Showing posts with label म. Show all posts
Showing posts with label म. Show all posts

मोहरला मधुमास Moharala Madhumas

मोहरला मधुमास
मानसी, घडता नित्य तुझा सहवास

तव स्पर्षाने गुलमोहर तो
अंगाअंगातुन बहरून येतो
नयनांमधली निळी मोहिनी करिते नित्य विलास

नसता कोणी हिरव्या रानी
गंधवतीला जवळ घेउनी
माझ्या भवती टाक मुलायम मृदुल करांचा पाश

Lyrics - P Sawlaram पी. सावळाराम
Music - Datta Davjekar दत्‍ता डावजेकर
Singer - Asha Bhosle आशा भोसले
Movie / Natak / Album - Soon Ladki ya gharchi सून लाडकी या घरची  

मी बोलु कुणा प्रभु सांगु कुणा Mi bolu kuna prabhu Sangu kuna

मी बोलु कुणा प्रभु सांगु कुणा
ही व्यथा मनाची तुझ्याविना

कळते न मला का दैव का छळी
फुलताच सुकावी सोनकळी
चुरली गळता अशी पायदळी
निर्माल्य असे हे वाहु कुणा

मी जाऊ कुठे नच वाट दिसे
कुणी सावरिता जगी होत हसे
हा संशय जीवित जाळित असे
जळताना हो संतोष जना

घायाळ जिवा आधार जरी
पुसती न आसवें कोणी तरी
तुजविण दुजे मज कोण हरी
तू तार-मार मज दयाघना

Lyrics - Raja Badhe राजा बढे
Music - M G Gokhale ‍एम्‌. जी. गोखले
Singer - Nirmala Gogate निर्मला गोगटे
Movie / Natak / Album -  

चल चल जाऊ शिणुमाला Chal Chal Jau Shinumala

मी न्हाई यायची शिणुमाला अवं मी न्हाई यायची शिणुमाला
चल चल जाऊ शिणुमाला आता चल ग जाऊ शिणुमाला

नगं शिणुमा, नाटक, गानं
घरात हाय हो माझं सोनं
बबडं लाडकं गोजिरवानं
उजळंल अपल्या जन्माला अवं मी न्हाई यायची शिणुमाला

चल चल जाऊ बाजाराला
चिरडी चिंगीला, रिडीब तुला
आईला साज, फटफटी मला
विंग्रजी बाजा सोन्याला ग चल चल जाऊ शिणुमाला

पै पैशानं रुपयं जमविलं
दोन बिघं रान आपन घेतलं
दुध-दुभतं बि घरात आलं
संसार अपला बहरा आला आता मी न्हाई जायची शिणुमाला

देव दयेनं पाऊस पडला
भाव गुळाला वाढून आला
घाटीव पेरं भुईमूग उठला
धरती सोनं राबंल त्याला अगं चल चल जाऊ शिणुमाला

Lyrics - Yogesh योगेश
Music - Ram Kadam राम कदम
Singer - Usha Mangeshkar, Jaywant Kulkarni उषा मंगेशकर ,  जयवंत कुलकर्णी
Movie - Sakhya Sajna सख्या सजणा

म्हातारा इतुका न अवघें,Mhatara Ituka Na Avaghe

म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान ।
लग्ना अजुनि लहान ॥

दंताजीचें ठाणें उटलें, फुटले दोन्ही कान ।
डोळे रुसले कांहि न बघती नन्ना म्हणते मान ।

तुरळक कोठें केस रुपेरी, डोईस टक्कल छान ।
भार वयाचा वाहुनि वाहुनि कंबर होय कमान ॥

काठीवांचुनि नेट न पाया परि मोठें अवसान ।
उसनी घेउनि ऐट चालतां काय दिसें तें ध्यान ॥

म्हणे यशोदा माझा,Mhane Yashoda Majha

म्हणे यशोदा माझा कान्हा, म्हणे देवकी माझा तान्हा
तो तर होता बाळरूप हरी, वैकुंठीचा राणा

