Showing posts with label य. Show all posts
Showing posts with label य. Show all posts

योग्य समयिं जागविलें,Yogya Samayi Jagavile

योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
लंकेवर काळ कठिण आज पातला

पाप्याप्रति आत्मघात
दुष्कर्त्म्या नरकपात
अटळचि जो नियतीनें नियम योजिला

तव मानसिं आत्मगर्व
विषमय तव आयु सर्व
बोधशब्द कधिं न मधुर तुजसिं लागला

विभिषणकृत सत्यकथन
अप्रिय परि पथ्य वचन
झिडकारुन एक आप्त तूंच हरविला

मंदोदरि विनवी नित
हित गमलें तुजसि अहित
भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला

पाहुनिया देश समय
पडताळुन न्याय, अनय
कार्याप्रति हात कधीं तूं न घातला

मनिं आला तो निर्णय
ना विचार वा विनिमय
सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला

प्रिय तितकें ऐकलेंस
अप्रिय तें त्यागिलेंस
यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला

उपदेशा हा न समय
लंकेशा, होइ अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला

बोलवि मज बंधुभाव
रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्वीला

सहज वध्य मजसि इंद्र
कोण क्षुद्र रामचंद्र !
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्निला

वचन हाच विजय मान
करि सौख्यें मद्यपान
स्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला

योगी पावन मनाचा,Yogi Pavan Manacha

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रम्ह, दोरा ॥
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

योगियां दुर्लभ तो म्यां,Yogiya Durlabha To Myaa

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥

देखिला देखिला माये देवाचा देवो ।
फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥

अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि ।
बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥

येशिल येशिल येशिल राणी,Yeshil Yeshil Yeshil Rani

येशिल येशिल येशिल राणी; पहाटे पहाटे येशिल ?
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन दोशिल ?

ओलेती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू
तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू
प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल ?

चंद्र मावळेल वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा
कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा
भानात नसून गालात हसून ललाट चुंबन घेशिल ?

वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी
कोणाला दिसेना, असू दे असेना, मीलना एखादा साक्षी
धुक्याने ढगांना झाकून टाकता मुक्याने माझी तू होशिल ?



येशिल कधी परतून,Yeshil Kadhi Paratun

येशिल कधी परतून ?
जिवलगा, येशिल कधी परतून ?

वाट पाहू किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?

हिरवे सोने हे दसऱ्याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला ? गेले बाई भिऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?

भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
जिवलगा, येशिल कधी परतून ?

येथोनी आनंदू रे,Yethoni Aanandu Re

येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

महाराजाचे राऊळी ।
वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज झाली ।
प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनी नाम ।
पाहता मिळे आत्माराम ॥४॥



येतिल कधि यदुवीर,Yetil Kadhi Yaduveer

येतिल कधि यदुवीर-सखये ।
मानस होत अधीर ॥

कटु वदले मी, रुसवा केला
म्हणुनि जिवाचा जिवलग गेला
सोडूनि हे मंदिर ॥

विरहाचा वैशाख तापला
शांत सुशीतल चंद्र लोपला
कोठे धीर समीर ? ॥



येणे-जाणे का हो सोडले,Yene Jane Ka Ho Sodale

येणे-जाणे का हो सोडले, तोडले नाते
पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते

सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव
लागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव
मानिती मला मामंजी, मानतो गाव
चालते खालती बघुन जपून बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या शपथ घालते

नऊवार नेसते निसून अंगभर चोळी
तुळशीस घालते पाणी उठून येरवाळी
तुकोबाची गाथा वाचते फावल्या वेळी
रात्रीस होई उलघाल, आसू ढाळते
पहिल्यावाणी येत जा सख्या शपथ घालते

ध्यानात पुन्यांदा येतो परताचा सोपा
माहेरच्या मळ्यातील सांज हळदीचा वाफा
ओसाड जुने देऊळ, पांढरा चाफा
तुझ्यापाशी आज जिवलगा उघड बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्या शपथ घालते



येणारा दिवस मला,Yenara Divas Mala

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच !
जाणारा दिवस मला जाताना डसणारच !

वरवरच्या बोलण्यात गेली बघ सरून रात
मावळता चंद्र मला नाव तुझे पुसणारच !

देताना हृदय तुला केला मी हा विचार
घेणारा घेणारच ! देणारा फसणारच !

हारूनही लाखवार माझी झाली न हार
मी माझ्या स्वप्नांना फिरफिरून पिसणारच !

माझे घर वाऱ्याचे अन्‌ पायच पाऱ्याचे
मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच !

काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच !

येणार नाथ आता,Yenar Nath Aata

ओठांत हाक येते सानंद गीत गाता
येणार नाथ आता !

मी पाउले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
लग्नात लाभलेला हो स्पर्षभास हाता !

आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत
सारे मुहूर्त आले एका खुळ्या मनात
धारेत अमृताच्या गेला भिजून माथा !

आता नका क्षणांनो, दोघांत भिंत घालू
स्वर्गासवे मला द्या भूमीवरून चालू
ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता !



येणार तू येणार तू,Yenar Tu Yenar Tu

तुझिया स्वागता उभी समोरी, पाहुनी हसणार तू -
येणार तू, येणार तू !

