Showing posts with label M-राम कदम. Show all posts
Showing posts with label M-राम कदम. Show all posts

आनंद आगळा ANAND AGALA

कोण्या कुमारीकेला सर्वस्व दान केले
आनंद आगळा हा मी आज मुक्त झाले

आला अतिथ दारी त्या पाहुणेर झाला
माझ्याच कुंकवाचा त्या मी अहेर केला
माझे चुडे दिले मी, ते हात गौरविले

माझी कळी जळाली फळ लाभले दुजीला
दिधलास ईश्वरा तू तो जन्‍म धन्‍य झाला
मरणाविना मनाचे सुखदु:ख रे निमाले

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADGULKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -रंगपंचमी RANGPANCHAMI

उठा उठा हो सूर्यनारायणा UTHA UTHA HO SURYNARAYANA

उठा उठा हो सूर्यनारायणा

थांबली सुवासिनी पूजना

किरणहार हे गुंफित आली

उषासुंदरी धुक्यात न्हाली

नवरंगांची उधळण झाली गगनाच्या अंगणा

विझल्या तारा, वाहे वारा

शोधीत पक्षी चिमणा चारा

घरोघरीच्या अमृतधारा भूषविती गोधना

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -वाणी जयराम WANI JAYARAM
Movie / Natak / Album -सून माझी सावित्री SUN MAZI SAVITRI

काय ग सखु KAY G SAKHU

काय ग सखु
बोला दाजीबा
काय ग सखु बोलू का नकु
घड़ीभर जराशी थांबशील कां ?
गोड गोड माझ्याशी  बोलशील कां ?
काय ग सांगू बाई ,लई मला घाई
दाजीबा थांबायला येळच न्हाई 
येळच न्हाई  ?
दाजीबा थांबायला येळच न्हाई 

डोईवर घेऊन चाललीस काई ?
डोईवर पाटी ,पाटित भाकरी
भाकरीवर तांब्या 
तांब्यात  दूध हाय गाईचं 
गाईचं व घेता का दाजीबा वाईचं 
काय ग सखु
बोला दाजीबा

काय ग सखु रागवू नकु
घड़ीभर जरा थांबशील कां
चाललीस कुठ तू सांगशील कां
रानाच्या वाटं घेताय भेट 
दाजीबा तुमच वागणंच खोटं  
वागणंच खोटं !

पहाटेच्या  पारी तूं चललीस कुठं 
पहाटेच्या पारी उठुन लौकरी
घेऊन न्याहरी
जाते मी पेरुच्या बागात
बागात व येऊ नका दाजीबा रागात

काय ग सखु ?
बोला दाजीबा !
आडवा तू येऊ नको
पाठं  पाठं  जाऊ नको घरला जा
लई वंगाळ बाई ,हिचा राग ठावा न्हाई
अरं जा जा जा जा जा

काय ग सखु घाबरू नकु
घड़ीभर जरा थांबशील कां
मनातं काय तुझ्या सांगशील कां 
काय ग सांगू बाई कसचं होतं  
मनातं माझ्या भलतंच  येतं  
काय ग सखु तुझ्या मनातं येतं  
दुखतयां कुठं कळंना नीट    
लाज मला वाटं
दाजीबा तुम्हाला माहित
माहित व येता का दाजीबा आमराईत
चल ग सखु
जावा दाजीबा
अहो ! जावा दाजीबा


Lyrics - दादा कोंडके DADA KONDAKE
Music -राम कदम RAM KADAM
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -सोंगाड्या SONGADYA

अरं पावन्या तूं AR PAVANYA TU

अरं पावन्या तूं कुण्या गावचां
कुण्या गावचां  !
तुला टिकिट दिलं कुणी
ह्या गावचां ह्या  गावचं !

ह्या गावचां वारं तुला
सोसायचं न्हाय तुला
सोसायचं न्हाय
ह्या गावचं पाणी तुला
पचायचं न्हाय तुला
पचायचं न्हाय
हे भावलं दिसतंय

कोल्हापुरचं हे कोल्हापुरचं,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या  गावचं !

तुला माझ्याशी टक्कर
झेपायची न्हाई रं
झेपायची न्हाई
इथल्या हिरीवर चक्कर
मारायची न्हाई रं
मारायची न्हाई
अरं बापया तुला कसं  शिकवायचं
कसं  शिकवायचं ,पावनं
तुला टिकिट दिलं कुणी ह्या  गावचं !

