Showing posts with label फ. Show all posts
Showing posts with label फ. Show all posts

फांद्यांवरी बांधिले ग Phandyavari Bandhile Ga

फांद्यांवरी बांधिले ग, मुलिंनि हिंदोले

पंचमिचा सण आला, डोळे माझे ओले



श्रावणाच्या शिरव्यांनी, आनंदली धराराणी

माझे पण प्राणनाथ, घरी नाही आले



जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी


खळाखळा वाहतात, धुंद नदीनाले



पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात

भिजलेल्या चिमणीचे, पंख धन्य झाले



आरशांत माझी मला, पाहू बाई किती वेळा

वळ्‌चणीची पाल काही भलेबुरे बोले

फूलपाखरू झालो रे मी Phoolpakharu Jhalo Re Mi

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !

फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो !



मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची

धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदूंनी न्हालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !




फुलाफुलावर बसतो मी खुदकन गाली हसतो मी

डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !



नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे

कृरपणा हा बघुनी तुमचा मनोमनी भ्यालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !

फूल ते संपले गंध Phula Te Sampale Gandha

फूल ते संपले, गंध ना राहिला

हाक तू ऐकिली, साद नाही दिला



मार्ग माझा अता चालतो एकला

मी न कोणी इथे, नाहि मी येथला

शून्य काळोख हा अंतरी साहिला




सोसुनी वेदना गीत गातो कुणी

लेखुनी क्षुद्र त्या आणि जातो कुणी

मीहि जागेपणी खेळ हा पाहिला



भेट झाली तिची याद ठेवू नये

आणि स्वप्नामधे भेट घेऊ नये

तू सखी हो तिथे, शाप माझा मला


फू बाई फू Phu Bai Phu

फू बाई फू, फुगडी फू

दमलास काय माझ्या गोविंदा तू



आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू

म्हतारपणी नवरा केला तोही पोरखेळू



माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी


लुगडं सोडून देऊ लागली जावयाच्यासाठी



नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाजं

आता झाली चिली-पिल्लं कोंबडीवाणी झुंजं



काजळ ल्याली, कुंकु ल्याली, टिकली दावी लोका

देवाजीचा संग नाही रंग झाला फिका



संतांची निंदा केली, निंदा नाही बरी

तुकाराम शरण गेले सद्गुरू पायी

फुलं स्वप्नाला आली ग Phula Swapnala Aali Ga

नवतीची, प्रीतिची, काया शिणगार ल्याली ग

फुलं स्वप्नाला आली ग !



धुंदीत डोलते वाऱ्याने फुलते कळी, फुलुन आली कळी

दवांत बुडली पानात दडली खुळी, कशी ग बाई खुळी

पाखरू घुमलं, गाण्यात रमलं, घुमतंया अंतराळी

ओढ ही, भेट ही, जीवा-शिवाची झाली ग


फुलं स्वप्नाला आली ग !



स्वप्नात हसतो संसार दिसतो असा, महाल बाई जसा

येईल अंगणा साजण देखणा कसा, मदन बाई जसा

हातात हात ग, गुलाबी साथ ग, चंद्राचा शिडकावा

कावरी, बावरी, रात किरणांत न्हाली ग

फुलं स्वप्नाला आली ग !



नवी मी नवरी मुलखाची लाजरी राणी, राजाची माझ्या राणी

अंगाला चढलं, कळसाचं पिवळं पाणी, हळदीचं नवं पाणी


डोळ्याची पापणी मिटून साजणी गाऊ मिळून गाणी

कोण मी, कोण तू, जाण विसरून गेली ग

फुलं स्वप्नाला आली ग !

