Showing posts with label M-अशोक पत्की. Show all posts
Showing posts with label M-अशोक पत्की. Show all posts

ढग दाटूनी येतात DHAG DATUNI YETAT

ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात

झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..

माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध
मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात

झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..

सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊ या
सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या

जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनी जातात अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात

झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..

Lyrics -सौमित्र SAUMITR
Music -अशोक पत्की ASHOK PATKI
Singer -साधना सरगम SADHANA SARAGAM
Movie / Natak / Album -आई शप्पथ AAI SHAPATH

तुला पाहताना मन मोहरून गेले TULA PAHATANA MAN MOHARUN GELE




तुला पाहताना मन मोहरून गेले
डोळ्यांमध्ये स्वप्नांचे गाव साकारले
काय झाले, काय सांगू, कळले न काही
प्रेम याला म्हणावे की दुसरेच काही

आभाळ न असे कधी वेगळे वाटले
हसलीस देहावर चांदणे खुलले
आभाळ न असे कधी वेगळे वाटले
हसलीस देहावर चांदणे खुलले
बहरून मग आली काळजात जाई
प्रेम याला म्हणावे की दुसरेच काही

नकळत मनातले नाव आठवावे
वाटेवर चालताना गाव सापडावे
गाव सापडावे
ओठावर नाव तुझे, तुझेच तराणे
तुझ्या गंध मोगरीचे श्वासामध्ये गाणे
पुन्हा तुझी माझी भेट होईल कि नाही
प्रेम याला म्हणावे की दुसरेच काही

तुला पाहताना मन मोहरून गेले
डोळ्यांमध्ये स्वप्नांचे गाव साकारले
काय झाले, काय सांगू, कळले न काही
प्रेम याला म्हणावे की दुसरेच काही

Lyrics -मिलिंद गांधी MILIND GANDHI
Music -अशोक पत्की ASHOK PATKI
Singer -महालक्ष्मी अय्यर - स्वप्‍नील बांदोडकर MAHALAXMI IYER,SWAPNIL BANDODAKAR
Movie / Natak / Album चिनु 2012 CHINU (2012)      

वादळे ऊठतात किनारे Vadale uthatat kinare


वादळे ऊठतात किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगण्याच्या वळतात वाटा
सारंगा रे सारंगा !

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी सौमित्र
चालताना पुन्हा सांगते रे कुणी
हुंदके सरतात आसवें उरतात
जगण्याचा सलतोच काटा

हे ऋतू कोणते येत-जाती असे
जीवनाला नवे देत जाती पिसे
थांबणे नसतेच चालणे असतेच
रस्त्यांना फुटतोच फाटा

Lyrics -Saumitr  सौमित्र
Music -Ashok Patki अशोक पत्की
Singer -Devaki Pandit  देवकी पंडित
Movie / Natak / Album -Aaishapath   आईशप्पथ..

हसलीस एकदा भिजल्या,Hasalees Ekada Bhijalya

हसलीस एकदा भिजल्या शारद राती
बहरली फुलांनी निशीगंधाची नाती

लेऊन शुभ्रतर किरणांचे फूलपंख
चरणांतुन पेरीत प्रीत-पैंजणे लाख
उधळीत अशी तू आलीस भावूक स्वाती

तू हसून बोललीस, होऊन लज्जीत थोडी
उलगडली नयनी तुझ्या गुलाबी गोडी
नजरेतुन झरल्या प्रणयगंध बरसाती

हे युगायुगांचे प्रीतीचे अनुबंध
तेजातून उजळीत हृदयातील आनंद
येईल निशेच्या दारी सौख्य प्रभाती

सोनियाचा उंबरा,Soniyacha Umabara

सोनियाच्या उंबऱ्यात प्रकाशाची उधळण
तुम्हासाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण
सूर्यदेव आभाळात पाखरांची किलबील
पाणवठे जागे झाले कांकणांची किणकिण
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग

ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळू मध्ये वाजलेल्या बासरीची
नात्यासंगे हलणाऱ्या हिरव्याकंच तोरणाची
तापलेल्या अंगणात पोळलेल्या पावलांची
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग

सावळ्या हरिचे घेइ सदा,Savalya Hariche Ghei Sada

सावळ्या हरिचे घेइ सदा नाम
तेणं तुझे काम पूर्ण करी

प्रल्हादाची भक्ती पाहुनी जो धावे
केशवा त्या ध्यावे, मनमंदिरी

चोखोबाचा भाव मानी सदा चोखा
तोच हरि देखा, घरोघरी

मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास
हरि ही तयास हृदयी धरी

सहज तुला गुपित एक,Sahaj Tula Gupit Ek

सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियांत आली गडे, प्रीत माझी लाजरी

बैसते ओटीवरी, नजर वळे अंगणी
अंगणात बहरते, रानजाई देखणी
जाईखाली उभा असे, हासरा शिकारी

सांजवेळी गोठ्यातली गाय लागे हंबरू
सोडते ग, धारेसाठी, ओढ घेई वासरू
गोठ्यामधे दिसे सखे, सावळां मुरारी