आता जा रं गुमानं 
घे माझा रामराम
आरं कोल्हपुरवाल्या
तुला करू सलाम का करू सलाम
मी जेवान जेवलंय बरशाचं 
तुझ्या  बरशाचं,पावनं   
तुला टिकिट दिलं कुणी ह्या  गावचं

Lyrics -ज्ञानेश पुणेकर  GYANESH PUNEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी   KADDAKLAKSHMI

मी भिजून पूरी MI BHIJUN PURI

मी भिजून पूरी आता झाले ओली
चल पाण्यावर तरंगत न्हाऊ
रागारागानं नको रे पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

आली मनात जाग पेटली उरात आग
रानमाळावरी खुलून आलीया बाग 
जरा भुंग्यांची गमंत पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

आज कसलं तुझ्या वेड आलं मनी 
उशीर झाला किती कसं नाही ध्यानी
माझ्या मार्गात नको ग येऊ
रागारागानं नको रे पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

का रे माझ्या ,रुसला कशापायी
वारा झोंबतो मला जरा कर घाई 
कसा समाजाऊं असा येडा ह्यो पोर 
तुझ्या खेळापाई माझा खचतो ग धीर  
तुला उचलू का कडेवर घेऊ
रागारागानं नको रे पाहू
घडीभरानं घरला जाऊ

Lyrics -उमाकांत काणेकर UMAKANT KANEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर ,सुरेश वाडकर USHA MANGESHKAR,SURESH WADAKAR                    
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी  KADAKLAKSHMI

लाज लाजुनी मी LAJ LAJUNI MI

हिरवा शालू हिरवी चोळी
हिरवा चुडा मी ल्याले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

जोडिनं बसता लग्नाला 
मांडी लागली मंडीला
चटकन त्यांनी चिमटा काढला
बावरून मी गेले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

होमा भवतिनं फिरताना 
हात हातामधी धरताना
गचकन त्यांनी हात दाबला
भलतेच केले चाळे
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

रंग खेळता हातनं
विडा तोडिता दातानं 
कचकन त्यांनी ओठ चावला
अंग शहारुन आले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

पहिल्या राती मी रंगात
चंदनाची चोळी अंगात
गपकन त्यांनी मीठी मारिता 
शिनगारात मी न्हाले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले


Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -चंदनाची चोळी अंग अंग जाळी CHANDANACHI CHOLI ANG ANG JALI

उधार उसनवार मागू नका UDHAR USANWAR MAGU NAKA

उधार उसनवार मागू नका
भलतेच वायदे सांगू नका
छंद माझा नेकीचा
हाय नेकीचा
व्यापार करते रोखीचा
मी व्यापार करते रोखीचा

तुमची ती माझी ख़ुशी
देशी असो वा परदेशी
पिढ़या पिढ्यांचा धंदा माझा
किरकोळ नाही, ठोकीचा 

सगळ्यांसाठी माझाच मेवा
दुनियेची मी करिते सेवा
जळत्यात  त्यानां खुशाला 
कारभार माझा चोखीचा

हिशोब कशाला करताय नाना
जावा की इसरुन जुना जमाना
ठासून भरलाय बरं माल मी
तुमच्या माझ्या एकीचा

Lyrics -उमाकांत काणेकर UMAKANT KANEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी KADAKLAKSHMI

चंदनाचे दार माझे CHANDANACHE DAR MAZE

दॄष्ट लागावी हे असे
भाग्य आले हे घरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

उजळल्या दाही दिशा 
न्हावुनिया आली निशा
दीप नक्षी कोरताना
तेज आले अंबरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

आगिन फुलाची नक्षी
माझ्या पदरावरती जडवा हो
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो
फटाकडीचा लवंगी चटका
भुईचक्राचा लावा फटका 
नयन बाणांची आतषबाजी
दिलावरी भिड़वा हो
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो

भाग्य लेणं लेऊनी मी
वाण हाती घेऊनी
संसार मी मांडताना
हात होई लाजरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

गरम गुलाबी नवी नव्हाळी  
रात जागुनी करा दिवाळी
मदन राजाच्या शीनगराची
नशा मला चढवा हो 
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो

निरांजन लोचनी
दोन ज्योती लावुनी
अशी ओवाळींन देव आज आले मंदिरा 
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा


Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम  RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर , शोभा जोशी  USHA MANGESHAKAR,SHOBHA JOSHI
Movie / Natak / Album -लक्ष्मी  LAKSHMI