सूर्यचंद्रही, कधि न मावळे, आनंदाचे इकडे गोकुळ
सुखदुखाचा पाऊस जेथे, मथुरा तिकडे वत्सल व्याकूळ
मधुनी वाहत भरूनी प्रेमळ, ती मायेची जमुना

देठावरची दोन फुले, तशी मायेची ती दोन मने
दो आईच्या या बाळाला, काय कमी हो काय उणे ?
विश्वमाऊली घेत चुंबने, पाजित अमृत पान्हा

नक्षत्रांचे राघुमोर ते, झुले पाळणा स्वर्गधरेचा
घुंगुरवाळा वाजत पायी, मेळ नाचत गौळणींचा
झोका आला तो मथुरेचा, नाव ठेवा कृष्ण म्हणा

म्हण भाबडी तू,Mhan Bhabadi Tu

म्हण भाबडी तू, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली

जीवास सदया तुझ्या लगटुनी
श्वासामाजी श्वास मिसळुनी
रुळत रहावा मानेवरुनी
मृदू रेशमी कर कर्दळी

तव बाहुंच्या क्षितीजामधले
जग दोघांचे मीच निर्मीले
डोळस माझे प्रेम आंधळे
जडले मन हे पडले गळी

पुरुष जातही फसवी बाई
म्हणणारे कुणी म्हणोत काही
फसव हवे तर तूच मला,
ही उडी घेतली मोहजळी

म्यां लोटिली संकटीं,Mya Lotali Sankati

म्यां लोटिली संकटीं ।
निष्कारण शारदा बिचारी,
मानिल मजसि महाकपटी ॥

बाल मृगी वृकमुखिंची ओढुनि ।
टाकियली दावाग्निंत झालीं ।
केविं ताप साहिल सुकुमारी एकटीं संकटीं ॥

मृदुल करांनी छेडित तारा,Mrudul Karani Chedit Tara

मृदुल करांनी छेडित तारा
स्मरते रूप हरीचे मीरा

कमलदलापरि मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरि
हर्षभराने तनुलतिकेवरि
पडती अमृतधारा

कालिंदीच्या नीलजलापरि
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तिरी
खुलवी प्रीत-फुलोरा

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभुचरणाची
मिटल्या नयनी धुंद मनाची
रंगवि हसरी मथुरा

मृगनयना रसिक मोहिनी,Mriganayana Rasik Mohini

मृगनयना रसिक मोहिनी ।
कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी ।
नवयौवनसंपन्न रम्य गतिविलासिनी ॥

आल्हादक मुखचंद्रहि होता ।
होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥



मेंदीच्या पानांवर,Mendichya Panavar

मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते ग

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग
हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा ग

अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग
अजुन तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळे ग



मुंबईची लावणी,Mumbaichi Lavani

मुंबई ग नगरी बडी बाका... जशी रावणाची दुसरी लंका... वाजतो ग डंका
डंका चहू मुल्की राहण्याला गुलाबाची फुल्की पाहिली मुंबई
मुंबई ग नगरी सदा तरनी व्यापार चाले मनभरुनी दर्याच्या गो वरुनी
वरुनी जहाजे फिरती आगबोटीत निराळी धरती पाहिली मुंबई
बोरीबंदर कोटकिल्ला टाटाच्या ग मैदानातला कमिटीचा बंगला देतो भेटीसरशी
ताजमहाल पॅलेस हाटेल तिथे तुला भेटेल त्याची इच्छभोजन मेजवानी मजेदारशी
सेक्रेटरी हॉल तुला काळाघोडा बहाल कुलाब्याच्या दांडीबाग ची हवा थंडगारशी
ट्रामगाड्या मोटारगाड्या हजार देतो खटारगाड्या व्हिक्टोरिया नव्या गाड्या रंगदारशी
लगबग भारी चाले गोंधळ सारा रस्त्यात मधे मोटारीची शिंग वाजे हित गर्दी
परळापासून सरळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा
तिथून पुढे खालचा लागल उभा पारशी
जमशोदजी बाटलीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बिना वारशी
बटाट्याची चाळ तुला कायम सांभाळ तिथं बांधुनिया चाळ मग ताल धरशी
अगं हे दाजी हे... अगं हे...हो हो... ईर... जी जी जी जी जी
पवळे जपून चाल ..... घाईघाईत होतिल हाल
धर हात सावरी तोल (हा पठ्ठे बापुचा बोल)
अगं ही मुंबई... पाहिली मुंबई...

