Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,Stri Janma Hi Tujhi Kahani

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत, नयनी पाणी

तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनि नमविति चरणी !

कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसि जगावर
दशा तुझी ही केविलवाणी !

सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणात ठरसी तूच पापिणी !

स्वार्थी पसारा सारा जगि,Swarthi Pasara Sara Jagi

स्वार्थी पसारा सारा जगि या ।
रवि चंद्र तारा ।
उडति त्या अमरा ॥

घनदाट अंधार पसरे निराशा ।
झुंजार वारा न जीवा निवारा ॥

स्वार्थी जी प्रीति मनुजाची,Swarthi Ji Preeti Manujachi

स्वार्थी जी प्रीति मनुजाची सहज ती ।
परि साधे जो स्वार्थ परार्थी, उत्तम तो गणिती ॥

स्वार्थ परार्थाइतुका असतां, मध्यम त्या म्हणती ।
ज्यांत न जनहित त्या स्वार्थाला साधु अधम वदती ॥

स्वातंत्र्याची घुमे तुतारी,Swatantryachi Ghume Tutari

स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणाऱ्या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती

स्वस्थ कसा तूं,Svastha Kasa Tu

स्वस्थ कसा तूं ? ऊठ गड्या ।
झणि टाक उड्या ॥

नकळे का वर्षे ।
घन सुधेचा, छ्बड्या ? ॥

सरले अजि सारे ।
कुदिन अपुले, बगड्या ! ॥

स्वर उमटावे शुभंकरोती,Swar Umatave

माझ्या हाते मी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती
सुखद असावी अशीच संध्या, स्वर उमटावे शुभंकरोती

रात्री थकुनी निजण्यापूर्वी, ओठी यावा अभंग, ओवी
भूपाळीने आळवीत मी जागे व्हावे पुन्हा प्रभाती
स्वर उमटावे शुभंकरोती

दिवस सरावा करिता सेवा, कंटाळा मज मुळी न यावा
नव्या घरी मी उजळ करावी मराठमोळी जुनी संस्कृती
स्वर उमटावे शुभंकरोती

मी रांधावे, मी वाढावे, तुटू न देता हळू जोडावे
कुणावरून तरी ओवाळावे जीवन व्हावे एक आरती
स्वर उमटावे शुभंकरोती

स्वर आले दुरुनी,Swar Aale Duruni

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वाऱ्याचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी

स्वयंवर झालें सीतेचे,Swayamvar Jhale Siteche

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें

स्वये श्रीरामप्रभु ऐकती,Svaye ShriRam Prabhu

स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत - वैभव - गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ - मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परी तो उभयां नच माहिती

स्वप्ने मनातली का,Swapne Manatali Ka

स्वप्ने मनातली का वाऱ्यावरी विरावी ?
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

फिरलो तसाच मागे वचनात गुंतुनीही
नाही तसा परी मी ठावे तुला मलाही
माझी व्यथा अशी ही मज सांगता न यावी
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

देऊन शब्द झाली प्रीतीच पाठमोरी
मी वंचिताच आता झाले जगासमोरी
कोणी अशी कुणाची का वंचना करावी ?
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

ते दु:ख, वेदना ती, येथून पाहतो मी
त्या मूक आसवांचा आकांत साहतो मी
फुलत्या वसंतकाळी का वीज कोसळावी ?
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

स्वप्नावरी स्वप्न पडे,Swapnavari Swapna Pade

स्वप्नावरी स्वप्न पडे, नीज ना मना
जागेपणी आठविते सारखी तुला !

प्रीतीचे घोष तुझ्या कानि ऐकते
मूर्तीचे चित्र तुझ्या पदरि झाकिते
अंतरिचा भाव कधी तुज न उमगला !

भोळी मी पोर तुला दुरून पुजिते
सांगावे गूज असे रोज योजिते
काय करू साधेना कठीण ती कला !

हळूच तुझ्या छायेशी आज बोलते
शबरीच्या बोरांची शपथ तुला घालते
भिल्लीणिची भक्ती त्या राम समजला !

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू,Swapnatalya Kalyano

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा

नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा

सिद्धीस कार्य जाता येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा

स्वप्नांत रंगले मी,Swapnat Rangale Mi

स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी
हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी

एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
या नील मंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्द सूर, हे हार गुंफिले मी

घेशील का सख्या तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी

स्वप्नात साजणा येशील का,Swapnat Sajana Yeshil Ka

स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता
मधुमीलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

स्वप्नात पाहिले जे ते रूप,Swapnat Pahile Je Te Roop

स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते

तो रंग केवड्याचा, ते ओठ अमृताचे
त्या यौवनात होते प्रतिबिंब चांदण्याचे
तारे नभात होते, नयनांत दीप होते

मिटताच पापणी ही मिटली कळी अबोल
मौनात अर्थ होता शब्दांहुनी सुरेल
बागेतल्या फुलांचे गालास रंग होते

स्वप्नात पाहिले जे ते राहू,Swapnat Pahile Je Te Rahu

स्वप्नात पाहिले जे ते राहू देत स्वप्नी
हे सत्य स्वप्नरंगी मी ऐकिले सुरांनी

मी पाहिले दिठीने लावण्य एक दैवी
त्या शामसुंदराला जी धुंद करिल देवी

परि आस या मनाची हा एक ध्यास देवा
लावण्य हेच दैवी माझे मला मिळावे
माझे मला मिळावे..... माझे मला मिळावे

स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या,Swapna Nagarchya Sundar

>स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा

रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला
जागहि नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

स्वप्न माझ्या जीविताचे,Swapna Majhya Jivitache

स्वप्न माझ्या जीविताचे तुज सवे साकारले

साजणा रे नेत्र आता लागले पैलतिरी
एक आशा ही परंतु जागते माझ्या ऊरी

पौर्णिमेचा चांद करू दे चांदण्याची वृष्टी रे
रोमरोमी गोड काटा मंद वारा फुलवू दे

बिलगुनी मी तुज बसावे मान वक्षी टेकुनी
अन्‌ मिटावे मी सुखाने नेत्र माझे त्या क्षणी

स्वप्न उद्याचे आज,Swapna Udyache Aaj

स्वप्न उद्याचे आज पडते, चित्र चिमणे गोजिरवाणे
नयना पुढती दुडदुडते !

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे, शिवनेरीवर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते !

चितोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाळ होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते !

ऊठ म्हणता उठते क्रांती, ज्याच्या मागून फिरते शांती
जवाहिराची राजस मूर्ती लाडे लाडे आई म्हणता
भारत-दर्शन मज घडते !

स्वर्ग मला सुभग आज,Svarga Mala Subhag Aaj

स्वर्ग मला सुभग आज
धरतीवर गवसला ।

अमरांसहि अजय असा
राजमुकुट लाभला ॥

भुवनवीर पति नृपाल
अतुल विभव बल विशाल
नंदनमय जीवनात
कल्पवृक्ष बहरला ॥