Showing posts with label L-अनंत जाधव. Show all posts
Showing posts with label L-अनंत जाधव. Show all posts

फुलपाखरं आली सहलीवर FULPAKHAR AANI SAHALIWAR

फुलपाखरं आली सहलीवर
रविवारची सुट्टी घालवू
या घड़ीभर  गमंत करू 

आम्ही अप्सरा इंद्राघरच्या 
तारका ह्या निळ्या अबंरीच्या  
कधी इथं कधी तिथं  
जाऊ आम्ही जिथं  जिथं 
 हे विश्वची आमुचे घर
ओ ओ ओ
अंगा झोंबे अल्लड तरुण्याचा फुलोरा 
वारया संग होऊ दंग
जीवनात भरु रंग
फुले माळुया सुंदर 
ओ ओ ओ
भुंगा घाली पिंगा फुलांशी
गंधा भुलली मधुमाशी 
चला खेळु लपछपी
गाणी गाऊ साधी सोपी
तारूण्याच्या   तालावर 
ओ ओ ओ
फुलपाखरं आली सहलीवर

Lyrics -अनंत जाधव ANANT JADHAV
Music -राम लक्ष्मण RAM LAKSHAMAN
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -नवरे सगळे गाडव NAVARE SAGALE GADAW