Showing posts with label L-गो. नि. दांडेकर. Show all posts
Showing posts with label L-गो. नि. दांडेकर. Show all posts

मी राधा मीच कृष्ण,Mi Radha Meech Krishna

मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले

मी गोकूळ मी यमुना
मीच गोप व्रज-ललना
जसुमती मी, मीच नंद वैर ते निमाले

नव विकसीत कमल मीच
पुष्पगंध मी विमल मीच
मीच पवन उपवनी जो मंद मंद चाले

मी मधुवन मी मुरली
कुंजवनी जी भरली
एकातुनी मी अनेक वेष नटुनी आले

खेळेल का देव माझिया,Khelel Ka Dev Majhiya

खेळेल का देव माझिया अंगणी ?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी ?

गोजिरा श्रीहरी साजिऱ्या पाऊली

येईल हासत माझिया जीवनी

सानुलेसे रूप उभे माझ्या दारी
मज मागेल का दहि-दूध-लोणी ?

साठवीन ज्यासी माझिया अंतरी
पुरेल जिवींच्या आवडीची धनी

ऊठ मुकुंदा हे गोविंदा,Utha Mukunda He Govinda

ऊठ मुकुंदा, हे गोविंदा, मनरमनणा सत्वरी
सख्या दाटला तव स्नेहाचा पान्हा माते उरी

विहंग वर गगनात विहरती, गात तुला वागती
दंवबिंदूंनी नटुनी अवनी आनंदे हासती
शेवंती दरवळली रानी फुलला बघ केवडा

प्राजक्ताच्या मृदु पुष्पांचा पडला दारी सडा

धुंद वाहतो गंध, निवळले चंद्राचे चांदणे
रांगोळ्यांनी सजू लागली गोकुळिची अंगणे
गोपी यमुनाजळा चालल्या कुंभ सवे घेऊनी
वनी निघाल्या गोपालांचा श्रवणी पडतो ध्वनी


मंथन करिता द्विजननांची किणकिणती कंकणे
सडे शिंपिता व्रजबालांची रुणझुणती पैंजणे
तिष्ठती द्वारी तुझे सौंगडी वाट तुझी पाहती
हे घननिळा, हे गोपाला, तुजला आवाहती