मन तळ्यात मळ्यात Man Talyat Malyat


मन तळ्यात मळ्यात
मन तळ्यात, मळ्यात,
जाईच्या कळ्यांत

मन नाजुकशी मोतीमाळ,
तुझ्या नाजुकशा गळ्यात

ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी तशात

इथे वार्‍याला सांगतो गाणी, माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात

भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात

माझ्या नयनी नक्षत्र तारा
आणी चांद तुझ्या डोळ्यांत

Lyrics - Sandeep Khare
गीत    -    संदीप खरे
Music - Sandeep Khare
संगीत     -     संदीप खरे
Singer - Shailesh Ranade
स्वर    -     शैलेश रानडे
Album - Diwas Ase ki...
अल्बम    -    दिवस असे की ....

No comments:

Post a Comment