Showing posts with label S-अरुण दाते. Show all posts
Showing posts with label S-अरुण दाते. Show all posts

स्पर्शाच्या गहिरया जहरची SPRSHACHYA GAHIRYA JAHARACHI

स्पर्शाच्या  गहिरया  जहरची 
ती रात्र कुसुंबी बहराची

ती डोळे जडवून
मला म्हणाली राया
वय ऐनातील हे
नका घालवू  वाया ,
त्या नजरबंदीच्या  कहराची
ती रात्र कुसुंबी बहराची

घातकी लाडकी हळूच खुणेची शीळ
चांदण्यात भिजला गालावरला तीळ
अशी मदन जोगल्या प्रहराची
ती रात्र कुसुंबी बहराच

काळीज बुडवूनी जाय गधाची लाट
हातात जडवून हात शोधिली वाट
स्वप्नांच्या धूसर शहराची
ती रात्र कुसुंबी बहराची

Lyrics -मंगेश पाडगांवकर  MANGESH PADAGAWAKAR
Music -श्रीनिवास खळे SHRINIVAS KHALE
Singer -अरुण दाते ARUN DATE
Movie / Natak / Album -गीत GEET

शहाण्याने आपुले थडगे SHANYANE AAPULE THAGADE

शहाण्याने आपुले थडगे खणावे
आणि खनताना पुन्हा गाने म्हणावे

जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा
व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे

सोबतीला राहती जखमांच अंती
लाभता सांध्यातच कोणी कणा  रे

गुंतलेले आतडे होते निरुत्तर
डोंगरातुन घोष प्रश्नांचा दुनावे

सोशिला काळोख ज्याने तोच जाने
आपुल्याला आपुला तारा कुणा रे

Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -श्रीनिवास खळे SHRINIWAS KHALE
Singer -अरुण दाते ARUN DATE

मान वेळावूनी MAN WELAWUNI

मान वेळावूनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलु नको
ऐक माझे जरा हट्ट नाही खरा
दॄष्ट लागेल गं ,दॄष्ट लागेल गं,दॄष्ट लागेल गं
मान वेळावूनी धुंद बोलू नको

आज वारा वने ,रेशमाचा झुला
ही खुशीची हवा ,साद घाली तुला
मोर सारे तुझे ,हे पिसारे तुझे
रूप पाहून गं,लाजेल चंद्र गं 
दॄष्ट लागेल गं ,दॄष्ट लागेल गं,दॄष्ट लागेल गं

पाहणे हे तुझे चांदण्यांची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी ,
लाट मोठी तुटे शीड माझे फुटे
ही दिशा कोणती ,कोण सांगेल गं
कोण सांगेल गं ,दॄष्ट लागेल गं



Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव  YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

सुर मागु तुला मी कसा SUR MAGU TULA MI KASAA

सुर मागु तुला मी कसा
जीवना तूं तसा मी असा

तू मला मी तुला पाहिले
एकमेकास न्याहाळिले
दु:ख माझे तुझा आरसा  

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा  सखा 
खेळलो ,खेळ झाला जसा


Lyrics -सुरेश भट SURESH BHAT
Music -हृदयनाथ मंगेशकर HRUDAYANATH MANGESHAKAR
Singer -अरुण दाते ARUN DATE

हिरव्या तरूराजीत तिथे HIRYA TARURAJIT TITHE

हिरव्या तरूराजीत तिथे उभी राहशील कां
 हासत होतीस पूर्वी तशी पुन्हा हासशील कां 

किलबिल तिथल्या पानोपानी फुलसारखे कोमल पानी 
वनराणी होऊन तिथे मला पाहशील कां

दे शब्दाची उधळून दौलत पूर्ण कधीही नाही उमलत
अबोध ते मौनातुन तु मला सांगशील कां 

हसरे सुंदर डोळे जडवून निळ्या जळापरी  अथांग होऊन
कधी न सुटणारे कोडे पुन्हा घालशील कां 



Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

रडतच आलो येताना RADATACH AALO YETANA

रडतच आलो येताना,पण हासत जावे जाताना
अंगावर आसुड विजेचे ,झेलून घेती घन वर्षेचे ,
सार्थक झाले कोसळण्याचे तृपित धरित्री न्हाताना

हासत हासत ज्योती जळाली ,काळोखाची रात्र उजळली ,
पहाट झाली तेव्हा नव्हती ,तेजोमय जग होताना

बीज आतुनी फुटुनी गेले ,वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलूनी घेताना

कुणी दू:खाचा घोट घेतला खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दू :खाचे झाले गाणे जीव उधळुनी गाताना

Lyrics -मंगेश पडगांवकर  MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

किती तुझावर करतो प्रीती KITI TUJHAWAR KARATO PRITI

किती तुझावर करतो प्रीती मला कळत नाही ;
इतुके उमजे सखे तुझ्याविण ,सूर जुळत नाही ;
ओ   सूर सूर जुळत नाही

सुगंध पेरीत सखे चालशी,डोळ्यांनी हळूवार बोलशी , 
तुझ्यावाचुनि मन वेलीचे ,पान हलत नाही