मुंगी उडाली आकाशीं,Mungi Udali Aakashi

मुंगी उडाली आकाशीं ।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥

थोर नवलाव जांला ।
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥

विंचु पाताळाशी जाय ।
शेष माथां वंदी पाय ॥३॥

माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥

मंत्र वंदे मातरम्‌ हा,Mantra Vande Mataram Ha

या कळ्यांनो या फुलांनो या मुलांनो या जरा
मंत्र वंदे मातरम्‌ हा घोष गर्जा अंबरा !

आणिले स्वातंत्र्य आम्ही झुंजूनि शत्रूसवे
हाती तुमच्या देतसे ते शुभ नव्या भाग्यासवे
रक्षणे स्वातंत्र्य आता कार्य हे इतुके करा
मंत्र वंदे मातरम्‌ !

राहू द्या बंदूक तुमची सज्ज त्या शत्रूवरी
लक्ष असू द्या आईसम या थोर त्या शेतावरी
मातीतून त्या मोती पिकवा येउ द्या लक्ष्मी घरा
मंत्र वंदे मातरम्‌ !

शिवप्रभूचा लाभला हा आज तुम्हा वारसा
टिळक गांधी शास्त्री यांचा जीवनाचा आरसा
नेहरू अन्‌ इंदिराही सांगती या सागरा
मंत्र वंदे मातरम्‌ !

मंदिरात अंतरात तोच,Mandirat Antarat Toch


मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे

तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे

संताचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे

तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे

मंद मंद ये समीर,Mand Mand Ye Samir

मंद मंद ये समीर जागवीत आठवणी
विकसित मधु गंध बहर, स्वर्गसुखाच्या लहरी

झळझळती कळस दूर, येता परिसर जवळी
बघ रे बघ विरहार्ता, आली तव अवधपुरी

प्रिय बांधव स्वजन तात, भेटता दिठी दिठी
मातृदवता मदीय बघतिल डोळे भरुनी
सज्ज उभी स्वागतास माझी अयोध्या नगरी

मंथन,Manthan

दिला नियतीने स्त्री जन्माला विपरीतसा हा शाप जुना
ठायी ठायी दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा
स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर तेच कडु चार
पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळुवार
माणसातल्या देवपणाचा होतो तेव्हा साक्षात्कार
हाती येते नवनीत जेव्हा मंथन होते अपरंपार

मंगलदिनिं तन मन,Mangaldini Tan Man Dhan

मंगलदिनिं तन, मन, धन दान पदिं करीतें ।
सहाचरणसूचक हा कर करांत देतें ॥

स्वीकारुनि पत्निपदीं धन्य मज करावें ।
आर्यव्रत सेविन ही शपथ मीहि घेतें ॥

मंगल देशा पवित्र,Mangal Desha Pavitra

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥

मंगल ते प्रियधाम,Mangal Te Priyadham

मंगल ते प्रियधाम, या मना, ममता निर्झर
मातृहृदय ते चुंबचुंबिता ये अंगाई

वदन सुमांचा चुंबन मेवा, भान हिरावी
मोह माईना

मोहुनिया तुजसंगे नयन,Mohuniya Tujsange Nayan

मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार

ओठावरले हासे
फेकियले रे फासे
खेळाचा होय निकर हो जिवलग जादुगार

सहज पडे तुजसि दान
लागले पणास प्राण
मीपणात मन हरले, येइ रे गळ्यात हार

सारिलेस मोहरे
सहज अडविलेस चिरे
बंद जाहली घरे खेळ संपणार पार

पळभर जरि जुग जुळले
कटिवरुनी वरि सरले
एकुलती एक नरद पोटघरी होय ठार

पटावरुन लाजरे
पळे घरात मोहरे
बाजू बिनतोड मला देई चतुर हा खिलार