Showing posts with label L-शुभदा सुभेदार. Show all posts
Showing posts with label L-शुभदा सुभेदार. Show all posts

मेघा रे MEGHA RE

मेघा रे, तू गर्जत ये, तू बरसत ये

घुमवित नाद मधुर ये, मेघा रे

बाळकृष्ण होऊन ये तू

दुडुदुडु ये धावत ये तू

शीत गंध घेऊन ये तू

प्रीत धुंद होऊन ये, मेघा रे

श्यामरूप दावित ये तू

रानशीळ घालित ये तू

अविरत मज भिजवी रे तू

चिंब भिजुनी गाईन रे, मेघा रे


Lyrics -शुभदा सुभेदार SHUBHADA SUBHEDAR
Music -पद्मजा फेणाणी-जोगळेकर PADMAJA FANANI-JOGALEKAR
Movie / Natak / Album -मेघा रे MEGHA RE