Showing posts with label M-यशवंत देव. Show all posts
Showing posts with label M-यशवंत देव. Show all posts

हे आदिमा HE ADIMA

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले
कल्पद्रुमा

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले
कल्पद्रुमा

या मातीचे आकाश तू
शिशीरात या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरोषोत्तमा

या मातीचे आकाश तू
शिशीरात या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरोषोत्तमा

देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परी तू क्षमा

देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परी तू क्षमा

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले
कल्पद्रुमा


Lyrics -वसंत निनावे VASANT NINAWE
Music -यशवंत देव, YASHAVANT DEV
Singer -रामदास कामत RAMADAS KAMAT

दूर कुठे चंदनाचे DUR KUTHE CHANDANACHE

दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते ग मला कळते!

जाळ धावूनिया येता होरपळे अंग
शीतलशा सुगंधाने निवे अंतरंग
सुखावते कधी, कधी तळमळते
तुला कळते ग मला कळते!

दैवदत्त शाप आहे चंदनाच्या बना
जळल्यावाचून त्याचा उभा जन्म सुना
दु:खभोग भोगताना मुक्‍ती मिळते
तुला कळते ग मला कळते!

तुलामला चंदनाचा जन्म लाभला
अशा चंदनपणाला जीव लोभला
उगाळता, जळताही दरवळते
तुला कळते ग मला कळते!


Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAE
Music -यशवंत देव YASHAWANT DEV

देवा तुझा मी सोनार DEVA TUZA MI SONAR

देवा तुझा मी सोनार ।

तुझे नामाचा व्यवहार ॥१॥

मन बुद्धीची कातरी ।

रामनाम सोने चोरी ॥२॥

नरहरी सोनार हरीचा दास ।

भजन करी रात्रंदिवस ॥३॥

Music -यशवंत देव  YASHAWANT DEV
Singer -रामदास कामत RAMDAS KAMAT
Movie / Natak / Album -जौनपुरी JAUNPURI

गेलीस सोडुनी का GELIS SODUNI KA

गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी ?

अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी

देवी तुझ्याविना मी देहा धरू कशाला ?

नारीविना जगी ना सामर्थ्य पौरुषाला

अर्धांग भस्म झाले, अर्धाच मी, अभागी

अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी

विसरू कसा सखे मी आनंद भोगलेला ?

घर शैल कंदरीचे गिरीशीर्ष चंद्रशाला

संसार सौख्यदायी सहवास सप्तरंगी

अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album - 'शिवपार्वती' SHIVPARWATI

ही कनकांगी Hi kankangi

ही कनकांगी कोण ललना

सौंदर्याचे हे आवाहन चित्राची प्रेरणा ॥

भ्रमर मनाचा स्मृतिसुमनी रत

मानसमूर्ती करी चित्रांकित

शांत कमलनयना ॥

Lyrics -शांता  शेळके SHANTA SHELAKE
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -प्रसाद सावकार PRASAD SAVAKAR
Movie / Natak / Album -घन:श्याम नयनी आला GHAN SHYAM NAYANI AALA

पक्षिणी प्रभाती PAKSHINI PRABHATI



पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पिलू वाट पाहे उपवासी
पिलू वाट पाहे उपवासी
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये

तैसे माझे मन धरी वो तुझी आस
तैसे माझे मन धरी वो तुझी आस
चरण रात्रंदिवस चिंतीतसे
चरण रात्रंदिवस चिंतीतसे
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये

तान्हे वत्स घरी बांधिलेसे देवा
तान्हे वत्स घरी बांधिलेसे देवा
तान्हे वत्स घरी बांधिलेसे देवा
त्या हृदयी धावा माऊलीचा
त्या हृदयी धावा माऊलीचा
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये

नामा म्हणे देवा तू माझा सोयरा
नामा म्हणे देवा तू माझा सोयरा
झणी मज अव्हेरा अनाथनाथा
झणी मज अव्हेरा अनाथनाथा
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये

पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पिलू वाट पाहे उपवासी
पिलू वाट पाहे उपवासी
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये




Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -सुमन कल्याणपूर SUMAN KALYANPUR
Movie / Natak / Album -भावगीत BHAVGEET

