Showing posts with label L-संत तुकाराम. Show all posts
Showing posts with label L-संत तुकाराम. Show all posts

तुझ्याच प्रेमाची मूर्ति TUZYACH PREMACHI MURTI

मनांत उदेला प्रेमभाव जेव्हा।
तेव्हांच या जीवा शांति आली॥
तुझ्याच प्रेमाची मूर्ति माझ्या मनीं।
जणूं सिंहासनी अंबामाई॥१ ॥

प्रेमाचे हे गूढ कोण उकलील।
जयाने जीवन अलंकृत॥
कुणा अभाग्याला - प्रेम झालें ज्ञात।
तयाला जीवित - शव रूप॥२ ॥

प्रेमदेवा तुम्हीं रहावे अज्ञेय।
नातरी अपाय आनंदाला॥
रहस्य प्रेमाचे स्पष्ट झाल्यावरी।
जीवाने शरीरी राहू नये॥३ ॥

ज्ञात्वाची जी सीमा ध्येयाचा जो अंत।
तया नांव प्रीत दिले असे॥
पूज्यतेचा वास मांगल्याचा ध्यास।
पूर्णतेचा - प्रीति हा उल्हास॥४॥


Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM

करूनि आरती KARUNI AARATI

करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥

पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥

तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥

Lyrics -SANT TUKARAM  संत तुकाराम

यारे नाचू प्रेमानांदे YARE NACHU PREMANANDE

यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||

जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||

चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||

झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||

आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||

विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||


Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM

आतां देवा ऐसा AATA DEVA AISA

आतां देवा ऐसा करी उपकार

देहाचा विसर पडो माझ्या

तरीच हा जीव सुख पावे माझा

बरवे केशव राजा कळो आले

ठाव देई चित्ता राखे पायांपाशी

सकळ वृत्तीशी अखंडीत

आस भय लाज चिंता काम क्रोध

तोडावा संबध यांचा माझा

मागने हे देवा तुज एक आता

नाम मुखी संत -संग देई

तुका म्हणे नको वरपंग देवा

घेई माझी सेवा भाव -शुद्ध

Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM

आता मानभाव झालो AATA MANABHAV JHALO

आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई भिक्षा वाढा बाई

मुळीचाची मानभाव वस्त्रे काळी केली

कोरके मागून झोळी भरली उलटी काठी धरली

सोन्यारुप्याचे देव आम्ही मोडुनिया खाऊ

शेद्रांचे देव आम्ही दृष्टि न पाहू

एका जनार्दनी मानभाव झाला

झोळीवरती झोळी ठेवूनी गडबडगुंण्डा  केला

Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM

आवडे हे रूपगोजिरे AAWADE HE RUPGOJIRE

आवडे हे रूपगोजिरे सगुन

पाहता लोचन सुखावले

आता दृष्टिपुढे ऐसाची तू राहे

जो मी तुज पाहे वेळोवेळा

लांचावले मन लागलीसे गोडी

ते जिवे न सोडी ऐसे झाले

तुका म्हणे आम्ही मागावे लड़ीवाळी  

पुरवावी आळी मायबाप


Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM

ओंकार प्रधान रूप गणेशाचे OMKAR PRADHAN RUP GANESHACHE



ओंकार प्रधान रूप गणेशाचे
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचिया
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM
Singer -सुमन कल्याणपूर, SUMAN KALYANPUR
Movie / Natak / Album -BHAKTIGEET

हरिनामवेली पावली विस्तारी,Harinam Veli Pavali Vistari

हरिनामवेली पावली विस्तारी ।
फळीं पुष्पीं भार बोल्हावली ॥१॥

तेथें माझ्या मना होइ पक्षिराज ।
साधावया काज तृप्तीचें या ॥२॥

मुळिचिया बीजें दाखविली गोडी ।
लवकर चि जोडी जालियाची ॥३॥

तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ ।
गोडी ते रसाळ अंतरेल ॥४॥

सुंदर ते ध्यान,Sundar Te Dhyan

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥

तुळसी हार गळां कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ॥२॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥

तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥

संतांचिया गांवी प्रेमाचा,Santanchiya Gavi Premacha

संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ ।
नाहीं तळमळ दु:खलेश ॥१॥

तेथें मी राहीन होऊनि याचक ।
घालितील भीक ते चि मज ॥२॥

संताचिया गांवी वसे भांडवल ।
अवघा विठ्ठल धन वित्त ॥३॥

संतांचे भोजन अमृताचे पान ।
करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥

संतांचा उदीम उपदेशाची पेठ ।
प्रेमसुख साट घेती देती ॥५॥

तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी ।
म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥६॥

सावळें सुंदर रूप,Savale Sundar Roop

सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥

आणिक कांही इच्छा आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥

जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज ।
आम्हांसी सहज द्यावें आतां ॥३॥

तुका म्हणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥४॥

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं,Vrukshavalli Aamha Soyari

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥२॥

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ॥४॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ॥६॥

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं,Vrukshavalli Aamha Soyari

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥२॥

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ॥४॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ॥६॥

विष्णुमय जग वैष्णवांचा,Vishnumay Jag

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥

आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥२॥

कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥

तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥

विठ्ठल हा चित्तीं,Vitthal Ha Chitti

विठ्ठल हा चित्तीं ।
गोड लागे गातां गितीं ॥१॥

आम्हां विठ्ठल जीवन ।
टाळ चिपुळिया धन ॥२॥

विठ्ठल विठ्ठल वाणी ।
अमृत हे संजीवनी ॥३॥

रंगला या रंगे ।
तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठल सोयरा सज्जन,Vitthal Soyara Sajjan

विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा ।
जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥

सींण भाग त्यासी सांगेन आपुला ।
तो माझा बापुला सर्वे जाणें ॥२॥

माय माउलिया बंधुवर्गा जाणा ।
भाकीन करुणा सकिळकांसी ॥३॥

संत महंत सिद्ध महानुभाव मुनि ।
जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥४॥

माझिये माहेरीं सुखा काय उणें ।
न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥५॥

विठ्ठल गीतीं गावा,Vitthal Giti Gava

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥

अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥

तो चि शरणांगतां हा विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥

विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥

विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

लहानपण देगा देवा,Lahanpan Dega Deva

लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥

ऐरावत रत्‍न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥

जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥

महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥

राम कृष्ण गोविंद,Ram Krishna Govind

राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥

लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु ।
तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥

तुझे नामीं प्रेम देईं अखंडित ।
नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥

तुका म्हणे माझें हें चि गा मागणें ।
अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥

रात्रंदिन आम्हां युद्धाचा,Ratrandin Aamha

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥

जीवाही अगोज पडती आघात ।
येऊनिया नित्य नित्य करि ॥२॥

तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे ।
अवघीयांचे काळे केले तोंड ॥३॥