Showing posts with label M-केशवराव भोळे. Show all posts
Showing posts with label M-केशवराव भोळे. Show all posts

हा कोण गडे आला,Ha Kon Gade Aala

हा कोण गडे आला, मनमंदिरि माझ्या ?
सुकुमार प्रेमकलिका ही, अवचित फुलवाया

गुणगुणुनि हृदयि माझ्या
नवगीत प्रीतिचे हे
नकळे कुणी ग बाई, हा जीव पिसा केला

फुलली खरीच का ही
अजि सृष्टिसुंदरी ही ?
का भास असा होई, नकळे उगाच हृदयी ?

मिटताहि लोचनी या
कुणि हासतो कळे ना
हुरहूर लावुनीया, का दूर असा गेला ?

हवास मज तू हवास,Havas Maj Tu Havas

हवास मज तू हवास सखया

हृदयी माझ्या भाव उसळती
ओठावरती शब्द नाचती
रचावया परि कवितापंक्ती
हवास मज तू हवास रे !

भुलविति, खुलविति रसिक मनाला
सुमनांचा मी संचय केला
गुंफाया परि मोहक माला
हवास मज तू हवास रे !

असे कुंचली, रंगहि असती
धवल फलकही आहे पुढती
रेखाया परि रम्य आकृती
हवास मज तू हवास रे !

स्नेहहि आहे, आहे पणती
मंदिरातल्या मूर्तीपुढती
उजळाया परि जीवनज्योती
हवास मज तू हवास रे !

शुभमंगल या समया,Shubhamangal Ya Samaya

शुभमंगल या समया, फुलल्या आनंदे दशदिशा

जीवनस्वप्न मनोहर अपुले, आले अजि उदया
शुभमंगल या समया

नाचती डोलती आनंदे ही देवाची बाळे
भूवरी नंदनवन आले
बघुनि तयांची सौख्यसंपदा
येईल लाजुनी आश्रय घ्याया, पर्णकुटीत कुबेर

ललना दिसे सुप्रभाती, Lalana Dise Suprabhati

ललना दिसे सुप्रभाती । नयना तुझ्या दर्पणांती ।
अलकांचिया पाशा धरिता । मृदू त्या हातीं ॥

हसतमुखी ती सन्मुख राही । लाजुनी वाट पाही ॥

मन सुद्ध तुझं गोस्त,Man Suddha Tujhe Gosht

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची



ब्रिजलाला गडे पुरवी,Brijala Gade Puravi

ब्रिजलाला गडे पुरवी हृदयिंची आस ॥

वाजिव श्रीहरी । मंजुळ बासरी ।
पाजिव शांति सुधा जीवास ॥

प्रभुराया रे हो संकट,Prabhuraya Re Ho Sankat

प्रभुराया रे हो संकट हे अनिवार

खवळूनि सागर गरजत नाचे चोहिकडे अंधार
फुटले तारू कुणा पुकारू जाईल कैसे पार?

स्थिरली नौका क्षणभर वाटे दाविशी साक्षात्कार
परि तो ठरला भास, उफाळति लाटा अपरंपार


पसरुनी निज कर लहरीरूपे न्या हो सागरपार
धावा धावा सदया देवा, कोण दुजा आधार?

नको वळुन बघू माघारी,Nako Valun Baghu Maghari

नको वळुन बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी

तुझ्या नि माझ्या प्रीतीची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची

तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी

नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतिल वरती रत्‍नं सुंदर किती
त्यामधे नाही तुझी राणी, पाहुनी होशिल खिन्न मनी


कशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रं ही तुला हेरूनी
डोळे मोडुनि नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे

आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी

दोन घडीचा डाव,Don Ghadicha Daav

दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नाव

जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळु या सारे आपण
रंक आणखी राव

माळ यशाची हासत घालू
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव

मनासारखा मिळे सौंगडी
खेळाला मग अवीट गोडी
दुःखाला नच वाव



तो म्हणाला सांग ना,To Mhanala Sang Na,

तो म्हणाला, सांग ना गे मी तुझा ना साजणी
ती म्हणाली, रत्न राया मी तुझ्या रे कोंदणी

तो म्हणाला, प्रेम म्हणजे वेड मजला वाटते
ती म्हणाली, गोड अन् ते ओढ जीवा लाविते

तो म्हणाला, भावनेचे खेळ सारे नाचरे
ती म्हणाली, जीवनाचा भावना आधार रे

तो म्हणाला, प्रीत करिते दो जीवांची एकता
ती म्हणाली, होय ना? मग का अशी ही दूरता?



तू माझी अन्‌ तुझा मीच,Tu Majhi An Tujha Meech,

'तू माझी अन्‌ तुझा मीच' ही खातर ना जोवरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी !

गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनी
ओठांची थरथरत पाकळी बोल गडे झडकरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी?

जिवाजिवांची अभंग जडली जोड असे ही जरी
भीति मग कोणाची अंतरी
ही गाठ भिडेची तात गळ्यां लाविल
हिरव्याची पिवळी पाने ही होतिल
प्रीतिच्या फुलांचा वास उडुनि जाईल
फसाल पुरत्या बसाल गाळित घळघळ अश्रूझरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी?