तुझ्या एका हाकेसाठी TUZYA EKA HAKESATHI

तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट
माझी अधीरता मोठी तुझे मौन ही अफाट

तुझ्या एका हाकेसाठी उभी कधीची दारात
तुझी चाहूल ही नाही होते माझीच वरात

तुझ्या एका हाकेसाठी हाक मीच का घालावी
सातसुरांची आरास मीच मांडून मोडावी

आले दिशा ओलांडून दिली सोडून रहाटी
दंगा दारात हा माझा तुझ्या एका हाकेसाठी

Lyrics - पद्मजा फेणाणी जोगळेकर PADMAJA FENANI JOGALEKAR
Music -यशवंत देव YASHWANT DEV
Singer -यशवंत देव YASHWANT DEV
Movie / Natak / Album -ही शुभ्र फुलांची ज्वाला HI SHUBHR FULANCHI JWALA

नकोनको रे पावसा NAKONAKO RE PAWASA

नकोनको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन

Lyrics -इंदिरा संत INDIRA SANT
Music -यशवंत देव YASHWANT DEV
Singer-पुष्पा पागधरे PUSHPA PAGADHARE

आठव येतो मज AATHAV YETO MAJ

आठव येतो मज तातांचा
मम मातेच्या मृदू हातांचा

आठवते मज नगर आमुचे
स्मरण एक ते बाळपणाचे
मम भगिनीचे, बंधु-जनांचे
वीट येई या एकांताचा
आठव येतो मज तातांचा

प्रजापतीच्या प्रासादाची
शिखर-गोपुरे जांबूनदाची
आत नांदणूक आनंदाची
सदा महोत्सव स्मीतहास्याचा
आठव येतो मज तातांचा

इथे न सासू नसे सासरा
प्राणप्रीय मी जरी शंकरा
तरीही होतो जीव बावरा
ध्यास लागतो माहेराचा
आठव येतो मज तातांचा

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADAGULAKAR
Music -यशवंत देव YASHAVANT DEV
Singer -आशा भोसले AAHA BHOSALE

मान वेळावूनी MAN WELAWUNI

मान वेळावूनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलु नको
ऐक माझे जरा हट्ट नाही खरा
दॄष्ट लागेल गं ,दॄष्ट लागेल गं,दॄष्ट लागेल गं
मान वेळावूनी धुंद बोलू नको

आज वारा वने ,रेशमाचा झुला
ही खुशीची हवा ,साद घाली तुला
मोर सारे तुझे ,हे पिसारे तुझे
रूप पाहून गं,लाजेल चंद्र गं 
दॄष्ट लागेल गं ,दॄष्ट लागेल गं,दॄष्ट लागेल गं

पाहणे हे तुझे चांदण्यांची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी ,
लाट मोठी तुटे शीड माझे फुटे
ही दिशा कोणती ,कोण सांगेल गं
कोण सांगेल गं ,दॄष्ट लागेल गं



Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव  YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

हिरव्या तरूराजीत तिथे HIRYA TARURAJIT TITHE

हिरव्या तरूराजीत तिथे उभी राहशील कां
 हासत होतीस पूर्वी तशी पुन्हा हासशील कां 

किलबिल तिथल्या पानोपानी फुलसारखे कोमल पानी 
वनराणी होऊन तिथे मला पाहशील कां

दे शब्दाची उधळून दौलत पूर्ण कधीही नाही उमलत
अबोध ते मौनातुन तु मला सांगशील कां 

हसरे सुंदर डोळे जडवून निळ्या जळापरी  अथांग होऊन
कधी न सुटणारे कोडे पुन्हा घालशील कां 



Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

रडतच आलो येताना RADATACH AALO YETANA

रडतच आलो येताना,पण हासत जावे जाताना
अंगावर आसुड विजेचे ,झेलून घेती घन वर्षेचे ,
सार्थक झाले कोसळण्याचे तृपित धरित्री न्हाताना

हासत हासत ज्योती जळाली ,काळोखाची रात्र उजळली ,
पहाट झाली तेव्हा नव्हती ,तेजोमय जग होताना

बीज आतुनी फुटुनी गेले ,वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलूनी घेताना

कुणी दू:खाचा घोट घेतला खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दू :खाचे झाले गाणे जीव उधळुनी गाताना

