Showing posts with label L-पारंपारिक. Show all posts
Showing posts with label L-पारंपारिक. Show all posts

रुणझुण वाजंत्री वाजती,Runjhun Vajantri Vajati

रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती

नवरा आला वेशीपाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी

देईन येसकऱ्याचा मान
नवरी जिंकून नेईन

नवरा आला देवळापाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी

विडा देवाजी देईन
नवरी जिंकून नेईन

नवरा आला मांडवापाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी

मांडव खंडणी देईन
नवरी जिंकून नेईन

नवरा आला भोवल्यापाशी
नवऱ्या नवरी कशी नेशी

खण करवलीला देईन
नवरी जिंकून नेईन

तिळातांदळा भरली मोट
ज्याची होती त्याने नेली
वेडी माया वाया गेली

रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती

मी हाय कोली सोरिल्या,Mi Haay Koli Sorilya

मी हाय कोली सोरिल्या डोली, न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी

वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी
कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी
चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी
सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी

सर्गा नि हलवा ताजं हय्‌ म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय्‌ सोनेरी
घेरे काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
अरे कोली यो नाखवा दर्यानशी हाणताय म्हावरं सोनेरी

मी हाय कोली सोरिल्या डोली, न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी

मी हरणुली होईन,Mi Haranuli Hoin

मी हरणुली होईन !
चौखुर धावेन, मुरडत मिरवीन
तू परि येता वनि लपुनी तुज न गवसेन !

मी चांदणी होईन !
चमचम चमकेन, नटुनी नाचेन
तू परि येता नभी लपुनी तुज न गवसेन !

मी मासुळी होईन !
जळात खेळेन, शिंपली शोधेन
तू परि येता मोती बनुनी तुज न गवसेन !

मायेचा निजरूप आईचा,Mayecha Nijroop Aaicha

मायेचा निजरूप आईचा गोंधळ मांडला
गोंधळ मांडिला द्येवा गोंधळाला यावं

उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई

मोरेश्वर गडा गोंधळा यावे
वाईच्या गणपती गोंधळा यावे
कोल्हापूरची लक्ष्मी, पुण्याची पर्वती, सातारची मंगळाई गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

कृष्णा-कोयनामाई गोंधळा यावे
तुळजापूरची भवानी गोंधळा यावे
पसरणीच्या भैरीदेवा, नाशिकच्या काळ्या रामा, फलटणच्या रामा तुम्ही गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

म्हसवड सिद्धा गोंधळा यावे
रत्‍नागिरी जोतिबा गोंधळा यावे
करंदी येळुबाई, कवठ्याची यमाबाई, जुन्नरची शिवाबाई गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

वाडे-घोड्याची गोलाई गोंधळा यावे
साती समिंदरा गोंधळा यावे
नवलाख तारांगणा गोंधळा यावे
भरतारी माता नि आगाशी पिता नि ऱ्हाहिल्या साहिल्या भक्तांच्या गणा
तेहतीस कोटी देवा गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे
उदे उदे उदे उदे...

अंबाबाईच्या नावानं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
अहो कारणा कारण आम्ही गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे...

देवा कारणं भक्ता कारणं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
कुलस्वामिनी पुज्य देवता गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
तुज्या कारणं नमला लागून गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे...

डोंगराईच्या नावानं हो गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
कुलस्वामिच्या नावानं हो गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
यमाईच्या नावानं आम्ही गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे...

तुज्या कारणं भक्त धावला, गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
जुड्याजुड्यानं राज्य करावं, गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
तुम्हा कारणं नम्र होउन गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे...

चोळी-पातळ-लिंबू-नारळ गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
देवीच्या पूजेला बघा भगत धावला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
भगता कारणं आम्ही गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे...

पयलं नमन हो करितो,Payala Naman Ho Karito,

पयलं नमन हो करितो वंदन
पयलं नमन हो पयलं नमन
तुम्ही ऐका हो गुणिजन
आम्ही करितो कथन


अरे हो .....