तुझा नि माझा एकपणा,Tujha Ni Majha Ekapana

तुझा नि माझा एकपणा
कसा कळावा शब्दांना

दोन आपुल्या भिन्न आकृती
अंतरात पण एकच प्रीती

काव्य कळे ते नयनांना

जसा फुलांतुन गंध दरवळे
तसा मनातून स्नेह झुळझुळे
मिळे चेतना कणा कणा


चंद्र उगवता कमळे फुलती
प्रित उमलता हृदये जुळती
ज्यांच्या त्यांना कळती खुणा

घेई विहंगासम भरारि,Ghei Vihangasam Bharari

घेई विहंगासम भरारि । मानस हें भारी ॥

उन्मादक गीतांचे । छत सुंदर पसरावे ।
वाटे या क्षणि मनास । मन वेडे बाई ॥

एकलेपणाची आग लागली,Ekalepanachi Aag Lagali

एकलेपणाची आग लागली हृदया
घनदाट दाटली विषण्णतेची छाया
तडफडे जिवाचे पाखरूं केविलवाणे
होत ना सहन त्या एकलकोंडे जगणे
जोडीस शोधी ते उदात्त अपुल्यावाणी
प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी
गुंफीत कल्पनाजाला गुंगणे
गुरफटुन त्यात जीवाला टाकणे
रंगीत स्वप्नसृष्टिला उठविणे
ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेड्या
ही सुवर्णलंका दिपवित अवघी हृदया
परि इंद्रजाल हे जात कधी विरुनीया
एकलेपणाची आग लागते हृदया

एकतत्व नाम दृढ धरीं,Ektatva Naam Drudha Dhari

एकतत्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥

तें नाम सोपें रें राम कृष्ण गोविंद ।

वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा,
वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥


ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥

एक होता राजा,Ek Hota Raja

एक होता राजा, एक होती राणी
अचल तयांची अनुपम प्रीती

दिव्य तयांची सुंदर नगरी
दु:ख न तेथे वास करी

विटुनि आपुल्या सदना उतरे
स्वर्गसौख्य जणु भूमिवरी

बोले राणी, "मन्मन मोती"
राजा बोले, "मी मनचोर"

राणी बोले, "चंद्रिकाच मी"
बोले राजा, "मीहि चकोर"

प्रणयोद्यानी करिती क्रीडा
दंग नर्तनी हर्षभरे
नाचती लतिका, फुले, झरे



उसळत तेज भरे,Usalat Tej Bhare

उसळत तेज भरे गगनात
उजळे मंदिर, शिखर विराजे, सोनेरी किरणांत !
गाभाऱ्यातील मूर्ति चिमुकली, न्हाली तव तेजात
प्रांगणातले तरु मोहरले पसरे गंध दिशांत

उत्साहाचे भरले वारे पवनाच्या हृदयांत
ओढ लागली त्या तेजाची मम जीवा विरहार्त

हृदय परी का अजुनी माझे, फिरते अंधारात?
उजळिल अंतर कधी निरंतर येउनि निजरुपात ?



अहा भारत विराजे,Aha Bharat Viraje

अहा भारत विराजे, जगा दिपवीत तेजे

भादव्यात येती गौरी गणपती उत्सवा येई बहार
मेळे आरास करोनी, गाती नाचुनी हसुनी
ध्वनी त्यातहि गाजे, अहा भारत विराजे

नवरात्र पूजेची आश्विनशोभा करिती नारी शृंगार
लेऊनि वसने मजेदार गळा विविध अलंकार
ध्वनी त्यातुनि निनादे, अहा भारत विराजे

आली दिवाळी भुवन उजळी आनंद घे अवतार
दीपक नभीचे भूवरी येती दाविती शोभा अपार
मुदित हृदय सजती करिती सकलजन विहार
माला तोरणे फुलांची, वसने भूषणे जनांची
शोभा पाहुनी धरेची, मनी स्वर्गही लाजे
अहा भारत विराजे



अधिर मन बावरे,Adhir Man Bavare

अधिर मन बावरे, घेइ आंदोलने ।
विविध भावांवरि प्रेमशंकागुणें ॥

दयित हृदयांतले अणु जरी लाभलें ।

स्थल, विसावेल मन ।
कांतागुणचिंतने ॥

आला खुशीत्‌ समिंदर, Aala Khushit Samindar

आला खुशीत्‌ समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !


हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर, ओढी खालीवर,
पाण्यावर देइ ना ग ठरू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !
तांबडं फुटे आभाळांतरी,
रक्तावाणी चमक्‌ पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी !
झाला खुळा समिंदर, नाजुक्‌ होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !

सूर्यनारायण हसतो वरी,
सोनं पिकलं दाहिदिशांतरी,
आणि माझ्याहि नवख्या उरी !
आला हासत समिंदर, डुलत फेसावर,
होडीशी गोष्ट करू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !

गोऱ्या भाळी तुझ्या लाल्‌ चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी,
उरी कसली ग गोड शिरशिरी ?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,
चाले होडी भुरुभुरू,
सजणे, वाऱ्यावर जणु पाखरू !