Time Please - Aas tu bhas tu taal tu

Aas tu bhas tu taal tu
khulalelya swasancha 
Padsaad othi swasanche
Swasat maunache
Maunaat khulati aaj nave
Hey artha sparsha che 
 

Antari bebhan chandanyachi raat ka
Sangate bhijalelya papnyache goj ka
Ka hur uthate mani ka
Rang galas ka ho
Chimb aangavari ka shahara
Jeev hoi janu kajava
 
Padasaad sparshat maunache
Maunaat swasanche
Swasat rujati artha nave
haluvaar othanche
 
Asa tu bhas tu taal tu
khulalelya swasancha raat tu
Preet tu artha tu mitalya othancha

 

आस तू भास तू  ताल तू  
खुललेल्या स्वपनांचा  
पडसाद ओठी श्वासांचे 
श्वासात मौनाचे 
मौनात खुलती आज नवे हे
अर्थ स्वप्नांचे  
 
अंतरी बेभान चांदण्याची रात का 
सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का  काहूर उठते मनी का 
रंग गालास का 
हो चिंब अंगावरी का शहारा  
जीव होई जणू काजवा  

 
पडसाद स्पर्शात मौनाचे 
मौनात स्वप्नाचे 
श्वासात रुजती अर्थ नवे
हळुवार ओठांचे  


आस तू भास तू  ताल तू
खुललेल्या स्वपनांची रात तू
प्रीत तू  अर्थ तू मिटल्या ओठांचा 

Movie: Time Please - Lovestory Lagnananterchi टाइम प्लीज - लव्हस्टोरी लग्नानंतरची  
Singer(s) : Swapnil Bandodkar, Bela Shende स्वप्नील बांदोडकर , बेला शेंडे 
Music : Rishikesh Kamerkar ऋषीकेश कामेरकर


सूर्यदेव आला Suryadev Ala



आभाळानं उघडला सोनियाचा डोळा
निळ्यानिळ्या अंगणात सूर्यदेव आला

कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जाग
गोठ्यामधे बोलाविते गाय वासराला

झाली तुळशीची पूजा, गाव लागे कामकाजा
दूरिताला पुण्याईचा मिळाला उजाळा

अज्ञात तीर्थयात्रा,Adnyat TeerthaYatra

अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गूढ वरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती

काही खरे न येथे ही राख सत्य आहे
बाजार बाहुल्यांचा आभाळ फक्त पाहे
सारे झरे सुखाचे दुखा:कडेच वळती

हा ऊन-सावल्यांचा उकलेल गोफ का हो
डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो
नावा रित्याच येती आणि रित्याच जाती

अहो सजना दूर व्हा,Aho Sajana Dur Vha

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडी गोडीत तुम्ही फिरवता पाठीवरती हात

याचा बोभाट होईल उद्या
मला लौकर घराकडे जाऊ द्या
अहो सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या !


अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठुन तुम्ही इथं धावला
आहे तस्साच काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडं जाऊ द्या !

तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी नणंदेची झोपडी
आहे तस्संच येणं जाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या !



अहो इथं मांडिला इष्कबाजीचा,Aho Ithe Mandila

अहो इथं मांडिला इष्कबाजीचा श्रृंगाराचा हाट
मोल पुरेसे मोजा आणिक खुशाल लावा हात

माल मांडला नवा नवा, गाल नरम जणू गरम खवा
हा ओठांचा शराब पेला भरला काठोकाठ !

नारिंगाची रसाळ जोडी, बघा रसरसते तयात गोडी
तुमचे जपतप फळास आले, सुबक तयाचा घाट !

मदन धनूसम भुवई छान, लखलखते नयनांचे बाण
काय हवे तुज बोल राजसा ! नको उद्याची बात !

अहा भारत विराजे,Aha Bharat Viraje

अहा भारत विराजे, जगा दिपवीत तेजे

भादव्यात येती गौरी गणपती उत्सवा येई बहार
मेळे आरास करोनी, गाती नाचुनी हसुनी
ध्वनी त्यातहि गाजे, अहा भारत विराजे

नवरात्र पूजेची आश्विनशोभा करिती नारी शृंगार
लेऊनि वसने मजेदार गळा विविध अलंकार
ध्वनी त्यातुनि निनादे, अहा भारत विराजे

आली दिवाळी भुवन उजळी आनंद घे अवतार
दीपक नभीचे भूवरी येती दाविती शोभा अपार
मुदित हृदय सजती करिती सकलजन विहार
माला तोरणे फुलांची, वसने भूषणे जनांची
शोभा पाहुनी धरेची, मनी स्वर्गही लाजे
अहा भारत विराजे



अहो अहो कारभारी हो,Aho Aho Karabhari Ho

अहो अहो कारभारी हो कारभारी
मध्यान्‌ रात्री कुठं चालला गुमान या तुम्ही माघारी

अग ल ... ल ... लंका, नको श ... शं ... शंका
अडवू नको मला तू युक्तीनं
हातात टाळ, ग ... ग ... गळ्यात माळ

भ ... भ ... भजनाला जातोय भक्तीनं
इठोबा रखुमाई भजन करता, तहाभूक हरतीया भा ... भा ... भादरणी

नका काढू शक्कल, हाये मला अक्कल, तमाशाला चललाय्‌ कुठं ?
घरची भाकरी सोडून भायेर उकिरडा फुकताय तिथं

तमाशाला न्हाई .....