अशी नको तू विषण्ण राहू मिटून पापण्या तमात पाहु ,
तालासुरांना तू नसताना ,गीत मिळत नाही 

तुझ्या स्मृतिवीण क्षण जातो ,जिथे तिथे मी ,जिथे तिथे मी ,
तुलाच बघतो ,तुला सोडूनी कुठे दूरवर ,पाय वळत नाही


Lyrics -शांताराम नांदगांवकर SHANTARAM NANDAGAWAKAR
Music -अरुण पौडवाल ARUN PAUDWAL
Singer -अरुण दाते ARUN DATE

हिरव्या हिरव्या गवतावरती HIRVYA HIRVYA GAVATAVARATI

हिरव्या हिरव्या गवतावरती,
चंद्र असावा निथळत निथळत ,चांदण्यात त्या तुझे न माझे ,
प्रेम असावे उजळत उजळत !

गार सुटावा वारा आणिक मीच मला विसरावे ,
हाती घेता हात तुझे तव ,अंग असे बहरावे ,
खांद्यावरी तू मान ठेवुनी ,हळूच यावे बिलगत बिलगत !

हृदयाची ती धडधड अपुल्या हळुहळु वाढावी ,
स्पर्शातुन मी मनोव्यथा मग हळुच तुला सांगावी ,
मिठीत माझ्या तुझे न माझे ,श्वास असावे मिसळत मिसळत

नयनी तुझिया मला सखे तू ,रोज विसावा दयावा ,
स्वर्ग मुखाचा अपूर्ण क्षण तो कधीच ना संपावा
संसाराचे तुझ्या न माझ्या स्वप्न बसावे सजवत सजवत


Lyrics -सौमित्र  SAUMITR
Music -मिलिंद इंगळे  MILIND ENGALE
Singer -अरुण दाते ARUN DATE

अश्रु जलात विरली ASHRU JALAT VIRALI

अश्रु जलात विरली,गाथा जुन्या खुणांची ,
ओठावरची मिटली ,ती साद अंतरीची

धुंदावल्या मनाला होता बहार आला ,
नयनी फुले तराना कैफ़ात भारलेला
परी ओसरून गेली माया खुल्या क्षणांची

तुटण्यास का जुळल्या वाळूवरील वाटा ,
दुरात लोपल्या कां ,उसळुन दोन लाटा ,
कां पालवी जळाली फुलल्या मनोगताची

गोठून अश्रु गेले ,थिजली गळ्यात भाषा ,
प्रीतिविना  जिन्याची  नुरली मनात अशा
आता वठून गेली जाणीव जीवनाची

Lyrics -अनिल मोहिले ANIL MOHILE
Music -वंदना विटनकर  VANDANA VITANKAR
Singer -अरुण दाते  ARUN DATE

स्वरगंगेच्या काठावरती SWARAGANGECHA KATHAWARATI

स्वरगंगेच्या  काठावरती
वचन दिले तू मला
गत जन्मीची खून सापडे
ओळखले कां मला

वदलीस तूं ,मी सावित्री ती
शंकुतला मी ,मी दमयंती
नावं भिन्न परी ,मी ती प्रीती
चैतन्याचा पुर तेधवा
गंगेला पातला

अफाट जगती रज ;कण ,
दुवे निखळता,कोठून मिलन 
जीव भुकेला हा तुजवांचून
जन्ममधून पीसट फिरता
भेट घड़े आजला

Lyrics -शंकर वैदय  SHANKAR VAIDYA
Music -हृदयनाथ मंगेशकर  RHUDAYNATH MANGESHAKAR
Singer -अरुण दाते ARUN DATE

आज ह्रदय मम विशाल AAJ RUDAY MAM VISHAL

आज ह्रदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले

आज माझिया किरण करानी
ओंजळीमध्ये धरली अवनी 
अरुणाचे मी गंध लविले

या विश्वाच्या कनाकनातून
भरून राहिले अवघे मी पण
फुलाता फुलाता वीज हरपले


Lyrics -हृदयनाथ मंगेशकर  HRUDAYNATH MANGESHAKAR
Music -शंकर वैद्य SHANKAR VAIDYA
Singer -अरुण दाते ARUN DATE

रंग संध्याकाळचे गेलेत कोठे RANG SANDHYAKALACHE GELET KUTHE

रंग संध्याकाळचे गेलेत कोठे सांग ना
दयायचे आहे मला जे ,एकदा तू माग ना

दूर एकांतात येथे बोलती ही आसवे
आंधळया गावास एका साद देती काजवे
सोबतीला आज आहे तोडणारी वंचना

जानती झाली तरुची गोठणारी साउली
भास हे कवळून आली ही दिसांची काजळी
केशरी ओढ़ाळ गाणी एकदा तू छेड़ ना

बोलता ही येत नाही ,ते तुला सांगू कसे ?
ज्यात मी सुख पाहिले ते वेदनेचे आरसे ,
मी जिव्हारी झेलले ते घाव थोड़े मोज न