पहाटेला ओठांवरी गीत एक जागले
अंतरात कोणसे हळुच बाई बोलले
ओढाळले मन नेई, माझिया सासरी

सजल नयन नित धार,Sajal Nayan Nit Dhar

सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती

चंद्र-चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविना वीषधारा होती

थकले पैंजण चरणहि थकले
वृंदावनिचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती

शोधितो राधेला श्रीहरी,Shodhito Radhela Shrihari

शारद पुनवा, शांत चांदणे कालिंदीच्या तटी
गोपी जमल्या, रास रंगला कदंबतरूतळवटी

दिसेना सखी लाडकी परि
शोधितो राधेला श्रीहरी !

इथे पाहतो, तिथे पाहतो
मधेच थबकून उभा राहतो
बासरी मुकीच ओठांवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी
कशी ती वेळा टळली तरी
शोधितो राधेला श्रीहरी !

काय वाजले प्रिय ते पाउल
तो तर वारा तिची न चाहुल
भास हो फसवा वरचेवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

वादळे ऊठतात किनारे,Vadale Uthatat Kinare

वादळे ऊठतात किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगण्याच्या वळतात वाटा
सारंगा रे सारंगा !

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी
चालताना पुन्हा सांगते रे कुणी
हुंदके सरतात आसवे उरतात
जगण्याचा सलतोच काटा

हे ऋतू कोणते येत-जाती असे
जीवनाला नवे देत जाती पिसे
थांबणे नसतेच चालणे असतेच
रस्त्यांना फुटतोच फाटा

वादळवाट,Vadalvaat

थोडी सागर निळाई थोडे शंख नि शंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत

कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वाऱ्यापावसाची गाज काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट

वाट इथे स्वप्नातिल,Vaat Ithe Swapnateel

वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे बावरी तनू

दऱ्यांतुनी आनंदला पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो ग गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग इंद्राचे धनू

राधा ही बावरी हरीची,Radha Hi Bavari

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

या सुखांनो या (२),Ya Sukhano Ya (2)

तांबडं फुटलं आभाळ भरलं
मायेचं सूखही त्यातच दडलं
भिरभिर तरी मन हे का रे हाकारिते
या सुखांनो या .....
या सुखांनो या .....

आनंद लहरी येती नि जाती
जोडून देती नाती नि गोती
मृगजळ परि चंदेरी हे हाकारिते
या सुखांनो या .....
या सुखांनो या .....

मंथन,Manthan

दिला नियतीने स्त्री जन्माला विपरीतसा हा शाप जुना
ठायी ठायी दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा
स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर तेच कडु चार
पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळुवार
माणसातल्या देवपणाचा होतो तेव्हा साक्षात्कार
हाती येते नवनीत जेव्हा मंथन होते अपरंपार

मोगरा फुलला (२),Mogara Phulala (2)

दवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
आज अशी मी मला गवसले- मोगरा फुलला !

रूप पाहता आरशात मी, आरसा हसला
आज अशी मी मला गवसले- मोगरा फुलला !

मैफिलीचे गीत माझे,Maiphileche Geet Majhe

मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले
वेदनांचे रुदन होते मीच माझे साहिले

खेळ सारा प्राक्तनाचा, राहणे तेथे नसे
जायचे तेथून असता वासनांनी बांधिले

सूर माझे आर्त झाले हुंदके मी कोंडिले
काळजाच्या आसवांची वाहिली प्रीतिफुले

लोभ नव्हता का म्हणावे, एक होती याचना
जन्म माझा सफल व्हावा हे मनासी बांधिले

मानसी,Manasi

कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी
साऱ्या सख्या सजणींचे मन मानसी मानसी

कुणी थोडी स्वप्नवेडी, कुणी कर्तव्य कठोर
कुणा आकाशाची ओढ, कुणा जमिनीचा घोर
कुणा जगण्याची धुंदी, तरी धुंदीतही भान
कुणी स्वत:मध्ये मग्न, तरी ढळते न ध्यान
अशा सख्या सजणींचे मन मानसी मानसी

मला सांगा सूख म्हणजे,Mala Sanga Sukh Mhanje

मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !

दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो
आपण फक्त दोही हात भ्हरून घ्यायचं असतं



मज एक सारखे स्वप्न,Maj Ek Sarakhe Swapna

मज एक सारखे स्वप्न सख्याचे पडते
मी सुखद क्षणांची माळ अंतरी जपते

हा गंधित वारा गूज सांगतो गोड
लागली मनाला आज सख्याची ओढ
जळथेंब फुलावर त्यात सख्याला बघते

या प्रशांत समयी कोकिळ कूजन करिते
जात्यावर ओवी कुणी भाविका गाते
रविराज स्वागता उष:प्रभा ही नटते

बघ एकसारखी फडफडते पापणी
का हाक तयाची अवचित येते कानी
का संचित मजला जाण शुभाची देते