Showing posts with label L-वसंत कानेटकर. Show all posts
Showing posts with label L-वसंत कानेटकर. Show all posts

स्वप्नात पाहिले जे ते राहू,Swapnat Pahile Je Te Rahu

स्वप्नात पाहिले जे ते राहू देत स्वप्नी
हे सत्य स्वप्नरंगी मी ऐकिले सुरांनी

मी पाहिले दिठीने लावण्य एक दैवी
त्या शामसुंदराला जी धुंद करिल देवी

परि आस या मनाची हा एक ध्यास देवा
लावण्य हेच दैवी माझे मला मिळावे
माझे मला मिळावे..... माझे मला मिळावे

साद देती हिमशिखरे,Saad Deti Himshikhare

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची
क्रमिन वाट एकाकी ब्रम्हसाधनेची

कैलासाचा कळस ध्वज कौपिनाची
अढळ त्या धृवावरती दृष्टि यात्रिकाची
मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची

स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे
वाटते आता होते पतन या मनांचे
मृगजळात का भागे तृषा तृषार्ताची ?

नको विसरू संकेत,Nako Visaru Sanket

नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा

दिवस मावळता धाव किनाऱ्याशी
तुझे चिंतन मी करिन तो मनाशी !

देवाघरचे ज्ञात कुणाला,Devagharache Dnyat Kunala

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम ?
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम

मी निष्कांचन, निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम?

जन्म दिला मज ज्यांनी,Janma Dila Maj Jyani

जन्म दिला मज ज्यांनी, घडिले हे मन ही काया,
आटली का त्यांची माया ?

जये सारिका एक चिमुकली जपली तळहाती
तेच का पंख तिचे खुडती ?

मज आस न दुसरी लाभावा ऋषिवर,
आश्रमी रमावे संसारी सुंदर !
मग स्वर्गहि भुलुनि येईल या भूवर !

पुण्याईने ज्यांच्या लाभे दैवत या हृदया
निमाली त्यांची का छाया ?

चंद्र हवा घनविहीन,Chandra Hava Ghanavihin

चंद्र हवा घनविहीन मला
शाम घनांकित होता तो शूल
व्यथेचा गगनास

विमल तव देई सहवास
जीवनात कल्पलता बहरण्यास

गुंतता हृदय हे,Guntata Hriday He

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

या इथे जाहला संगम दो सरितांचा

प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता, डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी

कृष्णा कशी रे लागली,Krishna Kashi Re Lagali

तुझिया बोटाला,
कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार ?

माझ्या मंदिरी नाही एकही चिंधी, शालू शेले अपरंपार !
तुझिया बोटला !

दारी धावली कृष्णा ऐकुनी श्रीकृष्णाची हाक
करांगुलीचे रक्त पाहुनी कळवळली क्षण एक
डोळा ये पाणी, फाडिली जरतारी पैठणी
तुझिया बोटाला !

अशी सखी सहचरी,Ashi Sakhi Sahachari

अशी सखी सहचरी प्रणयिनी । शिवसुंदर मोहिनी
वरिन मी तीच जन्मयोगिनी

वीज कडाडे नयनी एका

दिठीत दुसऱ्या शरदचंद्रिका
सूर जिचे मज जाळित जाती आणि फुले कमलिनी

बिल्वपत्र राउळात
रातराणी काळजात
गीत मदिर परी भाव मधुरतर, अशी दिव्य योगिनी

अर्थशून्य भासे मज हा,Artha Shunya Bhase Maj Ha

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा; खेळ कल्पनेचा

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा

आनंद सुधा बरसे, Aanand Sudha Barase

आनंद सुधा । बरसे, झाली धुंद अमृतघन बरसात
चरणी पावन फुले । स्वर्ग या विजनात
रसमय मंजुळ गीत गात मानस भरे
कमलदली जशी पुनवरात .....