Showing posts with label L-स. अ. शुक्ल. Show all posts
Showing posts with label L-स. अ. शुक्ल. Show all posts

हले झुलत डुले पाळणा,Hale Jhulat Dule Palana

हले, झुलत डुले पाळणा
प्राणफुला झोपी जा ना
जो जो रे

नीजला गंध वारा, झोपला नभी तारा
पेंगुळला पानावरी कळ्या-फुलांचा तुरा

पुनवा रात बोले, मीट तू बाळा डोळे
झोका देते रे, नीज
लाडक्या, चिमण्या, छकुल्या, राजीवा

पाळणा मंद होतो, आईला आलिंगतो
काळजाचे पांघरूण घालिते आई तुला

लाविते ग सांजदिवा,Lavite Ga Sanj Diva

मावळत्या किरणाचं पडे पाऊल दारात
झाली बाई सांजवेळ आल्या छाया अंगणात
परतला घरट्यात रानपाखरांचा थवा
लाविते ग सांजदिवा

चिमण्यांची चिविचव येई गोड चिंचेतून
रुणझुण वाजती ग संध्यादेवीचे पैंजण
जोजवितो मंद वारा अंकावरी बाळ जीवा
लाविते ग सांजदिवा

इवले हे निरांजन उजळते वृंदावन
तुळशीमाई वाहते ग भावभक्तिने हे मन
जोडुनिया दोन्ही हात आळविते जिवाभावा
लाविते ग सांजदिवा

माझ्या सुखी संसारात तूच मला भरवसा
लपिन ग तुझ्या कुशी तुला आईचा वारसा
ऊनपावसात आई मला जीवाचा विसावा
लाविते ग सांजदिवा

ब्रिजलाला गडे पुरवी,Brijala Gade Puravi

ब्रिजलाला गडे पुरवी हृदयिंची आस ॥

वाजिव श्रीहरी । मंजुळ बासरी ।
पाजिव शांति सुधा जीवास ॥

बोल हांसरे बोल प्यारे,Bol Hasare Bol Pyare

बोल हांसरे । बोल प्यारे
बुलबुला । हा विषाद का रे ?

भावना भंगून जाता
जीव मेला ह्या जगाला
मोह-माया-पाश आतां
तोडिले भवबंध सारे

दैव दुष्ट सदैव छळतां
आज होत अखेर ही

चालले टाकून तुजला
राजसा, निरोप दे रे

प्रीतीचा नव वसंत,Preeticha Nav Vasant fulala hradayat khulala

प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बाग दिलाचा दरवळला

पुरे प्रीतीचा छंद चाळा, जगावेगळा हा असला
नाजुक साजुक गोजिरवाणी, किती ग भोळी तू फुलराणी
प्रणय साज शृंगार साजणी, अंगारच जणू रसरसला

प्रियकर मधुकर धावुन येईल, रसिकराज मधुरुंजी घालिल
मंजुळ गुंजनि सदा रंगविल, ह्या हसऱ्या फुलराणीला

कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा, लुटिल नवरसरंग नवतीचा
वंचिल चंचल निष्ठुर साचा, लोटिल विरहातमी कलिकेला

प्रेमळ कमळण चतुर धूर्तही, भृंगसख्याला कोंडिल हृदयी
सहजच तो मग अंकित होईल, जिंकित प्रेम जगाला

दे चरणि आसरा,De Charani Aasara

दे चरणि आसरा, देवा
नाहि तुझ्याविण थारा दुसरा
कटु संसार असार-पसारा
दे चरणि आसरा

मी अजाण रे बालक दुर्बल
थोर परि मनी भक्तिभाव-बल
जपत रुचिर तव नाम सुमंगल
वितरी चिरसुखशांति अंतरा

दूर व्हा सजणा येऊ नका,Dur Vha Sajana Yeu Naka

दूर व्हा सजणा येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे

भिंतीला कान या बोलू नका बाई
नजरेनं सांगा हितगूज काही
धरु नका हात माझा पिचतील ना चुडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

लालरंगी फूल तुझ्या गालावरी फुले
पहिली वहिली लाज माझी पाकळीत खुले
बघु नका डोळियांत पापणी ही उडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

पाठमोरी नागीन ही केसाळ काळी
चाफ्याच्या मोहानं धुंदफुंद झाली
नका येऊ मागेमागे येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे

गोड तुझी मूर्त अशी एकदाच पाहू दे
पाहू नको मोहुनीया सोड मला जाऊ दे
बंडखोर पदर तुझा सोडू कसा गडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

