Showing posts with label M-नीळकंठ अभ्यंकर. Show all posts
Showing posts with label M-नीळकंठ अभ्यंकर. Show all posts

हवे तुझे दर्शन मजला,Have Tujhe Darshan Majala

हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी
प्रभू तुझ्या दारी आलो, हो‌उनी भिकारी

नको देउ पैका अडका, सोनियाचि खाण
माझ्या मुखी तव नामाची, पडू नये वाण
घडो तुझी सेवा म्हणुनी, आज रामपारी

एकनाथ, तुकया, गोरा, कबीर, सुदाम
जनाबाई, सखु, मीरेच्या मुखी तुझे नाम
तयापरी झालो वेडा, धाव रे मुरारी

प्रेमगाठ बांधुनि केली, अंतराचि झोळी
दोन करांची मी धरिली, तुझ्यापुढे थाळी
कृपाप्रसादाची तुझिया, घ्यावया शिदोरी

रे तुझ्यावाचून काही,Re Tujhyavachun Kahi

रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही ।
रे तुझ्यावाचून दुनिया दीन ही होणार नाही ॥

गर्व तव हा व्यर्थ, मी केले असे, केले तसे
चोच देई पाखरांना, तोच चारा देतसे
एकही घरटे तुझ्याविण मोडुनि पडणार नाही !

तानसेनावाचुनि, किंवा सदारंगाविण
काय मैफिल या जगाची रंगली केंव्हाच ना ?
कोण तू ? तुजवीण वीणा, बंदही होणार नाही !

बलमा आये रंगीले,Balama Aaye Rangile

बलमा आये रंगीले
रसीले बादल सावनके

नटखट चंचल नाचे बिजुरियाँ
गीत खुशीके गाये नदियाँ
आंचल हरियाला झलके

भीगी भीगी रातमें रसियाँ !
मिठी मिठी कि जै बतियाँ
कुंज कुंज महके !

जाशि कुठे नवनित-चोरा,Jashi Kuthe Navneet Chora

मुरलीधर चित्तचकोरा रे
जाशि कुठे नवनित-चोरा रे

आज तुझी ना होईल सुटका
फोडुनि बघ तू गोरस-मटका
किती करशिल शिरजोरी असता,
तुझ्या भोवती घेरा रे

असेल राधागौळण वेडी
करू नको अमुच्याशी खोडी
सांगताच येईल यशोदा,
हाती घेउनि झारा रे

ऐक सांगते अता शेवटी
मंजुळ पावा धरुनी ओठी
घुमवशील तेव्हाच तुला रे,
सोडू नंदकुमारा रे

गुन-सागर गंभीर,Gun-Sagar Gambhir

गुन-सागर गंभीर दयामय
श्री गुरुदेव महान्‌ !

सूर-ताल-लय-तान-गान के
किमयागार सुजान !


अनुशासन-पालनमें मन जो
उनका शैल-समान !

वही भरा है प्रेमभावसें
कोमल फूल-समान !

कशि केलीस माझी दैना,Kashi Kelis Majhi Daina

कशि केलीस माझी दैना
मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना,

मला तुझ्या बिगर करमेना !

तू राघु तुझी मी मैना
माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना,
चैन पडेना, मला तुझ्या बिगर करमेना !

तू हकीम हो‍उनि यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक , मिठीचा लेप, मजसि सजणा,
मनमोहना, मला तुझ्या बिगर करमेना !

एकलीच दीपकळी मी,Ekalich Deepkali Mi

एकलीच दीपकळी मी अभागिनी
स्नेहाविण केवि जगू विजन काननी ?
माझिया न संगतीस या इथे कुणी
प्रेमास्तव तळमळते मी वियोगिनी !
देवा, मी ओवाळू प्रीतिने कुणा ?
कोणाला सांगावी मूक वेदना ?
काहीही अर्थ नुरे रुक्ष जीवनी !

अहो इथं मांडिला इष्कबाजीचा,Aho Ithe Mandila

अहो इथं मांडिला इष्कबाजीचा श्रृंगाराचा हाट
मोल पुरेसे मोजा आणिक खुशाल लावा हात

माल मांडला नवा नवा, गाल नरम जणू गरम खवा
हा ओठांचा शराब पेला भरला काठोकाठ !

नारिंगाची रसाळ जोडी, बघा रसरसते तयात गोडी
तुमचे जपतप फळास आले, सुबक तयाचा घाट !

मदन धनूसम भुवई छान, लखलखते नयनांचे बाण
काय हवे तुज बोल राजसा ! नको उद्याची बात !

अनंता अंत नको पाहू, Ananta Anta Nako Pahu

आलासी तू ऐकूनि धावा, काय तुला देऊ ?
अनंता, अंत नको पाहू

अतिथी अचानक आश्रमि आले, ज्या समयी नच काही उरले
तशात म्हणती भूक लागली, कशि मी समजावू ?

दहि दूध लोणी मागु नको रे, रिते घडे तुज दिसतिल सारे
धुतल्या थाळीवरी पान ते नकोस तू ठेवू

कसे मागसी इतुके देवा? मजसि गमे ना कुठला कावा
योगेश्वर तू अंतर्ज्ञानी थोरवि किति गाऊ ?