Showing posts with label L-दत्ता डावजेकर. Show all posts
Showing posts with label L-दत्ता डावजेकर. Show all posts

सखे ग कृष्णमूर्त,Sakhe Ga Krishnamurt

सखे ग कृष्णमूर्त गोजिरी
ही ठसली मम अंतरी

धरी वदनी मधु बासरी
मधुर काढी सूर श्रीहरी
बावरे सृष्टि सुंदरी

कर्णात कनक कुंडले
कंठी वैजयंती ही रुळे
माणिक मुकुट शिरावरी
शोभतो हा कितीतरी
झळकते प्रभा ही बिल्वरी

तू दर्याचा राजा नाखवा,Tu Daryacha Raja Nakhava

तू दर्याचा राजा नाखवा रे नाखवा
तू दर्याच्या लाटांवर

डुले ग माझं घर
कसं चंदेरी लाटांवर
भरे मनात का हुरहूर
तू जीवाचा माझ्या रे नाखवा

राया जाऊ नको रे दूर
जणू भवती पडे अंधेर
नाचत मुरकत डौलात
आली बघ आकाशी चंद्राची कोर
तू दिलाचा माझ्या नाखवा रे नाखवा

जवा दर्याची रूपेरी मासळी
तुझ्या डोळ्यांत मजला भासली
तुझी पिरती मनामधी हसली
चल माघारी ये रे नाखवा रे नाखवा

तुज स्वप्नि पहिले रे,Tuj Svapni Pahile Re

तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला !
जमल्या ललना चतुरा
मोदे स्वागत करण्याला

आळविती कुणी सुरस रागिणी
कोमल मंजुळ वाणी
तव श्रांत वदन शमवाया
नंदकिशोरा सुखवाया
झुळु झुळु वायुहि आला


थांबति विहगहि नभि या
पसरुनि शीतल छाया
दिपतिल नयन तुझे रे म्हणुनी
रविवरि मेघमालिका जमुनी
अंजिरि पडदा महिवरि धरला

थांबते मी रोज येथे Thambate Mi Roj Yethe

थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी

बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती



मधुर स्वप्ने मीलनाची, लाविती मज वेड का ती
रंगवीण्या स्वप्न माझे, पाहिजे मज तूच रे

रंगणे ना रंगवीणे, ते तुझ्या हाती




अळविते मजला तया मी, टाकिते झिडकारुनी

अळविते तुज तान भरुनी, याचनेची रागिणी

ऐकणे ना ऐकणे रे, ते तुझ्या हाती




उपवनी सुमने उमलती, भ्रमर ते मधुगंध लुटती

हृदय-पुष्प तुला दिले, जे एकदा उमले

चुंबिणे ना चुंबिणे रे, ते तुझ्या हाती

गेला कुठे बाई कान्हा,Gela Kuthe Bai Kanha

गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना
गेला कुठे माझा राजा, राजा येईना

किती बघू वाट तरी जा ना,

जा ना, सख्यांनो कुणी
आता धीर धरवेना

सांगा माझ्या मोहना
बोलणार ना तुला पुन्हा
नको धरू राग या क्षणा

पंचप्राण माझे बाई ओवाळूनी
आलिंगीन देही धरुनी
माझ्या हृदयीचा राणा
करू नको रे पुन्हा वंचना

कुणि बाई गुणगुणले,Kuni Bai Gunagunale

कुणि बाई, गुणगुणले
गीत माझिया हृदयी ठसले

मोदभरे उमलल्या कमलिनी
शांत सरोवरि तरंग उठले


मानस-मंदीर आनंदले
रम्य स्वरांनी मोहित केले

चंद्रकरांनी क्षणोक्षणीही
अंबर अवघे पुलकित झाले

आली दिवाळी मंगलदायी, Aali Diwali Mangaldaye

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी

चला चला ग, जमुनि मैत्रिणी
गुंफु या विविध फुले मधुनी

रेखोनी रांगोळी अंगणि या
फुले चौफुले रंगी भरू या
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी

चला चला त्वरा करा

अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किति तरी !
चला चला पहातरी

हाती सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी,
आणा आणा निरांजना