अंगणात या फुले मोगरा
तुज आवडतो ज्याचा गजरा
आठवता मी लाज लाजते, उगा तयातून येणार तू -
येणार तू, येणार तू !

साडी ल्याले आज अबोली
तुझी आठवण जागी झाली
वसंत फुलला शिषिराकाळी, मुकेपणी वदणार तू -
येणार तू, येणार तू !

दर्पणात या तुला पाहते
तुझीच प्रतिमा हृदयी ठसते
तुझ्या संगती गाली हसते, मला कधी मिळणार तू ?
येणार तू, येणार तू !

येग येग विठाबाई,Yega Yega Vithabai

येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥



येऊ कशी प्रिया,Yeu Kashi Priya

येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना

सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी, वाळूवरी, सांग ना
कशी प्रिया, सांग ना

काजळकाळी, रात निराळी, मी तर भोळी, येऊ कशी, सांग ना ?
कशी प्रिया, सांग ना

येते तुझ्या सवे, येते? ना ना ना
येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना

Yeu Kashi Priya Sawe Tuzhya Asha Kshana'na


Sanj Sakali Katarweli Sagarkathi Waluwari Sang Na
Kashi Priya Sang Na


Kajalkali Ratra Nirali Me Tar Bholi Yeu Kashi Sang Na
Kashi Priya Sang Na


Yete Tuzhya Sawe Yete Na Na Na
Yeu Kashi Priya Sawe Tuzhya Asha Kshana'na

येऊ कशी तशी मी,Yeu Kashi Tashi Mi

नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुडं बांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला हो,
येऊ कशी तशी मी नांदायला

सण वर्षाचा आहे दिवाळी
आज ऱ्हावू जाऊ उद्या सकाळी
जेवन करते पुरणाची पोळी
भात मी घातलाय रांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं ?
उन्हतान्हात चालण्याचं त्रास
दिल्याति चपल्या सांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
आई गेली पाणी शेंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

तुम्हाला सजना सांगत्ये ऐका
चालावू नका तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
श्रावण लागलाय सुंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

येऊ कशी घन:श्याम,Yeu Kashi Ghanshyam

येऊ कशी घन:श्याम ?
काय करू मी काही सुचेना आता घरचे काम !

जादुभरी ती तुझी रे मुरली, लावी वेड जीवाला
तूच आता रे सांग श्रीधरा समाजाऊ कशी रे मनाला
आतुरले मन तुज भेटाया नाही जीवा आराम !

तुजवीण भासे सुने सुने हे गोकुळ सारे मजला
अंत नको रे पाहू आता दर्शन दे राधेला
दिनराती मी जपते आहे मुखी तुझे रे नाम !



ये रे ये रे पावसा रुसलास,Ye Re Ye Re Pavasa

ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?

झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?

गार गार वाऱ्यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?

धड धड धुडुम कानात बसले दडे
काळ्या काळ्या मेघांचे डोंगरकडे
टप टप पडतील थेंबांचे सडे
पाणि, पाणि पाणीच मग सगळीकडे !

धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आता हसतोस का ?

ये मौसम है रंगीन,Ye Mausam Hai Rangeen

ये मौसम है रंगीन, रंगीन शाम
सनम्‌ने दिया जो मुहोब्बतसे जाम

जादूभरी लुत्फे मैं क्या कहूँ ?
रसिली नजर का असर क्या कहूँ ?

हमें आसमॉंसे है आया पयाम
खुदा मेहरबॉं हैं, न सागरको थाम

ओ मीनाकुमारी ! तुझे है कसम
पिलाके भुला दे ये दुनियाके गम

बहुत प्यास है, और जवानी है कम
जुबॉं पे है दिलदार तेराहि नाम

सफरमे न आयेगा ऐसा मुकाम
करते फरिश्ते है झुकके सलाम

ये निद्रादेवी,Ye Nidradevi

ये निद्रादेवी
तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी

घाव घेऊनी शोककथांचे
अंगावरती वण मुक्या व्यथांचे
वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी

दु:खभागल्या या डोळ्यांवर
चंदनशीतल घालुन फुंकर
थकलेल्या या दिठिस उद्याची सुखस्वप्ने दावी

कृष्णे तुझिया मांडीवरती
लाभु देत या लव विश्रांती
साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी

ये ना सजली स्वप्ने नयनी,Ye Na Sajali Swapne Nayani

ये ना, सजली स्वप्ने नयनी !
येना ये ना, ये ना, ये ना

हसती लहरी चंद्र बघुनी
उमले कलिका भ्रमरा भुलुनी
झुरते मिलना हळवी रजनी
ये ना सजली स्वप्ने नयनी !

मेघामधुनी खुणवी बिजली
नवख्या हृदयी धुंदी भरली
घे ना जवळी अपुली म्हणुनी
ये ना सजली स्वप्ने नयनी !

कितिदा विनवू तुजला अजुनी?
जळते अधिरा विरही हरिणी
क रे छळिसी सारे कळुनी ?
ये ना सजली स्वप्ने नयनी !

ये तिमिरा शांतवाया,Ye Timira Shantvaya

ये तिमिरा शांतवाया
हृदयीच्या भावना या

दूर झणी ने चंद्रमा
खुडूनी टाकी तारका

सगी सोयरी झापड सारी
दो दिवसांची जादुगिरी
ये लोपी लोका या
दे साथ असहाया