Showing posts with label L-उमाकांत काणेकर. Show all posts
Showing posts with label L-उमाकांत काणेकर. Show all posts

मी भिजून पूरी MI BHIJUN PURI

मी भिजून पूरी आता झाले ओली
चल पाण्यावर तरंगत न्हाऊ
रागारागानं नको रे पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

आली मनात जाग पेटली उरात आग
रानमाळावरी खुलून आलीया बाग 
जरा भुंग्यांची गमंत पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

आज कसलं तुझ्या वेड आलं मनी 
उशीर झाला किती कसं नाही ध्यानी
माझ्या मार्गात नको ग येऊ
रागारागानं नको रे पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

का रे माझ्या ,रुसला कशापायी
वारा झोंबतो मला जरा कर घाई 
कसा समाजाऊं असा येडा ह्यो पोर 
तुझ्या खेळापाई माझा खचतो ग धीर  
तुला उचलू का कडेवर घेऊ
रागारागानं नको रे पाहू
घडीभरानं घरला जाऊ

Lyrics -उमाकांत काणेकर UMAKANT KANEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर ,सुरेश वाडकर USHA MANGESHKAR,SURESH WADAKAR                    
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी  KADAKLAKSHMI

उधार उसनवार मागू नका UDHAR USANWAR MAGU NAKA

उधार उसनवार मागू नका
भलतेच वायदे सांगू नका
छंद माझा नेकीचा
हाय नेकीचा
व्यापार करते रोखीचा
मी व्यापार करते रोखीचा

तुमची ती माझी ख़ुशी
देशी असो वा परदेशी
पिढ़या पिढ्यांचा धंदा माझा
किरकोळ नाही, ठोकीचा 

सगळ्यांसाठी माझाच मेवा
दुनियेची मी करिते सेवा
जळत्यात  त्यानां खुशाला 
कारभार माझा चोखीचा

हिशोब कशाला करताय नाना
जावा की इसरुन जुना जमाना
ठासून भरलाय बरं माल मी
तुमच्या माझ्या एकीचा

Lyrics -उमाकांत काणेकर UMAKANT KANEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी KADAKLAKSHMI

वासनासुखाच्या रंगी,Vasana Sukhachya Rangi

वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो
तुझ्या किर्तनाच्या रंगा देवा अंतरलो

तुझे नाम ना घेता उभा जन्म गेला
पराजीत मानव तरीही अभिमान केला
तुझे रूप विसरुनी दूर दूर गेलो

प्रेमरस प्यालो अन्‌ द्रव्यलोभ केला
प्रपंचात गुंतुनिया जन्म घालविला
माझिया सुखाचा देवा मीच वैरी झालो

गांजता परंतु अंती आलो दर्शनाला
क्षमा तू उदारा आता करी पामराला
मुक्ती देई अथवा ना दे, तुझ्या दारी आलो

रंगला रे हरी,Rangala Re Hari

रंगला रे हरी यमुनाकिनारी
रंगात न्हाल्या गोकुळच्या नारी

गोपीसंगे श्याम दंगला
यमुनेचाही ओघ थांबला
होऊनिया धुंद बासरीरवाने
कौतुक पाही वसुंधरा सारी

रंगुनि जाता दिसे आगळी
श्रीरंगाची मूर्ति सावळी
लावूनिया छंद उभ्या गोकुळाला
विसरला भान देव चक्रधारी

रे नंदलाला तू छेडू,Re Nandalala Tu Chedu

रे नंदलाला तू छेडू नको
धरुनीया पदराला ओढू नको

सांजवेळ झाली घरी जाऊ दे ना
नको बासरीच्या घेऊस ताना
शब्द लाघवी काना बालू नको

अडवू नको रे नभी चंद्र आला
आवरुनी घे ना तुझ्या बाललीला
मला मोहमायेने वेढू नको

माझ्या विराण हृदयी,Majhya Viran Hridayi

माझ्या विराण हृदयी पाहू नकात कोणी
आहे अजून ओली इष्कातली निशाणी

उधळूनी डाव गेला धुंदीत खेळलेला
सहवास यौवनाचा, लाभून यौवनाला
आता मुक्या स्मृतीने जळते उभी जवानी

बेहोष होऊनिया हितगूज जेथ केले
निमिषात त्या ठिकाणी सारे मिटून गेले
आता अखंड वाहे डोळ्यांमधून पाणी

मस्तीत प्रियतमेने ज्या फेकिले फुलाला
दळभार त्या फुलाचा सारा सुकून गेला
आणि तरी तयाला येतोच गंध अजुनी



माझिया प्रियाला प्रीत,Majhiya Priyala Preet

माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना
आवरू मनाला कैसे मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला कळूनी वळेना

यौवनात सुकते काया, दुःख आवरेना
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजुनी त्याचा सुखाचा मिळेना

वसंतात नाही बोले, श्रावणात नाही
कठोरास माझ्या मनिचे कळेनाच काही
रात रात शिणती डोळे, पापणी ढळेना

बोल कन्हैय्या का रुसला,Bol Kanhaiyya Ka Rusala

बोल कन्हैय्या, का रुसला, राधेवरी ?

तू अनुरागा भारी चंचल
जैसे वाहे यमुनेचे जल
का रे धरिसी लटक्या रागा ?

