Showing posts with label L-पांडुरंग वनमाली. Show all posts
Showing posts with label L-पांडुरंग वनमाली. Show all posts

कावळा पिपेरी वाजवतो,Kavala Piperi Vajavato

कावळा पिपेरी वाजवतो
मामा मामीला नाचवतो

लग्नाचा थाट तुम्ही कमी करा
हुंड्याची चाल आता बंद करा
कपड्याची फॅशन आवरा जरा
सुखाचा संसार आपला करा
घुमघुम गावात गाजवतो
मामा मामीला नाचवतो

मामीला झाली पोरं ही फार
खर्चानं झाला मामा बेजार
पोरांचा वाटतो नको हा भार
दोघांना पडला मनी विचार
त्रिकोण निशाण दाखवतो
मामा मामीला नाचवतो

ताडी-दारुला शिवू नका
सोन्याचा संसार बुडवू नका
देशाची दौलत उधळू नका
जनसेवेला विसरू नका
आपल्या देशाला वाचवतो
मामा मामीला नाचवतो