Lyrics -मंगेश पडगांवकर  MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

लागे ना लागे ना रे LAGE NA LAGE NA RE

लागे ना लागे ना रे
थांग तुझ्या ह्रद्याचा

लागे ना लागे ना रे
थांग तुझ्या ह्रद्याचा

शांत किनारयापरी पाहसी

शांत किनारयापरी पाहसी

खेळ धुंद लहरीचा
लागे ना लागे ना रे थांग तुझ्या ह्रदायिचा

कितिका लाटा धावत येती
आपुले हितगुज सांगू पाहती
भाव तुझ्या परी मुद्रेवरती
अबोल पाषाणांचा
लागे ना लागे ना रे
तुला न दिसते ,तुला न कळते
तुझ्यात किती मी रंगून जाते
धरशील का रे माझ्यासंगे
सुर प्रेम गीतांचा
लागे ना लागे ना रे

प्रेम भावना क्षणभराची
भुलच केवळ माझी तुमची
दोन पाखरे दुरावायाची \
काय नेम दैवाचा
लागे ना लागे ना रे
लागे ना लागे ना रे
थांग तुझ्या ह्रद्याचा

Lyrics -यशवंत पेठकर  YASHAWANT PETHAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -माझा मुलगा  MAJHA MULAGA

हरी आला ग माझ्या,Hari Aala Ga Majhya

लुटु लुटु धावत खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी

रुणझुणतो वाळा करी लाडिकचाळा
नाचे कान्हा ग माझ्या अंगणी

जाई जुई फुलली, जीवाची कळी कळी फुलली
बघ चिमण्या अधरी कशी ग बाई धरी चिमणी मुरली
ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी

बाल मुकुंद गुणी जणू सखे साजणी
ब्रम्ह सानुले उभे अंगणी

सुखवितो मधुमास,Sukhavito Madhumas Ha

सुखवितो मधुमास हा
मज दावितो नव आस हा ॥

दाह होता विफलतेचा
गूढ माझ्या जीवनी
यामिनीच्या तम विनाशा
लाभते सौदामिनी,
काय दैव विलास हा ॥

सारी भगवंताची करणी,Sari Bhagavantachi Karani

सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी

लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधुनि देतो
गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो
पतिता संगे पतीतपावन चालतसे अनवाणी

समुद्रात जरी अथांग पाणी तहान शमवि श्रावणधार
अन्न ब्रम्ह ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी

जिथे वाजतो घुंगुरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो
मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो
हात जोडुनी देव बोलतो शरण तुला गे जननी

सहस्त्ररुपे तुम्ही सदाशीव,Sahastra Roope Tumhi

सहस्त्ररुपे तुम्ही सदाशीव, श्रवणाशी बैसला
सांगतो परीसा शिवलिला

प्रसन्न हो मज हे वाग्देवी
व्यास महर्षे कृपा असावी
सुरस कथा ही सजीव व्हावी
श्रवणीचे सुख साध्य असावे, मना लोचनाला
सांगतो परीसा शिवलिला

स्थळ काळासह व्यक्ती-व्यक्ती
करोत नर्तन नयना पुढती
कथेने उपजो मनात भक्ती
रवी प्रभेसम विस्तारावा, आशय शब्दांतला
सांगतो परीसा शिवलिला

सर्वस्व तुजला वाहुनी,Sarvasva Tujala Vahuni

सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी

माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी

सब गुनिजन मिल गावो,Sab Gunijan Mil Gavo

सब गुनिजन मिल गावो बजावो ।
अपने मनको आप रिझावो ॥

शुभघरी शुभदिनी मंगल आज ।
सूरताल की महिमा गावो ॥

सजण दारी उभा,Sajan Dari Ubha

सजण दारी उभा, काय आता करू ?
घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?

मी न केली सखे, अजुन वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू ?

मी न दुबळी कुडी अजुन शृंगारिली
मी न सगळीच ही आसवे माळिली,
प्राणपूजा न मी अजुनही बांधिली;
काय दारातुनी परत मागे फिरू ?

बघ पुन्हा वाजली थाप दारावरी:
हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी;
तीच मी राधिका ! तोच हा श्रीहरी !
हृदय माझे कसे मीच हृदयी धरू ?