तुझ्यामुळे बदनामी झाली
नेत्र-पापण्या झुकल्या खाली
सोडी ना रे अपुला त्रागा ?



प्रीतीचा फुलबाग,Preeticha Phoolbag sumananni baharun aala

प्रीतीचा फुलबाग सुमनांनी बहरून आला
हर्षाच्या उन्मादे मिलनाचा संकेत केला

कस्तुरीच्या गंधाने भारावुनी धुंद झालो
वसंताच्या रंगात रंगुनिया दंग झालो
खेळत खेळत, नाचत नाचत रे, मदनाने भेद केला


कोकीळेच्या गंधर्वगायनाने वेडा झालो
मिलनाच्या आतूर कल्पनेचा गंध प्यालो
हसत हलत, डोलत डोलत रे, छेडितो गीतमाला

प्रभू तू दयाळू,Prabhu Tu Dayalu

प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता

जगविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्य चित्ता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा
निघे शीण सारा मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता

ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा
तुझे नाम ओठी नको वेदगीता



प्रकाशातले तारे तुम्ही,Prakashatale Tare Tumhi

प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा
हसा मुलांनो हसा

तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळतीवारा-पाणी
आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाउन बसा

रडणे हा ना धर्म आपुला
हसण्यासाठी जन्म घेतला

भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटु दे ठसा

सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणावितो कसा



नको भव्य वाडा,Nako Bhavya Vada

नको भव्य वाडा, नको गाडि-घोडा
अनाडी असे मी, तुझा प्रेमवेडा

तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी

तुला या दिलाची, येईल कसोटी
बेहोश मन हे तुझा त्यास ओढा

मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा

किती काळ सोसू उरी मी निराशा
बेचैन हृदया तू दे धीर थोडा

तुझ्या संगतीची जिवा ओढ भारी

हे देवी तुझा मी असे ग पुजारी
नाजूक दिल हे नको ना बखेडा

नको प्रिया छेड काढू,Nako Priya Ched Kadhu

नको प्रिया छेड काढू, नको मला ओढू
माझ्या अंतरीचे नको सूर छेडू

अनामिक ओढ माझ्या मनामध्ये जागे
तुला पुन्हा भेटायाची हुरहुर लागे
तुझ्या रेशमी बंधांनी अशी नको नको प्रित जोडू

फुलायाची हौस नाही; कळी गोड वाटे
स्वप्न एक मंतरलेले लोचनात दाटे
प्रिया छेड हा रंग ना असा नको नको खंड पाडू

देवतुल्य बाबा माझे,Devatulya Baba Majhe

देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई
पुजा रोज करितो त्यांची, अन्य देव नाही

पेटवून त्यांच्यापाशी दोन नेत्रज्योती
लावुनिया पावन होतो चरणधूळ माथी
सदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई

शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे प्रेम
वचन सत्य बोलायाचा असे नित्य नेम
भल्याबुऱ्या परिणामांचा खेदखंत नाही


नभाहून मोठी माया, हृदय सागराचे
समाधान खेळे सदनी शांति-वैभवाचे
प्रपंचात राहूनीया सत्वशील राही

त्यानीच छेडिले ग,Tyanich Chedile Ga

त्यानीच छेडिले ग, माझ्या मनी न होते
ओढून ओढणीला, दारी उभी मि होते

करपाश तोचि आले, कंठी गडे तयांचे
भारावल्या मनाने, मी ग अबोल होते

अपराध काहि नसता, शिक्षा मला मिळाली
माझ्याच मंदिरी ग, मी बंदिवान होते

दिनरात साजणाचे, बेबंद वागणे हे
असते सुखात जर का, मी बालिकाच होते

तुझेच रूप सखे पाहूनिया,Tujhech Roop Sakhe

तुझेच रूप सखे पाहूनिया फसलो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !

सारी सारी रात मनी येऊनी तू छळसी का ?
ही तुझी हार सखे
मम हृदयात तूच फिरुनी फिरुनी बघसी का ?
ही तुझी हार सखे
गुलाबी रंग तुझा पाहुनिया भुललो ग
असेल चूक ही मी यौवनात चुकलो ग !

अनुपम नेत्र तुझे रोखूनिया हससी का ?
ही तुझी हार सखे
झुलवूनी रोज मला दूर दूर पळसी का ?
ही तुझी हार सखे
ऊरात हट्ट तुझे घेऊनिया बसलो ग
असेल चूक ही मी यौवनात चुकलो ग !

गोष्ट मला सांग आई,Gosht Mala Sanga Aai

राजा राणीची नको, काऊ माऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ आता झाली माझी झोपेची


राम हसायचा कसा, राम रडायचा कसा
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा
समजूत कोणी घातली त्या वेड्याची ?

राम काळा का गोरा, दिसत होता का बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा
आवड होती का ग त्याला खेळाची ?

राम गेला का वनी, त्याला धाडीला कुणी
भिती नाही त्याच्या कशी आली ग मनी

सोबत तिथे त्याला होती का कोणाची

उघड्या पुन्हा जहाल्या,Ughadya Punha Jahalya

उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या
फुलती तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या

येऊ कशी निघोनी, पाऊल अडखळे
विरहात वेचिताना, घटना सुखातल्या

उठता तरंग देही, हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी, भेटी वनातल्या

हासोनिया खुणावी, ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या, तारा नभांतल्या