पयलं नमन करुनी वंदन
इडा मांडून, इडा देवाला
इडा गावाला, इडा पाटलाला
आणि इडा मंडळिला

आम्ही सांगतो नमन
तुम्ही ऐका हो गुणिजन
पयलं नमन हो पयलं नमन
आम्ही सांगतो कथन
तुम्ही ऐका हो गुणिजन

अरे हो .....

विस्कटली हरा आम्ही घेत फुले
अज-गज-गौरीवर चवरी डुले
विस्कटली हरा आम्ही घेत फुले

लहान मुलं-मुली जमून चिमुकाली
खेळ भातुकलीचा खेळताना नकली
अकलेच्या चिखलात नेत्र खुले
विस्कटली हरा आम्ही घेत फुले

गणपती आला अन्‌ नाचुन गेला रं
गणपती आला अन्‌ नाचुन गेला
नटवार पार मांग झाला रं

गणपती आला अन्‌ नाचुन गेला

अरे हो .....

पयलं नमन हो करितो वंदन
पयलं नमन हो पयलं नमन

धन्य धन्य हो प्रदक्षिणा,Dhanya Dhanya Ho

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्‍गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरूनि काशी
मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती

कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला

श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला

घडी घडी घडी चरण तुझे,Ghadi Ghadi Charan Tujhe

घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा
आसनी शयनी भोजनी गमनी, छंद तुझा आम्हां

दृष्या तीच, पूर्णब्रम्ह, नित्य निर्विकारा
अंबुजदल, नयना, मुनि मानस विहारा

सर्वसाक्षी सर्वोत्तम, सर्व गुरुरूपा
प्रेमचित्ता, सौख्यसिंधू, दशरथकुलदीपा

मास दास भ्रात नाथ, तूच एक पाही
केशव म्हणे, करी कृपा शरण तुझ्या पायी

गंगा-जमुना दोघ्या,Ganga-Jamuna Doghya

गंगा-जमुना दोघ्या बयनी गो पानी झुलझुल व्हाय
दर्या किनारी एक बंगला गो पानी जाय-जुई-जाय

माशांनी मारलाय दनका गो पानी दलाला जाय
कोल्याची पोर एक सोबेची तया उबीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वाऱ्यानी जाय
अंगान्‌ चोली गझनिची पोरी ठुमकत जाय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय

आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, नवरीचा बापुस कवठं चोर
करवल्या खुइताना आंब्याच्या डांगल्या म्हायेरा जावालं सांजवलं

आंब्याची डांगली हलविली नवऱ्याने नवरीला पलविली

गोमू तुझे नादानं गो,Gomu Tujhe Nadana Go

गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला
गोमू तू होशील का होशील का होशील काय गो नाखवीन


गल्यान्‌ची बोरमाल तुला मी करीन
पायांचे वाले तुला मी हाणीन
होशील का होशील का होशील गावची पाटलीन
गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला

गोमू तुझे डोक्यानं गो ह्यो गजरा न्‌ पोरांच्या लागल्यान्‌ नजरा
गोमू आपले दोघांचा गो ह्यो जोरा न्‌ दिसेल सोबून बरा
माथ्यान्‌ जाईजुईचा ह्यो झेला, काय बोलतो ह्यो मेला
गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला

अंबर नंबर बोलते शंभर नंबर तुझे लुगऱ्याला
लागलाय्‌ डांबर तुझे लुग-याला लागलाय्‌ डांबर
आवर सावर मेल्या बघतंयस कवार पोरी जेसनन गो

हायेस सुंदर पोरी जेसनन गो हायेस सुंदर
तुझे चोलीला सोन्याची जर पोरी, चाललेन्‌ गो
पहिला नंबर पोरी चाललेन्‌ गो पहिला नंबर
तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला
गोमू तुझे नादानं गो नादानं गो नादानं बांधलाय्‌ बंगला

उठा उठा सकल जन,Utha Utha Sakal Jan

उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन
गौरीहराचा नंदन गजवदन गणपती

ध्यानि आणुनि सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती
तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ

जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां
त्यासी गाता भवभय चिंता, विघ्नवार्ता निवारी

तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरीधर भक्त त्याचा होऊनी