Showing posts with label L-गोविंद सदाशिव टेंबे. Show all posts
Showing posts with label L-गोविंद सदाशिव टेंबे. Show all posts

मितभाषिणी तीच,Meet Bhashini Teech

मितभाषिणी तीच कुलकामिनी । गृहिणी ।
रुचिर वय वदुनि भूषवि । स्वकुल कुलाचार राखोनी ॥

केवि मिळे त्या जनी मान्यता । अविनय ज्या वरिती वाक्यपटुता ।
कुलकलंकिनी ठरती वनिता । मिरविती सदाचार सांडोनी ॥

मन हो रामरंगी,Man Ho Ram Rangi

मन हो रामरंगी रंगले,
आत्मरंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले

चरणी नेत्र गुंतले
भृंग अंबुजातले
भवतरंगी रंगले



मधुसूदना हे माधवा,Madhusudana He Madhava

मधुसूदना हे माधवा । हे चक्रपाणी सुरम्य सुदर्शन ।
सूर्यसुधाकर लोचना ॥

वसना विणोनी शिणल्या सुरामा ।
सति रुक्मिणी ही तशी सत्यभामा ।
तव सिद्ध जाया मम रक्षणा ।
वैरी करिल तरि कृष्ण वदना ॥

नच पार नाद निधिला,Nach Paar Naad Nidhila

नच पार नाद निधिला ।
विधितनया वीणा वाही, तरुनि जावया ।
पैलतीर परि ना दिसला ॥


ब्रम्हनाद नटवी गानकला श्रुति पंचम जी, श्रुतिसि गोचर ।
स्वरलेखनि जरि बांधिली तिला ।
हीननाद होई स्वरमाला ॥

तारिणी नववसनधारिणी,Tarini Nav Vasan Dharini

तारिणी नववसनधारिणी ।
वात्सल्य हृदयी धरुनी ।
करिसी दया स्वजनी ॥

तळमळे अवघी प्रजा ।

उत्सवी मग्न राजा ।
साधितो शकुनी काजा ।
वैरी घर भरिती, स्वैरगती रमती ।
प्रजा जन फिरती रानी ॥

अंध बिचारी मी जरी बाला,Andha Bichari Mi Jari Bala

अंध बिचारी मी जरी बाला
पाहिले न कधी शशीसूर्याला
वाण नसे परी आनंदाला
कारण अंध अशि मी बाला ॥

कळ्या फुलांचा रंग तजेला
कसा दिसावा अभागिनीला
परी ते देती सुगंध मजला
कारण अंध अशि मी बाला ॥

पक्षांच्या नभी उडत्या लीला
कुठुन पहाणे या जन्माला
मला ऐकविती परी गानाला
कारण अंध अशि मी बाला ॥

प्रेमाचे मधुबोल हे जगीं
देवाची अंधास देणगी
सकल बोलती प्रेमळ बोला
कारण अंध अशि मी बाला ॥