मग संगती येते, खरंखोटं पहाते, बसून तुमच्या शेजारी

आता कुठं जातो, कॅ ... कॅ ... कॅन्सल करतो
कुठल्या कुठं मी झ ... झ ... झक मारली

अहो खुशाल जावा, जीव तुमी लावा, म्हायेरची मी वाट धरली

पाया पडतो, हात जो ... जो ... जोडतो
करू नको उलटी अं ... अं ... अंबारी
अगं अगं कारभारणी ग कारभारणी

अस्मिता,Asmita

सावलीही अशात हसते
ठावठिकाणा माझा पुसते
मीच मला मग शोधत बसते

बोल मला तू हळुवार काही
सांग भले तू माझा नाही
कलीयुगातली मी मीराबाई

मौनातले हे शब्द बोलके
तुझ्या नि माझ्या ओठी हलके
असुनि नयनी अश्रू पोरके

क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा

देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....

जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती
होती सच्ची माझी प्रीति

क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....

असंभव,Asambhav

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥

दिवसामागून रात्र धावते सकाळ-संध्याकाळ
सूत्रधार जो या साऱ्याचा नाव तयाचे काळ
काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा

क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव !



असेन मी नसेन मी,Asen Mi Nasen Mi

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे

स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे

कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे

असेच हे कसेबसे,Asech He Kasebase

असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे ... नसायचे.

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका;
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.

असाच हा श्वास तोकडा

पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.

असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.

असावे घर ते अपुले छान,Asave Ghara Te Apule Chan

असावे घर ते अपुले छान

पुढे असावा बागबगीचा
वेल मंडपी जाई जुईचा
आम्रतरूवर मधुमासाचा
फुलावा मोहर पानोपान

संगमरवरी ती पुष्करणी
त्यात असावे गुलाबपाणी
पाण्यामधुनी कारंजाची
फुटावी सुरेल सुंदर तान

फुलासारखे मूल असावे
नित्य चांदणे घरी हसावे
तीर्थरूपे ओवाळावे
अपुले जीवन पंचप्राण



असावा सुंदर चॉकलेटचा,Asava Sundar Chocolatecha

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

असावा असा सुखी संसार,Asava Asa Sukhi Sansar

असावा असा सुखी संसार
आनंदच जणु नांदे घेऊन घरट्याचा आकार

पहाट उठते गुंजत गाणी
गात गात ही दिवेलागणी
आल्या अतिथ्या मूठभर देई अन्न उदार दुपार
असावा असा सुखी संसार

दिसते ते ते येथे निर्मळ
बोल उमटतो तो तो मंजूळ
खिडकीपाशी म्हणून थबकतो वारा वारंवार
असावा असा सुखी संसार


धनीण घरची सुरेख हसरी
प्रीत धन्याची फार तिजवरी
उद्योगाने उजेड उजळे स्वप्न बघे अंधार
असावा असा सुखी संसार

असाच यावा पहाटवारा,Asach Yava Pahat Vara

असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा

अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा
मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा
हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा

भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधूर स्वराने
हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा

प्रशांततेवर कुणि स्मिताची रेघ अशी रेखावी
मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी
लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर विहरावा

झुळझुळणाऱ्या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी

मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी
तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा

असा हा एकच श्रीहनुमान्,Asa Ha Ekach Shri Hanuman

तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्‌

भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुडाहुन बलवान्‌

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्‌

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्‌

बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्‌

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें

कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्‌

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्‌

शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपे दिनमणी
चिरतर आयुष्मान्‌

करि हनुमन्ता, निष्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा

उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण

असा मी काय गुन्हा केला,Asa Mi Kay Gunha Kela

कळेना अजुनी माझे मला
असा मी काय गुन्हा केला ?

हितगूज केले ज्या नयनांनी
त्या नयनांतुनि येई पाणी
दोन जीवांची प्रीतही रुसुनी
गेली सोडुनि आज अम्हाला

जागे होता घाव अंतरी
नको नको ते येई पदरी
दुःख प्रीतीचे सांगावे तरी
जनरूढीची भीड मनाला

सुखशांतीला फितुर होऊनी
दैवहि माझे गेले निघुनी
उभी एकटी वेड्यापरि मी
काय विचारू कसे कुणाला ?

असा नेसून शालू हिरवा,Asa Nesun Shalu Hirava

असा नेसून शालू हिरवा, आणि वेणीत खुपसून मरवा
जाशी कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे पुढे ?

का रे वाटेत गाठून पुसशी, का रे निलाजऱ्या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे, तुला सांगते
त्याची माझी रे प्रीत जडे

तुज परी गोरी गोरी, चाफ्यावानी सुकुमारी
दुपारचा पार ऊन जळते, ग वर ऊन जळते

टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठठेव, तिला कळते रे तिची तिला कळते


का ग आला असा फणकारा, कंकणाच्या करीत झणकारा
जाते कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे पुढे ?

दूर डोंगरी घुमते बासरी, चैत्र बहरला वनामधी
पदर फडफडतो, ऊर धडधडतो, प्रीत उसळते मनोमनी
मी भल्या घरातील युवती, लोक फिरतात अवती भवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे, खरं सांगते
म्हणून बघते मी मागे-पुढे



असा कसा देवाचा देव,Asa Kasa Devacha Dev

असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।
देव एका पायाने लंगडा ॥१॥

शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो ।

करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥

वाळवंटी जातो कीर्तन करितो ।
घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥


एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई ।
देव एकनाथाचा बछडा ॥४॥