Showing posts with label च. Show all posts
Showing posts with label च. Show all posts

चांदण्याची रोषणाई Chandnyachi Roshnai

चांदण्याची रोषणाई
चांदण्याची रोषणाई मी कधी ना पाहते
मी सुधेच्या सागरी त्या नाहते पण नाहते

मी न बघते आमराई फुलवरा चैत्रातला
कोकिळेचे गीत पण मी काळजाने ऐकते

रंगरेषा ताटव्यातील पारख्या सार्‍या मला
मोहिनी गंधातुनी ती जीवनावर वाहते

Lyrics - Kusumagraj
गीत    -    कुसुमाग्रज
Music - Shriniwas Khale
संगीत     -     श्रीनिवास खळे
Singer - Ashalata Vabgavkar
स्वर    -     आशालता वाबगावकर
Natak - Vidushak
नाटक    -    विदूषक

चिंब पावसानं रानं झालं,Chimb Pavasane Raan Jhale

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी


अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी



चिंधी बांधिते द्रौपदी,Chindhi Bandhite Draupadi

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
भरजरी फाडुन शेला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला

बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्न माधव झाला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !

म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालिता येईन धावुनी

प्रसंग जर का पडला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला !

प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !

चिंता क्रोध मागे,Tati Ughada Dnyaneshwara

चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा

योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संती सुखें व्हावें पाणी
शब्द शस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्मदारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा

ब्रह्म जैसें तैशा परी
आम्हा वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे

जीभ दातांनी चाविली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा

चिंचा आल्यात पाडाला,Chincha Aalyat Padala

चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला !

माझ्या कवांच आलंय्‌ ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय्‌ पाणी
काय बघतोस राहुन आडाला ?

मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वर खाली
फळ आंबुस येइल गोडाला !

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला ?

चांदोमामा चांदोमामा,Chandomama Chandomama

चांदोमामा, चांदोमामा ..... भागलास काय ?
घरचा अभ्यास केलास काय ?

चांदोमामा, चांदोमामा ..... लपलास काय ?
पुस्तक हरवून बसलास काय ?

चांदोमामा, चांदोमामा ..... रुसलास काय ?
गणितात भोपळा घेतलास काय ?

चांदोबा चांदोबा भागलास,Chandoba Chandoba

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !

आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?

आई बिच्चारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?

चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला 'ओ' माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?

चांदण्यात ह्या धरणी,Chandanyat Hya Dharani

चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनी
चांदणे फुलले माझ्या मनी

आभाळाची धरणीवरती
अशीच आहे अखंड प्रीति
त्या प्रीतिच्या शीतलतेने, सुखावली रजनी

ओली वाळू झाली रूपेरी
नाचनाचती सागर लहरी

माडांमधुनी लबाड वारा, आळवितो गाणी

या चंद्राच्या अनंत लीला
उपमा नाही अवखळतेला
अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणी



चांदण्यात फिरताना माझा,Chandanyat Phiratana

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच;
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच;
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ?
तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर !
श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून,
पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात !

चांदण्यात चालु दे,Chandanyat Chalu De

चांदण्यात चालु दे मंद नाव नाविका
तरंगती जळावरी संथ चंद्र-चंद्रिका

नकोच आज बोलणे
बोलु देत लोचना
लोचनांत रंगल्या भावना अनामिका !

तूच साथ दे मला
तूच हात दे मला
तूच ने तुझ्यासवे मंत्रमुग्ध बालिका !

भाव जे असावले
तुझ्यात ते विसावले
नकोस होउ रे कधी संगतीस पारखा !

चांदण्या रात्रीतले ते,Chandanya Ratritale Te

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा !

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा !

मी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरुन जा !

प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते
ते हसू अन्‌ आसवे ती - आज तू विसरून जा !

चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा !

चांदणे शिंपीत जाशी,Chadane Shimpit Jashi

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले

वाहती आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुंजाची झळाळी तार पदरा गुंफीले

गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी ?
पाहु दे मेघाविण सौंदर्य तूझे मोकळे

चांदणे झाले ग केशरी,Chandane Jhale Ga Keshari

चांदणे झाले ग केशरी
पुसट न झाल्या तारा तोवर अरुण उतरला घरी

सरल्या काळ्या अबोल रात्री
नवचंद्रासम उगवे प्रीती
भाव पौर्णिमा अंती बहरे उभयांच्या अंतरी

काल वाटली तुळस लाजरी
आज तिच्यावर दिसे मंजिरी
कृष्ण कडेवर घेई जणु ही यशोमती सुंदरी

मुक्या माउली तुजसी सांगते
माझ्याही उरी गूज रांगते
सुखद वाटते गोवत्सांची म्हणुन मला चाकरी

चांदणं टिपूर हलतो वारा,Chandane Tipur Halato Vara

चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा
टाकते पलंग पुढल्या दारा, की मागल्या दारा
त्यावर बसा की,हवालदारा, की शिलेदारा !

डावी पापणी फुरफुर करी
नवसाला अंबाबाई पावली खरी
अवचित, सजणा, आला घरी

मनिच्या खुशीत, की मजला कुशीत घ्या, दिलदारा !

पंचकल्याणी घोड्यावरून
दौडत आलो, सये, दुरुन

रूप घेऊ दे डोळा भरून
तुजला बघून ग, जाइल निघून हा थकवा सारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा !

शालूच्या पदरानं पुसते हा पाय
खायाला देते मी साखरसाय
आणखीन सेवा करू मी काय ?

पडते गळा, की लावते लळा, की द्या आधारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा !

नेसुन चांदणं आलीस अशी
पुनव देखणी झुकलिस जशी
डाव्या हाताची घे ग उशी
चांदणं मिठित, कि चांदणं दिठित, झिमझिम धारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा !

चांद माझा हा हासरा,Chand Majha Ha Hasara

चांद माझा हा हासरा ।
नाचवी कसा प्रेमसागरा ।
प्रीत लहरी ये भरा ॥

गुण कनकाच्या नव कोंदणी गे ।
शोभसी सखे, तू हिरा ॥

चांद मोहरे चांदणे,Chand Mohare Chandane

चांद मोहरे, चांदणे झरे
झोपेतच गाली असा, हसशी का बरे ?

गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी

उचलुनीया नेती तुला, उंच काय रे ?

उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला
दिसते का हळू विमान, एक संचरे

बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरूण पुसे
खचितच तेच प्राणनाथ, सांगू काय रे

जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड
फिरुनी जाय लंघुनीया, सात अंबरे

चांद मातला मातला,Chand Matala Matala

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ?

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा

वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू

गोड गारव्याचा मारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू



चांद किरणांनो जा जा,Chand Kiranano Jaa Jaa

चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा
फुले प्रकाशांची माझ्या दारी अंथरा

हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत
मूर्त माऊलीची माझ्या न्याहळा जरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !

पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी
डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !

टांगलेली छायाचित्र देवासारखे पवित्र
स्वर्गवासी माझे बाबा रक्षिती घरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !

पलिकडे खाटेवरी भर मध्यान्हीच्या पारी
दिव्यातली भाऊराया वाती औक्षरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !

चंपक गोरा कर कोमल,Champak Gora Kar Komal

चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते;
नेशील तेथे येते, सखया नेशील तेथे येते

चैत्रतरुंच्या छायेमधला गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनी सूर गुंजता, तुझे गीत मी गाते

निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी
दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी

लाजत लाजत प्रीत देखणी जिथे मोहुनी बघते

चंद्रिका ही जणु,Chandrika Hi Janu

चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥

चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥

शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।

आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