Showing posts with label S-पुष्पा पागधरे. Show all posts
Showing posts with label S-पुष्पा पागधरे. Show all posts

हा मदीर भोवताल स्वप्‍न-भारला HA MADIR BHOVATAL SWAPN BHARALA

हा मदीर भोवताल स्वप्‍न-भारला

या सुखात धुंद आज होऊ दे मला !

लोचनांत रिमझिमली वीजपाखरे

स्पर्शातुन जाईचे उमलले तुरे

थरथरत्या गुंजनात जीव गुंतला

शब्दांना ओठांवर मिटुन राहु दे

मौनातच सारे जग विरुन जाउ दे

श्वासांतुन बहरू दे स्वप्‍न-सोहळ


Lyrics -वंदना विटणकर VANDANA VITANAKAR
Music -श्रीनिवास खळे  SHRINIVAS KHALE
Singer -पुष्पा पागधरे PUSHPA PAGADHARE
Movie / Natak / Album -गीत GEET

नकोनको रे पावसा NAKONAKO RE PAWASA

नकोनको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन

Lyrics -इंदिरा संत INDIRA SANT
Music -यशवंत देव YASHWANT DEV
Singer-पुष्पा पागधरे PUSHPA PAGADHARE

राया मला पावसात नेऊ,Raya Mala Pavasat Neu

नाही कधी का तुम्हास म्हटलं
दोष ना द्यावा फुका
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका !

लई गार हा झोंबे वारा
अंगावरती पडती धारा
वाटेत कुठेही नाही निवारा
भिजली साडी भिजली चोळी
भंवतील ओल्या चुका
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका !

खबूतरागत हसत बसू या
उबदारसं गोड बोलू या
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या
लावून घेऊ खिडक्या दारं
पाऊस होईल मुका
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका !

राया मला जरतारी शालू,Raya Mala Jartari Shalu

दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा
अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

मखराभवती दोर लावा थाटमाट करवा
मैत्रिणी माझ्या बोलवा साऱ्या ओटी माझी भरवा
मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

गावातून फिरवा मजला पालखीत मिरवा
हळदीकुंकामध्ये माझे अंग सारे मुरवा
मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

मोहरले मस्त गगन,Moharale Mast Gagan

मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
प्रीतीचे गाइ कवन
भिरभिरते बावरी, देहाची भिंगरी !

मंथर अनोखे हे पुकारे
भोवताली दाटले
छंदी अनंगाचे इषारे
रोमरोमी नाचले
नजरेची कस्तुरी दरवळली अंतरी
थरथरली शर्वरी रे साजणा !

चंचल नशेचे हे उखाणे
लोचनांनी छेडिले
फंदी तरंगांचे पिसारे
अंतरंगी रंगले
श्वासांची मोहिनी लखलखली अंबरी
धुंदी ही वादळी रे साजणा !

नको नको रे पावसा,Nako Nako Re Pavasa

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन

चंद्राविना झुरावी जशी,Chandravina Jhuravi Jashi

चंद्राविना झुरावी जशी पौर्णिमा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !

झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी

विजनी वसंत येता आल्हाद कोकिळेसी
मधुमालती जशी गंधाविना निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !


दुरुनि खुणावते ती कलिका कुणास सांगा
भ्रमरांचिया थव्यांनी फुलतात रम्य बागा
स्वाति जलाविना रे शिंपा जसा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !

काय आणितोसी वेड्या,Kaay Aanitosi Vedya

काय आणितोसी वेड्या डोळियांत पाणी
दु:ख-सौख्य सारे अंती एकरूप मानी

जन्मजात तितुका आहे जीव मात्र एक
भोग भोगताहे ज्याचा जसा कर्मलेख
सारखेच असती, नाही उच्चनीच कोणी

कुठे एक माती धरुनी भिन्न भिन्न रंग
भिन्नभिन्न दिसती डोळां जळीचे तरंग
लाटलाट विरता राही तळी एक पाणी

रजतरूप दावुनि भुलवी शिंपली उन्हात
सर्परूप दिसता रज्जू कापसी मनात
भवाकार खोटा अवघा, ब्रम्ह सत्य जाणी

अहो अहो कारभारी हो,Aho Aho Karabhari Ho

अहो अहो कारभारी हो कारभारी
मध्यान्‌ रात्री कुठं चालला गुमान या तुम्ही माघारी

अग ल ... ल ... लंका, नको श ... शं ... शंका
अडवू नको मला तू युक्तीनं
हातात टाळ, ग ... ग ... गळ्यात माळ

भ ... भ ... भजनाला जातोय भक्तीनं
इठोबा रखुमाई भजन करता, तहाभूक हरतीया भा ... भा ... भादरणी

नका काढू शक्कल, हाये मला अक्कल, तमाशाला चललाय्‌ कुठं ?
घरची भाकरी सोडून भायेर उकिरडा फुकताय तिथं

तमाशाला न्हाई .....

