Showing posts with label L-ज. के. उपाध्ये. Show all posts
Showing posts with label L-ज. के. उपाध्ये. Show all posts

विसरशील खास मला,Visarshil Khas Mala

विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे, वचन आठवीता

स्वैर तू विहंग, अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा

रामचंद्र मनमोहन नेत्र,Ramchandra Manmohan

रामचंद्र मनमोहन, नेत्र भरुनि पाहिन काय ?

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास
सुधाधवल विमल हास, अनुभवास येईल काय ?

आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे
मम मानस-राजहंस, पुनरपि मज देशिल काय ?

जाउ तरी कोणास शरण, करील कोण दु:ख हरण
मजवरि होऊन करुण, प्रभुचं चरण दावील काय ?

अशनि राम, पाणि राम, वदनि राम, नयनी राम
ध्यानी मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय ?

कुणि काहि म्हणा,Kuni Kahi Mhana

कुणि काहि म्हणा, कुणि काहि म्हणा
अनुसरले मी अपुल्याच मना

रीत म्हणा, विपरीत म्हणा
दिले झुगारुनि आवरणा

रीति-कुरीति, नीति अनीति
आता उरली चाड कुणा ?
लोक लाज भय धरु कशाला
मागायाचे काय जना ?

जळल्या साऱ्या आशा मनिच्या
पुसल्या उरल्या त्याहि खुणा
जीव भरेना हौस पुरेना
वाढतोच घरि काम दुणा
यास्तव हा परपुरुष परिणिला
मन मिनले गोविंद गुणा