Showing posts with label L-शाहीर होनाजी बाळा. Show all posts
Showing posts with label L-शाहीर होनाजी बाळा. Show all posts

सांगा मुकुंद कुणि हा,Sanga Mukund Kuni Ha

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

लटपट लटपट तुझं चालणं, Latpat Latpat Tujha Chalana

लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

रूप सुरतीचा डौल, तेज अनमोल, सगुण गहिना
जशी का पिंजऱ्यातील मैना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
अशी ही चंचल मृगनयना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
निर्मळ, कोमल, तेज ग जैसे तुटत्या ताऱ्याचं
चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

तू पाक सूरत कामिना,Tu Pak Surat Kamina

तू पाक सूरत कामिना, कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनीया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती

नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवी नवती तू चंद्रकळा सवती, गायनामध्ये गुणिजन सविती
कंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कंती
तुला गुणिजन अवघे चहाती

नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती

तुझ्या प्रीतीचे दु:ख मला,Tujhya Preetiche Dukha

तुझ्या प्रीतीचे दु:ख मला दाउ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे

याचे ममतेचा लोभ मला कळला आता
कुण्या ठिकाणी आहे जाउन लावा पत्ता
तिथे चालत जाइन आप अंगे स्वता
जाउन सांगा काही रानभरी हो‍उ नको रे

जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झड घालुन देतो प्राण दीपकाचे वरी
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्‍न टाकुन पदरात गार घेउ नको रे

घनःश्याम सुंदरा श्रीधरा,Ghan Shyam Sundara

घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला

सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला



घडी घडी अरे मनमोहना,Ghadi Ghadi Are Man

घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि

भरम धरिल जन तुझा नि माझा पहा पुरती चौकशी
सजणा नको रे बोलु मशि

छबिदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी अवडलीस माझ्या मना
कुठे दिसे ना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा
सजणा तुजसम रे देखणा

तुझी प्रीत लाभली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झाले पिशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि

घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि

दिसतेस चटक चांदणी अगे साजणी मनी तू ठसलीस अमुच्या गडे
छंद लागला तुझा अम्हाला रात्रंदिन फाकडे
नीज ध्यास सदा अंतरी फिदा तुजवरी घरी मी सिद्ध करुनिया विडे
घरी मी सिद्ध करुनिया विडे
एकांति मुखि घालता चकाकतील माझ्या हातातील चुडे
इश्काची चटक लागली, जीवा चांगली, रंगली वृत्ती तुजपाशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि

घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि

गोल तुझ्या शरीराचा,Gol Tujhya Shariracha

गोल तुझ्या शरीराचा डौल वर गोरा रंग नवती कवळी
वय नूतन हाती निऱ्या, चालणे चपळगती, नागीण पिवळी


अधरकुटी बत्तीस हिरकण्या एकावळी नग विराजती
ओठ शुद्ध पवळ्याचा रंग, लाजावी पाहून जावेळी ग ती

मंजूळ स्वर ऐकून कोकिळा वृत्ती बसुनी मनी गजबजती
जानु-जंघ सुकुमार पोटऱ्या अति नाजूक ग कर्दळी