मग संगती येते, खरंखोटं पहाते, बसून तुमच्या शेजारी

आता कुठं जातो, कॅ ... कॅ ... कॅन्सल करतो
कुठल्या कुठं मी झ ... झ ... झक मारली

अहो खुशाल जावा, जीव तुमी लावा, म्हायेरची मी वाट धरली

पाया पडतो, हात जो ... जो ... जोडतो
करू नको उलटी अं ... अं ... अंबारी
अगं अगं कारभारणी ग कारभारणी

अग पोरी संबाल दर्याला, Aga Pori Sambal Daryala

अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी
लाट प्रितीची, भन्नाट होऊन आभालि घेई भरारी

नाय भिनार ग, येऊ दे पान्याला भरती
माज्या होरीचं, सुकान तुज्याच हाती
नाव हाकीन मी, कापीत पाऊसधारा
मनि ठसला रं, तुजा ह्यो मर्दानि तोरा
जाल्यांत गावली सोनेरि मासली
नको करू शिर्जोरी

तुज्या डोल्यांत ग, घुमतोय वादलवारा
तुज्या भवती रं, फिरतोय मनाचा भौरा
तुला बगून ग, उदान आयलंय मनाला
तुज्या पिर्तीचं, काहूर जाली जिवाला
सुटणार नाय ग, तुटणार नाय ग
तुजी नि माजी जोरी

मी आनिन तुला, जर्तारी अंजीरि सारी
मला पावली रं, पिर्तीचि दौलत न्यारी
मी झुंजार ! साजिरि तू माजि नौरी
तुज्या संगतीनं, चाखीन सर्गाची गोरी
थाटांतमाटांत गुल्लाबी बंगला-
बांदूया दर्याकिनारी

आला पाऊस मातीच्या वासात, Aala Paus Maticha Vasat

आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग !

आभाळात आले काळे काळे ढग

धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग !

कोसळल्या कशा सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसात ग !

लिंबोळ्यांची रास कडूलिंबाखाली
वारा दंगा करी जुई शहारली
चाफा झुरतो फुलांच्या भासात ग !

झाडांवरी मुके पाखरांचे थवे
वीज लालनिळी कशी नाचे, लवे
तेजाळते उभ्या अवकाशात ग !

वीज कडाडता भय दाटे उरी
एकली मी इथे सखा राहे दुरी
मन व्याकूळ सजणाच्या ध्यासात ग !

आज मी तुझ्यासवे, Aaj Mi Tujhyasave

आज मी तुझ्यासवे, तुझ्यात मी विसावले

सतत तुझ्या मीलनि, गंध धुंद दरवळे



फूल हे मनातले, मिठीत ते तुझ्या हसे

या सुखात भिजताना लागले तुझे पिसे


राजसा तुझ्यामुळे भाग्य मला लाभले



राहिला तुझा न तू, मी न माझी राहिले

दोन मने जुळताना कधी न मी पाहिले

नाही येत सांगता कोण कधी हरवले

अग पोरी संबाल दर्याला

अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी

लाट प्रितीची, भन्नाट होऊन आभालि घेई भरारी



नाय भिनार ग, येऊ दे पान्याला भरती

माज्या होरीचं, सुकान तुज्याच हाती


नाव हाकीन मी, कापीत पाऊसधारा

मनि ठसला रं, तुजा ह्यो मर्दानि तोरा

जाल्यांत गावली सोनेरि मासली

नको करू शिर्जोरी



तुज्या डोल्यांत ग, घुमतोय वादलवारा

तुज्या भवती रं, फिरतोय मनाचा भौरा

तुला बगून ग, उदान आयलंय मनाला

तुज्या पिर्तीचं, काहूर जाली जिवाला


सुटणार नाय ग, तुटणार नाय ग

तुजी नि माजी जोरी



मी आनिन तुला, जर्तारी अंजीरि सारी

मला पावली रं, पिर्तीचि दौलत न्यारी

मी झुंजार ! साजिरि तू माजि नौरी

तुज्या संगतीनं, चाखीन सर्गाची गोरी

थाटांतमाटांत गुल्लाबी बंगला-

बांदूया दर्याकिनारी