तू तिथे अन्‌ मी इथे हा,Tu Tithe An Mi Ithe Ha

तू तिथे अन्‌ मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी
खवळला दुर्दैवसिंधू पसरला मध्यंतरी
मीलनाची या जिवाची भंगली आशा तरी

प्रीत आंधळी दिव्यगुणा, दावी मार्ग प्रेमी सुजना
भाव भोळा हा साजणा बंधना जुमानित ना

निशा दाटे जिवा लावित घोर, घनघोर
बघ उगवे चंद्रकोर
नाचवि जीव-चकोर

गुंफिते एकत्र सुमनां प्रीतबाला साजरी
जीव दोन्ही एक सखये, दूर देहाने जरी

जादुगारिणी सखे साजणी,Jadugarini Sakhe Sajani

जादुगारिणी सखे साजणी
थांब जराशी ग

प्रेमभाव नजरेत दाविले
तूच आधी मज नादि लाविले

गोड हसुनिया हृदयि फुलवल्या
गुलाब-राशी ग

तुझ्या संगती गिरिकंदरही
राजमंदिराहुन सुखदायी
तू माझी तर तुच्छ अवांतर
सौख्य-मिराशी ग

दोन जिवांचे जातक जुळले
भाग्यलेख प्रीतिने उजळले
जगास मानू उगा जुमानू
का ग्रहराशी ग

स्फूर्ति-तारका तू झगमगती
करू जोडिने प्रवास जगती
सदा बिलगली हीच एकली
आस उराशी ग

चल रानात सजणा,Chal Ranat Sajana

चल रानात सजणा
आंबेवनात जाउ या दूर

राया, गुपीत अपुलं फुटलं
जग भोंतीचं बोलत सुटलं
उठे काहूर, लागे हुरहूर
आंबेवनात जाउ या दूर

चांदण्याची पांघरुन शाल
लुटू आनंद धुंद खुशाल
बघु नवतीचा दुनियेचा नूर
आंबेवनात जाउ या दूर

नको संकोच भीति मनात
सख्या, जीवाचि चांदरात
दाटे प्रीतीचा रंगरस-पूर
आंबेवनात जाउ या दूर

जीवा-जीवाचि मंजूळ गाणीजीवा-जीवाचि प्रेमळ गाणी
बसू गात पाखरावाणी
फिरु गात पाखरावाणी
धरु प्रीतीचा एक ताल-सूर
आंबेवनात जाउ या दूर

चकाके कोर चंद्राची,Chakake Kor Chandrachi

चकाके कोर चंद्राची, मनाला मोहिनी घाली
लकाके चंचला बाला, उषा की हासरी आली

कुणा हा भाग्यवंताचा असावा प्रीतिचा ठेवा
कुठे मी काजवा वेडा, कुठे ही तारका बाळी

उदेला चंद्र हा पाही, जिवाला हासवी मोही

करी जादूगिरी कान्हा, भुलवितो हा कसा बाई
कुणा हा भाग्यवंतीचा असावा प्रीतिचा ठेवा
कुठे हा लाल मोलाचा, करंटी गोरटी ही

मिळवणी दोन जीवांची वसे तेथेच वेल्हाळी
बघे ना भेदभावाला जगी प्रीति खुळी भोळी

कुणाला प्रेम मागावे,Kunala Prem Magave

कुणाला प्रेम मागावे ?
जिवाचे दु:ख सांगावे ?
मृगजळी का तरंगावे
कुणाला गात रंजावे ?

तूच ना प्रीतिचा पेला
दिला पण पालथा केला
तळमळे जीव तान्हेला,
कुणासाठी जगी जगावे ?

तुझ्या शृंगारलीला या
बिचारी मोहिनी माया
किती आशेवरी वाया,
खुळ्या जीवास टांगावे ?

साथीचा साज विस्कटला

सूरांचा मेळ मग कुठला
दिलाचा दिलरूबा फुटला,
कसे गाणे अता गावे ?

एकटीच भटकत नदिकाठी,Ekatich Bhatakat Nadikathi

एकटीच भटकत नदिकाठी
ऐन दुपारी तोऱ्यानं
नटुन थटुन अशि चटकचांदणी
कुठं चाललीस नखऱ्यानं

अंगात धमक डोळ्यांत चमक
कमरेत लचक नजरेत वचक
काळजास का देसी चरका
मारूनि मुरका कुर्रऱ्यानं
जशि कुणा घायाळ कराया
नेत्रशरांच्या माऱ्यानं

गाल रंगदार चाल ढंगदार
धुंद नागिणी जशी चमकशी
नवरसरंग-फवाऱ्यानं
चाल हळू जरा, सावर, आवर
पदर उडाला वाऱ्यानं