Showing posts with label L-अशोक पत्की. Show all posts
Showing posts with label L-अशोक पत्की. Show all posts

ही युगायुगांची नाती HI YUGAYUGANCHI NATI

ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती

सागर ही थांबे तेव्हा त्या एका थेंबासाठी

अधिऱ्या लहरी तालावरी नाचती

मेघांच्याही मनी कसे सातरंग हासती

वारा हळवा झुळूझुळू वाहतो

मोहरून पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतो

लाटा सागराला साद देती


रुपेरी वाळूवरी सोनियाचा बंगला

बांधताना प्रीतीमध्ये जीव माझा गुंतला

सागरी तळाशी एक वेडा शिंपला

घरकुल मोतियांनी सजवाया थांबला

दे ना प्रेमधारा तूच स्वाती

Music -अशोक पत्की, ASHOK PATKI
Singer -अनुराधा पौडवाल - सुरेश वाडकर ANURADHA PAUDAWAL-SURESH WADAKAR
Movie / Natak / Album -वाजवा रे वाजवा VAJAVA RE VAJAVA 

राधा ही बावरी हरीची,Radha Hi Bavari

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

तू सप्तसूर माझे,Tu Sapta Sur Majhe



तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे
माझे मला आले हसू आकाश झाले ठेंगणे
निमिषात सारे संपले हुंकार ये प्रितीचा


तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या
माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या
हे हासणे अन्‌ लाजणे हा खेळ ऊन पावसाचा

अस्मिता,Asmita

सावलीही अशात हसते
ठावठिकाणा माझा पुसते
मीच मला मग शोधत बसते

बोल मला तू हळुवार काही
सांग भले तू माझा नाही
कलीयुगातली मी मीराबाई

मौनातले हे शब्द बोलके
तुझ्या नि माझ्या ओठी हलके
असुनि नयनी अश्रू पोरके

क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा

देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....

जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती
होती सच्ची माझी प्रीति

क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....