Lyrics -प्रवीण दवणे  PRAVIN DAWANE
Music -दीपक पाटेकर DEEPAK PATEKAR
Singer -अरुण दाते ARUN DATE

वाहणारया आसवांची WAHANARYA AASAWANCHI

वाहणारया  आसवांची,जीवनी बरसात आहे
वेदनेला अंत नाही,ही आशी सुरवात आहे 

का मला जगता ना आले,शांत हे आयुष्य साधे 
दूर ते आयुष्य गेले,राहिलो पन मीच मागे 
सोडुनिया हाथ माझा,दिवस हे सरतात आहे 

आगळे अन वेगळे हे,गाव जेथे मी राहतो 
भेटतो जो या इथे तो,घेऊनी जखमाच जातो 
हे जीने जगने जणू,जाहले अपघात आहे  

जायचे होते कुठे,मी चाललो आहे कुठे 
ओळखीचा मीच मजला,राहिलो नाही इथे  
यात माझा आरशाचा,कोणता अपराध आहे  

Lyrics -सौमित्र
Music -दशरथ पुजारी
Singer -अरुण दाते
Movie / Natak / Album -

सूर मागू तुला मी कसा,Soor Magu Tula Mi Kasa

सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा, मी असा !

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझातुझा आरसा !

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा !

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा !

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडपिसा !

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा !

सूर जुळले शब्दही जुळले,Sur Julale Shabdahi Julale

सूर जुळले शब्दही जुळले
जुळले मधुमय गीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

सात स्वरांची सुरई भरता
नयनी येई काव्य धुंदता
वाजे वीणा निघती ताना
भावही हो पुलकित
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

चमचा घेऊनी ताल साधला
कसा करू पण भाव मोकळा
अबोल झाले शब्द आगळे
प्रीतिसुम रंजित
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

दिसे चांदणे का चंद्राविण ?
प्रीतीवाचून कुठले यौवन
काव्यासह हे कधी व्हायचे
प्रीतीचे संगीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

सखी शेजारिणी,Sakhi Shejarini

सखी शेजारिणी, तू हसत रहा
हास्यांत पळे गुंफीत रहा

दीर्घ बदामी श्यामल डोळे
एक सांद्रघन स्वप्न पसरले
'धूपछांव' मधि यौवन खेळे
तू जीवनस्वप्ने रचित रहा

सहज मधुर तू हसता वळुनी
स्मित-किरणी धरि क्षितिज तोलुनी
विषाद मनिचा जाय उजळुनी
तू वीज, खिन्न घनि लवत रहा

मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित-चाळ त्यास बांधून पहा

शब्दमाळा पुरेशा न,Shabdamala Puresha Na

शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्ष सारेच सांगून जातो
लोचनांशाड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो

आर्त कोमेजल्या मनाची पाकळी पाकळी खिन्न झाली
सांत्वनाच्या तुझ्या फुंकरीने प्राण लेवून आली नव्हाळी
एक हुंकार देतो दिलासा एक झंकार गात्रांत गातो

माळ वैराण नि:श्वासताना रानपक्षी कसा गात होता
काळरात्रीसही सोबतीला रातराणी तुझा गंध होता
काल नि:श्वासलेला तराणा आज विश्वास देऊन जातो

मोरपंखी खुणेसारखी तू; चित्त मोहून घेतो फुलोर
अभ्र दाटून आलं तरीही तू ढगामागची चंद्रकोर
चांदण्याचा झुला हालताना जीव भोळा शहारून जातो

वाळवंटांतून भीषण,Valavantatun Bheeshan

वाळवंटांतून, भीषण वैराण
चालले जीवन, चालले जीवन

वाळूचा सागर, क्षितिजे चौफेर
त्यावर लोळते, जळते, अंबर
रेतीस नाचवी वाफेचे तुफान

गेले रे गेले रे संगती-सोबती
पुसट पाऊले ठेवून मागुती
कितीक जायाचे असेच अजून

कलला कलला दिवस कलला
उंटांच्या पायांनी काळ हा चलला
लांबल्या सावल्या चालल्या सोडून

वाकल्या दिशा फुलून,Vakalya Disha Phulun

वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा.

या फुलांत, या सुरांत, चंद्र घालतो गळा
पावले अशी सलील नादती कुठून नाद ?
मी क्षितिज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत.

दु:ख एक पांगळे जशी तरूंत सावली
या उरात पेटलीस, का उन्हास काहिली ?
असे कसे सुने सुने मला उदास वाटते
जशी उडून पाखरे नभात चालली कुठे ?

रंग माझा तुला,Rang Majha Tula

रंग माझा तुला ! गंध माझा तुला !
बोल काहीतरी ! बोल माझ्या फुला !

सांग लाजूनही नाव आता तरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला !

वेळ जादूभरी, ही गुलाबी हवा !
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा !
भास झाला खरा ! ध्यास माझा खुळा !

आज माझी-तुझी भेट झाली अशी
शीळ यावी पुढे चांदण्याची जशी
सांग, सोडू कसा हात हातातला !