पंचरंगी हे नवीन पाखरू PANCHARANGI HE NAVIN PAAKHARU

पंचरंगी हे नवीन पाखरू
आलंय गावात
रूप रंगाचं तीचं बघुन मी  
पडलोय चक्रात

तशीच झालीया गत हो माझी
दिसता तुम्ही राया
अन कांही सुचेना अन्न रुचेना
दिस जातो वाया

बोल ग राणी मंजुळवाणी 
येऊन बस जरा अशी
इष्काचा ह्यो भरला पेला 
लज्जत कर खाशी

नव्या वळखीचा नवा बहाना
सारयास्नी का सुचतो 
अन हौस भागता चार दिसांनी
कट्टाळा  का येतो 

ये ग ये ग साळू
दोघंचखेळू 
हात हाती दयावा
गुलुगुलु बोलत संगच जाऊ
पिरतीच्या गावा

राणी ग ,राजा रं 


Lyrics -योगेश  YOGESH
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -थापाड़या  THAPADYA

काळ्या ग आईचं KALYA G AAICH

काळ्या ग आईचं ,हिरव्या ग मायेचं  
डुलत रान बाई ,झुलं ग रान

तळयाच्या येण्यात ,रंगाच्या खेळात 
गार गार सावलीत हरत ग भान
वारयचा चाव्याची, साखर खव्याची  
कोकिळ कंठाची सुरेली तान

केतकी बनाची हळदी उन्हाची
झुळझुळ गाण्याची नाही ग वान 
सळसळ पानात रानाच्या गाण्यात
नशीब बोलीची नाही ग वान

डोंगर दरयात नाचरया झरयात   
शिवारी तुरयात मोत्याचं दान  
पाऊस पाण्याचं केशरी गंधाच
दैवाच्या देण्याचं सुंदर ध्यान


Lyrics -योगेश  YOGESH
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -राखनदार RAKHANDAR

आज गालात खुदकन हसले AAJ GALAT KHUDAKAN HASALE

आज गालात खुदकन हसले
बाई हसले ,हुं    हुं     हुं     कां ?
काल पिरतीच्या वारुवरी
मी    बसले   बाई     ग
आ       आ      आ

या वारूचा गुलाबी रंग
दोन्ही बाजुला सपनांचे पंख
चाल याची दुडकी ग
नजर ह्याची लाडकी
,हुं    हुं     हुं
ह्याला बघून मी बावरले
ग ह्याला बघून मी बावरले
काल पिरतीच्या वारुवरी
मी    बसले   बाई     ग

आ       आ      आ
भान हरपून गेलं मनाच
कोड़े सुटेना तरुणपणाचे
काय कुणा सांगू मी
काय मागु मी
माझ्या काळजात काहीतरी डसलय
आं   ?
माझ्या काळजात काहीतरी डसलय
काल पिरतीच्या वारुवरी
मी    बसले   बाई     ग





Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम  RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -वारणेचा वाघ  WARANECHA WAGH

रुणुझुणुत्या पाखरा RUNUJHUNUTYA TYA PAAKHARA

रुणुझुणुत्या पाखरा
जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी
तिला लिंबलोन करा

गवर गौरी ग गौरी ग
झिम्मा फुगड़ी खेळु  दे
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे

मी हो बहीन लाडकी
हेच पानाच्या तबकी
दिली कुर्हार्डीची ओवळणी
तोच भाऊ खरा
माया ममतेची ममतेची
आई मला भेटु दे
माहेरपनाच ,पणाच
रुनुझुनूत्या पाखरा

गवर  गौरी ग गौरी ग
झिम्मा फुगड़ी खेळु  दे

कशी माहेरला येऊ
शिवेवरी उभा भाऊ
गेला उगड मातेची
ओटी भरून माघारा
जीव लावुनी जीवाला
टीळा लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जन्मात
नदी भेटु दे सागराला
रुनुझुनूत्या पाखरा



Lyrics -जगदीश खेबुडकर   JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -टिळा लाविते रक्ताचा TILA LAWITE RAKTACHA

अहो राया चला AHO RAYA CHALA

रात अशी बहरास राजसा
तुम्ही नका ना रुसू
अहो राया चला
घोड्यावरती बसु

अहो राया चला,घोडयावरती बसु
घोडयावरती बसू
नवा देखना आणा घोडा
जीन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकिब खाली सोडा
उगा वाटत खूप फिराव
नकाच काही पुसु
अहो   नकाच काही पुसु
अहो राया चला,घोडयावरती बसु

