Showing posts with label L-यादवराव रोकडे. Show all posts
Showing posts with label L-यादवराव रोकडे. Show all posts

मला हवा ग असाच,Mala Hava Ga Asach

मला हवा ग असाच संसार हवा
गोड गोड खाया आणि बघाया, रोज सिनेमा नवा नवा
मला हवा ग असाच संसार हवा

अशी मिळावी सासू भांडी लागंल घासू
नवरा लई विश्वासू माझं पुशिल आसू
रुबाब माझा बघून राजा विसावा देईल जवातवा
मला हवा ग असाच संसार हवा

मानाची मोठी जावं जर खेळेल डाव
इलाज मजला ठावं नाही देणार भाव
नव्या युगाचा तो धोक्याचा दाविन तिजला दिवा दिवा
मला हवा ग असाच संसार हवा

वैभव माझं मोठं कुणि लाविल बोटं
धन्याला सांगून खोटं कुणि फुगविल पोट
भर रस्त्याला गाठून त्याला चांगलाच देईन दवा दवा
मला हवा ग असाच संसार हवा

खेळताना रंग बाई होळीचा,Khelatana Rang Bai Holicha

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

आम्ही तरण्या ग पोरी
जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी
घातला ग घेर त्यानं टोळीचा, टोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

झणि पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

मला काहि समजंना
मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना
कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा