Showing posts with label L-सूर्यकांत खांडेकर. Show all posts
Showing posts with label L-सूर्यकांत खांडेकर. Show all posts

सहज सख्या एकटाच,Sahaj Sakhya Ekatach

सहज सख्या, एकटाच येइ सांजवेळी
वाट तुझी पाहिन त्या आम्रतरूखाली

हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
स्वप्नांना रंगवुया लेवुनिया लाली

अधरी जे अडत असे, सांगिन तुज गूज 'असे'
प्रीती ही प्रीतीविण अजुनही अबोली

तृणपुष्पे मोहक ती उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी

त्या फुलांच्या गंधकोषी,Tya Phulanchya Gandha

त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी हो‍उनीया गीत का ?
गात वायूच्या स्वरांने, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का ?

जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध का ?
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?

मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन्‌ त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?

उतरली सांज ही धरेवरी,Utarali Sanj Hi Dharevari

उतरली सांज ही धरेवरी
मी उभी घेउनी कलश करी

सांज मनी दरवळे मनोहर
गात तरंगत जल लहरींवर
करीत व्याकुल माझे अंतर
मज साद घालतो परोपरी !

उरे शांतता या पथि निर्जन
प्रेमनदीला भरती येउन
उठती लहरी चंचल उसळून
ही वळति पाउले तटावरी

येईन का मी नाही परतुन ?
तिथेच कोणा राहिन बिलगुन ?
वीणा वाजवि कुणितरि मोहन
तो नाद अनोखा घुमे उरी