अहो राया चला,घोडयावरती बसु
घोडयावरती बसु
मंदिल चढ़वा बांधा शैला
उचलून घ्या ना पुड्यात मजला
हलक्या हतान विळखा घाला
मिठीत येईल पुनम नभीची
कसल आल हसु
 अहो  कसल आल हसु
अहो राया चला,घोडयावरती बसु
अहो राया चला,घोडयावरती बसु
अहो राया चला,घोडयावरती बसु

Lyrics - दादा कोंडके  DADA KONDKE
Music - राम कदम   RAM KADAM
Singer - उषा मंगेशकर  USHA  MANGESHAKAR
Movie / Natak / Album - सोंगाडया  SONGADYA

संपले जीवन संपली,Sampale Jeevan Sampali

संपले जीवन संपली ही गाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा

उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा

चुकलो-माकलो नको राग देवा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
पडो देह माझा तुझे गुण गाता

नको जिणे झाले मिटु दे हे पान
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता

सुख भरुन सांडते,Sukha Bharun Sandate

सुख भरुन सांडते घरिदारी
मज काय उणे या संसारी ?

गंगेहुन मन निर्मळ, प्रेमळ
सासू नच ही माता केवळ
कर वत्सल फिरता पाठिवरी
मज काय उणे या संसारी ?

जशि वाऱ्याची झुळुक अनावर
नणंद तैशी गोड, खेळकर
उतरला स्वर्ग या भूमिवरी
मज काय उणे या संसारी ?

पूर्वपुण्य मम ये साकारुन
पतिचरणांचे घडले पूजन
ही जोड मिळावी जन्मभरी
मज काय उणे या संसारी ?

सुकुनी गेला बाग,Sukuni Gela Baag

सुकुनी गेला बाग !
आठवणींच्या मुक्या पाकळ्यां, पडल्या जागोजाग !

आज फुलांतुन सुगंध उडले
पाचोळ्यातच पाउल बुडले
जुन्या हरवल्या पाउलवाटा, कसा काढणे माग ?

त्या तरुखाली एकामेकां
दिल्या घेतल्या आणाभाका
पानांसंगे आशा जाळित, ये ग्रीष्माची आग !

पालवीतली विटली नक्षी
झाडांवरती मुकेच पक्षी
गीत गळ्यातच गुदमरले त्या, पुन्हा न येई जाग !

सावधान होई वेड्या,Savadhan Hoi Vedya

साधु संत सांगून गेले, त्याचा बोध घेई
सावधान होई वेड्या, सावधान होई

सोने आणि रुपे, अम्हा मृत्तीकेसमान
तुकाराम बोले, त्याची मनी ठेव जाण
सुखाची ही पायवाट, काट्यांतून जाई

मना सज्जनांच्या संगे, धरी भक्तिपंथ
रामदास बोले त्याची मनी धरी खंत
आभाळाच्या डोळा सारे, खेळ तुझा पाही

रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी
पापामधी झालं नाही, कुणी वाटेकरी
वाल्या कोळी नारदाच्या, लीन झाला पायी

सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा,Satyam Shivam Sundara

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हास
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतिरी, दयासागरा

हो‍उ आम्हि नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
किर्तीचा कळस जाय उंच अंबरा

सजणाच्या मर्जीखातर,Sajanachya Marji Khatar

सजणाच्या मर्जीखातर, जरासा वर, धरिला अंबाडा
उघडीच ठेवली मान, केतकी पान, सोनकेवडा !

घातला वेश पंजाबी, तंग सलवार
रेशमी खमीज अंगात सैल दळदार
झिरझिरित दुपट्‌टा वरी, टिकेना उरी, पडे तोकडा

पावडरचा मुखावर थर एक पातळ
किरमिजी रंगले ओठ, नयनि काजळ
मुळचेच गाल मखमली, चाखतो लाली, तीळ चोंबडा

ऐन्यात पहाता मुखा, सुखाची लहर
डोलते रान मोहरीचे, फुलांना बहर
असल्यात येई राजसा, चेतल्या नसा, नाचु भांगडा

शोधितो राधेला गोपाल,Shodhito Radhela Gopal

सोडुनी आपुला राजमहाल
शोधितो राधेला गोपाल

माझ्यावरती असे कोणते
घडले मायाजाल

निळ्यासावळ्या आभाळाहुन
आपुले प्रेम विशाल

शून्य गोकुळी येईल पुन्हा
हसरी सोनसकाळ