Showing posts with label M-सुधीर मोघे. Show all posts
Showing posts with label M-सुधीर मोघे. Show all posts

BHANNAT RANVARA MASTIT

भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली

येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली

रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी

पानांची गच्‍च जाळी काळोख दाट झाला
काळोख गंधाळला काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी

Lyrics -सुधीर मोघे SUDHIR MOGHE
Music -सुधीर मोघे SUDHIR MOGHE
Singer -उत्तरा केळकर, सुरेश वाडकर UTTARA KELAKAR,SURESH WADAKAR
Movie / Natak / Album -कशासाठी प्रेमासाठी KASHASATHI PREMASATHI

रंगुनी रंगात साऱ्या,Ranguni Rangat Sarya

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

मंदिरात अंतरात तोच,Mandirat Antarat Toch


मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे

तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे

संताचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे

तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे

माझे मन तुझे झाले,Majhe Man Tujhe Jhale

माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तुझे होती भास

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे-
गूज माझ्यातुझ्यापाशी

तुझी-माझी पटे खूण
तुझी-माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन तुझे मन



भेटशील केव्हा माझिया जीवलगा,Bhetashil Kevha Majhiya

भेटशील केव्हा, माझिया जीवलगा
उतावीळ मन तुझिया भेटी

तुझे रूप ध्यानीमनी
जागेपणी स्वप्नातुनी
विश्व शून्य तुजवाचुनी
माझिया जीवलगा

तुझा छंद जीवा जडे
तुझी साद कानी पडे
वाटे यावे तुझियाकडे
माझिया जीवलगा

नको असा दूर राहू
नको असा दूर ठेवू
नको असा अंत पाहू
माझिया जीवलगा

भन्नाट रानवारा मस्तीत शीळ,Bhannat Raan Vara Masteet

भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानच्या पाखरांची रानात भेट झाली

येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली

रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं - वेलींच्या मुंडावळी

पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला
काळोख गंधाळला काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी

एकाच ह्या जन्मी जणू,Ekacha Hya Janmi Janu

एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतुनी उगवेन मी

अज्ञात तीर्थयात्रा,Adnyat TeerthaYatra

अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गूढ वरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती

काही खरे न येथे ही राख सत्य आहे
बाजार बाहुल्यांचा आभाळ फक्त पाहे
सारे झरे सुखाचे दुखा:कडेच वळती

हा ऊन-सावल्यांचा उकलेल गोफ का हो
डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो
नावा रित्याच येती आणि रित्याच जाती