Showing posts with label L-यशवंत. Show all posts
Showing posts with label L-यशवंत. Show all posts

आई म्हणोनी कोणी आईस AAI MHANONI KONI AAIS

'आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? आई घरी न दारी

चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई

येशील तू घराला परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता जरी बोलशील रागे
'आई' कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

Lyrics -यशवंत YASHAVANT
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -श्यामची आई SHYAMACHI AAI 

नीज नीज माझ्या बाळा,Neej Neej Majhya Bala

नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता !

अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
देवाजीच्या मांडीवर ब्रम्हांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा बैसे जागत अजून


ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला, तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी, झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
नको जागु, झोप आता, पुरे झाली चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता

घनदाट रानी वाहे,Ghandat Rani Vahe

घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी

वेळुच्या बनात चाले वाऱ्याचे गायन

पाचोळ्याने भवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणी

दुरावर ऐकु येई सागराचे गीत

निळे निळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनी वाणी

वाऱ्यामध्ये ऐकु येई तुझे कान गूज
चंद्र सूर्य ताऱ्यामाजी प्रभू तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी

गाउ त्यांना आरती,Gau Tyana Aarati

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाउ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउ त्यांना आरती

देह जावो, देह राहो; नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती."