Showing posts with label S-किर्ती शिलेदार. Show all posts
Showing posts with label S-किर्ती शिलेदार. Show all posts

रे तुझ्यावाचून काही,Re Tujhyavachun Kahi

रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही ।
रे तुझ्यावाचून दुनिया दीन ही होणार नाही ॥

गर्व तव हा व्यर्थ, मी केले असे, केले तसे
चोच देई पाखरांना, तोच चारा देतसे
एकही घरटे तुझ्याविण मोडुनि पडणार नाही !

तानसेनावाचुनि, किंवा सदारंगाविण
काय मैफिल या जगाची रंगली केंव्हाच ना ?
कोण तू ? तुजवीण वीणा, बंदही होणार नाही !

मम सुखाचि ठेव,Mam Sukhachi Thev

मम सुखाचि ठेव, देवा, तुम्हापाशीं ठेवा;
ती स्मृतिवरि लिहावी, ममकारणे, जनकनांवा ॥

अखिलहि खर्चचि करि, आप्त-देव-धर्म-वैभवी;
वर अजि हा असा मला द्यावा ॥

भक्ताचिया काजासाठी,Bhaktachiya Kajasathi

भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी,
सोडली मी लाज रे ॥१॥

धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे ।
घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥

वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे ।
स्वाता भिल्लिनीची वोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥

दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो ।
आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्‌ची पेज रे ॥४॥

पुर्णब्रम्ह म्हणती माते, पुर्णब्रम्ह मींच त्यांते ।
ऐंसी याची जाणीव ते, म्हणे अमृतराय रे ॥५॥

बलमा आये रंगीले,Balama Aaye Rangile

बलमा आये रंगीले
रसीले बादल सावनके

नटखट चंचल नाचे बिजुरियाँ
गीत खुशीके गाये नदियाँ
आंचल हरियाला झलके

भीगी भीगी रातमें रसियाँ !
मिठी मिठी कि जै बतियाँ
कुंज कुंज महके !

दयाछाया घे निवारुनिया,Dayachaya Ghe Nivaruniya

दयाछाया घे निवारुनिया ।
प्रभु मजवरि कोपला ॥

जीवनासि मम आधार गुरु जो ।
तोहि कसा अजि कोपला ॥

कशि केलीस माझी दैना,Kashi Kelis Majhi Daina

कशि केलीस माझी दैना
मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना,

मला तुझ्या बिगर करमेना !

तू राघु तुझी मी मैना
माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना,
चैन पडेना, मला तुझ्या बिगर करमेना !

तू हकीम हो‍उनि यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक , मिठीचा लेप, मजसि सजणा,
मनमोहना, मला तुझ्या बिगर करमेना !

एकलीच दीपकळी मी,Ekalich Deepkali Mi

एकलीच दीपकळी मी अभागिनी
स्नेहाविण केवि जगू विजन काननी ?
माझिया न संगतीस या इथे कुणी
प्रेमास्तव तळमळते मी वियोगिनी !
देवा, मी ओवाळू प्रीतिने कुणा ?
कोणाला सांगावी मूक वेदना ?
काहीही अर्थ नुरे रुक्ष जीवनी !

एकला नयनाला विषय,Ekala Nayanala Vishay

एकला नयनाला विषय तो झाला ॥

सकलहि स्थानी अवघा भरला, न बघत इतरा डोळा ॥

अवयव सगळे नयनी जमले, यदुवर दिसता मजला ॥

अहो इथं मांडिला इष्कबाजीचा,Aho Ithe Mandila

अहो इथं मांडिला इष्कबाजीचा श्रृंगाराचा हाट
मोल पुरेसे मोजा आणिक खुशाल लावा हात

माल मांडला नवा नवा, गाल नरम जणू गरम खवा
हा ओठांचा शराब पेला भरला काठोकाठ !

नारिंगाची रसाळ जोडी, बघा रसरसते तयात गोडी
तुमचे जपतप फळास आले, सुबक तयाचा घाट !

मदन धनूसम भुवई छान, लखलखते नयनांचे बाण
काय हवे तुज बोल राजसा ! नको उद्याची बात !