फुला फुला रे फुला Phula Phula Re Phula

फुला, फुला रे फुला, फुला

मी लपले, तू शोध मला

गंध कुठे तो शोध फुला



दिसत नसे पण सुटला दरवळ

दलात भरल्या लहरी अवखळ

डुले डहाळी जसा झुला




तुझ्या मानसी चाले रुणझुण

तीच सुगंधी माझी गुणगुण

तुझीच प्रीती भुलवी तुला



लपसि कुठे तू वाऱ्यापाठी

तुझ्याच हृदयी तुझ्याच ओठी

तुझ्या फुलविते दला, दला

फुलले रे क्षण माझे Phulale Re Kshana Majhe

फुलले रे क्षण माझे फुलले रे

मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने

सजले रे क्षण माझे सजले रे



झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले

साजण स्पर्षाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे

या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे


मेंदीने, शकुनाच्या मेंदीने

खुलले रे क्षण माझे खुलले रे



ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे

भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे

मन मोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे

मेंदीने, शकुनाच्या मेंदीने

हसले रे क्षण माझे हसले रे



रीत ही, प्रीत ही उमजेना


जडला का जीव हा समजेना

कशी सांगू मी, कशी सांगू मी

माझ्या मनीची कथा रे

मेंदीने, शकुनाच्या मेंदीने

भुलले रे क्षण माझे भुलले रे


फुलला मनीं वसंत बहार Phulala Mani Vasant Bahar

फुलला मनीं वसंत बहार ।

मुनिवर्याच्या कृपाप्रसादे नुरला चिंताभार ॥



उदासवाणा शिशिर संपला

वासंतिक मधुगंध पसरला

धुंद निनादे चैतन्याचा मनिं पंचम झंकार ॥

फुटतो पान्हा पुन्हा Phutato Panha Punha

फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा, कुणी तरी माझे बाळ आणा



रेशमाचे कुंची झबले, या हातांनी मी शिवलेले

तसेच हाती राहुन गेले, घालुनी पाहू आता कुणा ?



बाळ निजेची वेळ येते, पाळण्याची दोरी हलते

गहिवरता मी जो जो म्हणते, पाळणा हले सुना सुना




बाळ कुशीला देण्यासाठी, चिमणे चुंबन घेण्यासाठी

जितुके जीवन असेल गाठी, देईन तुजला दयाघना

फिटे अंधाराचे जाळे Phite Andharache Jale

फिटे अंधाराचे जाळे

झाले मोकळे आकाश

दरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश



रान जागे झाले सारे

पायवाटा जाग्या झाल्या

सूर्य जन्मता डोंगरी


संगे जागल्या साऊल्या

एक अनोखे लावण्य

आले भरास भरास



दंव पिऊन नवेली

झाली गवताची पाती

गाणी जुनीच नव्याने

आली पाखरांच्या ओठी

क्षणापूर्वीचे पालटे


जग उदास उदास



झाला आजचा प्रकाश

जुना कालचा काळोख

चांदण्याला किरणांचा

सोनसळी अभिषेक

सारे रोजचे तरीही

नवा सुवास सुवास



साऱ्या रंगावर आली


एक सोनेरीशी झाक

भिडे काळजाला थेट

निळ्या क्षितिजाची हाक

तुझ्या नसण्याची कळ

गेली तळास तळास


फार नको वाकू जरी Phar Nako Vaku Jari

फार नको वाकू जरी उंच बांधा,

फार नको झाकू तुझा गौर खांदा



आणि गडे डोळे तुझे फार फंदी,

साज तुझा आहे जुईचा सुगंधी



चित्त म‍उ माझं जशी रानकळी,


धुंद तुझी आहे नदी पावसाळी



श्वास तुझेमाझे जसा रानवारा

प्रीत तुझीमाझी जसा सांजतारा

फड सांभाळ तुऱ्याला ग Phad Sambhal Turyala Ga

फड सांभाळ तुऱ्याला ग आला

तुझ्या ऊसाला लागल कोल्हा



मूळ जमीन काळं सोनं

त्यात नामांकित रुजलं बियाणं

तुझा ऊस वाढला जोमानं

घाटाघाटानं उभारी धरली


पेरपेरांत साखर भरली

नाही वाढीस जागा उरली

रंग पानांचा हिरवा ओला



लांब रुंद पिकला बिघा

याची कुठवर ठेवशील निगा ?

सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा

याला कुंपण घालशील किती ?

जात चोरांची लई हिकमती


आपली आपण धरावी भिती

अर्ध्या रात्री घालतील घाला



तुला पदरचे सांगत नाही

काल ऐकू आली कोल्हेकुई

पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही

साऱ्या राती राहील कोण जागं ?

नको बोलण्याचा धरूस राग

बघ चिखलात दिसतात माग


कुणीतरी आला अन्‌ गेला