हंबरून वासराले चाटती जवा गाय HAMBARUN WASARALE CHATATI JAWA GAY
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले

आया बाया सांगत व्हत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
पीठा मंदी पीठा मंदी
पाणी टाकून मले पाजत जाय

तवा मले पीठामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …

कान्याकाट्या वेचायला माय जायी रानी
पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी
काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं
शिकून शानं शिकून शानं
कुठं मोठा  मास्तर होणार हाय
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
थर थर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या कसायाच्या
दावणीला बांधली जसी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …

बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …

म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जन्म  घेवा माये तुझी पोटी
तुझ्या चरणी तुझ्या चरणीठेवून माया धरावं तुजं पाय
ठेवून माया धरावं तुजं पाय
वा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले
दिसती माझी माय
दिसती माझी माय
दिसती माझी माय


Lyrics -नारायण सुर्वे NARAYAN SURVE
Movie / Natak / Album - गीत GEET

10 comments:

 1. Who is the real lyricist of this song? Narayan Surve or Prof. S. G. Pachpol???

  ReplyDelete
 2. This song is taken from a marathi poem 'maay'which is written by S.G.pachpol

  ReplyDelete
 3. ज्ञानेश्वर गवळी

  ReplyDelete
 4. How to download disti majhi maay
  Marathi song ?

  ReplyDelete
 5. ही कविता नारायण सूर्वे यांची नाही. जितेंद्र जोशीने सांगितले आणि आपण सर्वांनी विश्वास ठेवला. मात्र ही कविता प्रा. स. ग. पाचपोळ यांची आहे.

  ReplyDelete
 6. कवी यशवंतांच्या कवितांपासून फ. मुं. शिंदेंच्या कवितांपर्यंत.. अनेकांनी आई या विषयावर कविता लिहिल्या. पण एक कविता अशीही लिहिल्या गेली की जी गावोगावी मुखोद्गत होत गेली. काळजाला भिडणारी ही कविता ऐकताना, वाचताना नकळत डोळे ओले करून जाते.. हंबरून वासराले चाटते जव्हा गाय..तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय.महाराष्ट्र भर गाजलेली, मनाला स्पर्श करुन जाणारी ही कविता वैदर्भीय कवी प्रा. स. ग. पाचपोळ यांनी लिहीली आहे. पण पुस्तकं, वर्तमानपत्र आणि आंतरजालावर ही कविता मुळ शब्दांत बदल करून नारायण सुर्वे यांच्या नावे खपवल्या गेली आहे. कवितेत वऱ्हाडी शब्द असल्यामुळे या कवितेचा कवी वऱ्हाडीच असावा म्हणून श्री नरेंद्र लांजेवार यांनी मुळ कवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी नारायण सुर्वे यांची भेट घेतली आणि या कवितेबद्दल विचारणा केली, तेव्हा नारायण सुर्वे म्हणाले, डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती; ही एकच कविता मी अनुवादित केली आहे. बाकी कोणतीच कविता मी अनुवादित नाही केली. ही कविता कोणी लिहिली खरतर याचा शोध तुम्हीच घ्या. आणि शोध घेत घेत लांजेवार सरांच्या प्रयत्नांना यश मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा या स. ग. पाचपोळ यांच्या गावी जाऊन त्यांनी पाचपोळ यांच्या वैयक्तिक डायरीमधून ही कविता मिळवली आणि या कवितेचे श्रेय स. ग. पाचपोळ यांना मिळवून दिले. आणि जगाला एका वैदर्भीय कवीची ओळख करून दिली. ही अजरामर कविता लिहिणारे वैदर्भीय कवी स. ग. पाचपोळांना या कवितेचे झालेले सोने बघण्याची संधी नियतीने दिली नाही. त्यांच्या हयातीत त्यांची कविता दुर्लक्षित राहिली. त्यांच्या अकाली निधनानंतर कवितेच्या प्रेमापोटी श्री नरेंद्र लांजेवार यांनी त्यांच्या अनेक विखुरलेल्या संकलित करून हा काव्यसंग्रह संपादित करून प्रकाशित केला आहे. या संग्रहातील जवळपास प्रत्येक कविता ही मनाला स्पर्श करुन जाते.

  ReplyDelete
 7. हि कविता नारायण सुर्वेचिनहि .....हि कविता प्रा.सा.ग.पाचपोळ यांची आहे.

  ReplyDelete