Showing posts with label L-संत ज्ञानेश्वर. Show all posts
Showing posts with label L-संत ज्ञानेश्वर. Show all posts

कृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE

कृष्णे वेधिली विरहिणी बोले |

चंद्रमा करितो उबारा गे माय |

न लावा चंदनु अंगीं न घाला विंजणवारा |

हरिविणे शून्य शेजारु गे माये ||१||

माझे जीवीचें तुम्ही कां वो नेणां |

माझा बळिया तो पंढरीराणा वो माय ||धृ||

नंदनंदनु घडी घडी आणा |

तयावीण न वांचती प्राणा वो माये |

बापखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु |

अमृतपान गे माये ||३||

Lyrics -संत ज्ञानेश्वर SANT GYANESHWAR

हरि उच्चारणीं अनंत,Hari Ucharani Anant

हरि उच्चारणीं अनंत पापराशि ।
जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥

तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥

हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाध भेणें तेथे ॥३॥

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

समाधि साधन संजीवन,Samadhi Sadhan Sanjeevan

समाधि साधन संजीवन नाम ।
शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥

शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू ।
हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥

यम-दम-कळा, विज्ञान-सज्ञान ।
परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥

ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट ।
भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥

सगुणाची सेज निर्गुणाची,Sagunachi Shej Nirgunachi

सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥

मन गेले ध्यानीं कृष्ण चि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥

हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं ।
आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥

निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥

सगुण निर्गुण दोन्ही,Sagun Nirgun Donhi

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा

पतितपावन मानसमोहन
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा

ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा

ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा

विश्वाचे आर्त,Vishvache Aarta

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नटावला ब्रम्हाकारें ॥३॥

रंगा येईं वो येईं,Ranga Yei Vo Yei

रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं ।
विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥

वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी ।
तुझा वेधु माझे मनी ॥२॥

कटी कर विराजित मुगूट रत्‍न जडित ।
पीतांबरू कसिला तैसा येऊ का धांवत ॥३॥

विश्व-रूपे विश्वं-भरे कमल-नयनें कमलाकरे वो
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥

रूप पाहतां लोचनीं,Roop Pahata Lochani

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥

बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥

सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥

रुणुझुणु रुणुझुणु रे,Runujhunu Runujhunu Re

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

योगियां दुर्लभ तो म्यां,Yogiya Durlabha To Myaa

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥

देखिला देखिला माये देवाचा देवो ।
फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥

अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि ।
बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥

मोगरा फुलला (१),Mogara Phulala (1)

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥



पांडुरंगकांती दिव्य तेज,Pandurang Kanti Divya Tej

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥

पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥

बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचां डोळां पाहों गेलें तंव ।

भीतरीं पालटु झाला ॥६॥



पैल तो गे काऊ,Pail To Ge Kau

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥


आंबया डाहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

पसायदान,Pasaydan

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

पडिलें दूरदेशीं,Padile Door Deshi

पडिलें दूरदेशीं । मज आठवे मानसीं ॥१॥

नको हा वियोग । कष्ट होतात जीवासि ॥२॥दिनु तैसी रजनी । मज जाली गे माये ॥३॥

अवस्था लावुनि गेला । अजुनी कां न ये ॥४॥


गरुड-वाहना गंभीरा । येईं गा दातारा ॥५॥

बाप रखुमादेवी-वरा । श्रीविठ्ठला ॥६॥

देवाचिये द्वारीं उभा,Devachiye Dwari Ubha

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।

पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥


ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥

दिन तैसी रजनी झाली गे,Din Taisi Rajani Jhali Ge

दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥

पडीले दूरदेसी, मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥

अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥

गरूडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।
बाप रखुमादेवीवरू श्रीविठ्ठला ॥४॥

तुज सगुण म्हणों कीं,Tuj Sagun Mhano Ki

तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥

तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥

तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे ।
आकारूनिराकारू एकु गोविंदु रे ॥४॥

तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥

तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥

निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥

जाणिव नेणीव भगवंती,Janiv Naniv Bhagawanti

जाणिव नेणीव भगवंती नाही ।
उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥

नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथे कळी काळचा रीघ नाही ॥२॥

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीवजंतुसी केवी कळे ॥३॥

ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥

घनु वाजे घुणघुणा,Ghanu Vaje GhunGhuna

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपेवो चंदनु ।
देवकीनंदनु । वीण अणू नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्या उत्तरे ।
कोकिळें वर्जवें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥

दर्पणी पाहतां । रूप न दिसे आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें । विठ्ठलें मज ऐसें केलें ॥६॥