Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा,Krishnakathi Duttaguruncha

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्त्य असे संचार
सुकृत आले फळास माझे, घडला साक्षात्कार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

योगीराज श्री समर्थस्वामी, अवचित आले माझ्या सदनी
पदस्पर्शाने झाले पावन मम जीवन संसार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

वैराग्याची सोज्वळ मूर्ती, अपार करुणा ह्रदयी प्रीती
प्रणव सुरांतुनी जगा दाविती विश्वरुपाचे सार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

अंतर साक्षीत्वाचा प्रत्यय सदा देती मज अखंड अक्षय
सार्थकतेचे अश्रू बघती, आत्मऐक्य साकार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

कृष्णा मिळाली कोयनेला,Krishna Milali Koynela

कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं, सासरला

कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी
एकरूप झालं
आलिंगनी, बाई आलिंगनी,
ओळखायचं सांगा, कसं कुणी ?
संसारचं तीर्थ बांधलं

लक्ष पायऱ्या घाटाला

एका आईच्या पोटी येऊनि
ताटतुटी जन्मापासुनि
सासर, माहेर नाव सांगुनि

नयनी नातं गहिवरुनि
बहीण भेटली बहिणीला

शतजन्माची ही पुण्याई
घेऊन आली कृष्णा माई

कोयना येई झुलवित डोई
मंगल घट ते, न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला

कृष्णा पुरे ना थट्‌टा,Krishna Pure Na Thatta

कृष्णा पुरे ना, थट्‌टा किती ही
खडा घड्याला मारु नको
या राधेला अडवु नको

जळामृते हा घट भरलेला
घेउन जाणे मजसि घराला
सोड वाट रे झणि गोपाळा
घरी परतण्या उशिर नको


हिसळत जळ हे, भिजते साडी
असली कसली भलती खोडी
काय वाटते तुजला गोडी
वृथा मुकुंदा छळु नको

तुझ्या संगती क्षणभर येता
विसरुन जाते काम सर्वथा
ओढ लागते माझ्या चित्ता
भुरळ मनाला पाडु नको

कृष्णा कशी रे लागली,Krishna Kashi Re Lagali

तुझिया बोटाला,
कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार ?

माझ्या मंदिरी नाही एकही चिंधी, शालू शेले अपरंपार !
तुझिया बोटला !

दारी धावली कृष्णा ऐकुनी श्रीकृष्णाची हाक
करांगुलीचे रक्त पाहुनी कळवळली क्षण एक
डोळा ये पाणी, फाडिली जरतारी पैठणी
तुझिया बोटाला !

कृष्णा उडवू नको रंग,Krishna Udavu Nako Rang

कृष्णा, उडवू नको रंग थांब, थांब, थांब

सासुरवाशीण साधी भोळी, मी तर गौळण थोरा घरली
हिरवा शालू नवीन ल्याले डोईवर घागर धरली

तुझ्या मुरलीचे कौतुक करता, मी ठरते रे पापी पतिता
जल भरणाचे निमित्त काढुनी, येते कुणा न कळता

भिजून जाता वस्त्र माधवा, बोल लावतील नणंद जावा
मज वेडीला काही न त्याचे, तुलाच फळतील देवा

कृष्ण माझी माता,Krishna Majhi Mata

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं ।
उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥

कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥

तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा ।
वाटो ना करावा परता जीवा ॥४॥

कृति अशी भीषणा,Kruti Ashi Bhishana

कृति अशी भीषणा । अन्य ना ॥

वितरिल मना । परमेशाच्या । यातना ॥

कोमलतरा । वनिताचित्ता । जाळि ना ? ॥

कुंभारासारखा गुरू नाही,Kumbharasarakha Guru Nahi

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात

आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात

कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत


कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात

कुंपण,Kumpan

मूर्तीमंत भक्ती तू

भव्य दिव्य शक्ती तू

क्षमाशील पृथ्वी तू

हेम तूच, अग्नी तू



तरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण

असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण

कुंजात विहरतो सुगंध शिंपित,Kunjat Viharato Sugandha

कुंजात विहरतो सुगंध शिंपित वारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

हृदयात छेडती कोमल सूर सतारी
उमटले अनामिक स्वप्न मनाच्या दारी
मज आशय कळला तुझ्या प्रितीचा सारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

रंगात अबोली थरारता ओठात
राहु दे सुरंगी पाचुपंख बोटात
बिलगली पाखरे कळ्यांस देत इशारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

बहरात फुलांच्या कमान झुकली खाली
अंगात उमलुनी तिथे पौर्णिमा आली
बरसल्या अंतरी इथे सुखाच्या धारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

कुंजवनाची सुंदर राणी,Kunjavanachi Sundar Rani

कुंजवनातुन सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची उर्मी


लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रीयतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?


कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची उर्मी


मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया ... माझा राया ग

मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग


माझं काळीज तू; माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
या संसाराला देवाजीची छाया ग

मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग

मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला


मक्याच्या शेतात एकलीच होते ठावुक नव्हतं कुणा
अरे उभ्या पीकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा


मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी

माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे


तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग

कांदा-मुळा-भाजी,Kanda Mula Bhaji

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी
अवघीं व्यापिली पंढरी

सावता म्हणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

कांते फार तुला मजसाठीं,Kante Phar Tula

कांते फार तुला मजसाठीं श्रम सखये पडले ।
योग्य नसुनि मी प्रेमाला तव व्यर्थ सखे मजवरि तें जडलें ॥


जरि धरिला असता दुर्योधन । पाहिली तरि असती नेत्रांनीं ।
काय करूं तुज शोधूं कोठें । धैर्य पहा सर्वहि तें खचलें ॥

कांता वंचिता निज पतिता,Kanta Vanchita Nij Patita

कांता वंचिता निज पतिला संसारी ।

कठिण खड्ग न्याय करिल ।

अजि करि धरिता ॥



सदनीं काय वै-यांना ।

देइ ठाव कुलांगना ।

कुलांगारिणी ती पतिता ॥

कांता मजसि तूचि,Kanta Majasi Tuchi

कांता मजसि तूचि, गुरूहि तूचि; तुजसि निर्मी नेता विधाता ॥



बिकट रणी मज शास्ता आता तुझे भाषण

कधि न आप्ता रणी वधिन; तूचि रणाला नियंता ॥

कांचनस्वप्ने नाचत,Kanchan Swapne Nachat

कांचनस्वप्ने नाचत उधळत, हसलि रात पुनवेची
श्यामसुंदरासवे रंगली, राधा गोकुळची

राजस श्रीहरि मदन जणू तो
कस्तुरि-मळवट भाळि शोभतो
हार फुलांचा कंठी रुळतो
अधरी पावा वाजवि मंजुळ, माखली उटी चंदनाची

राधेचा घननीळ सांवळा
गोकुळचा तो मुरलीवाला
घुमवित आला, सप्तसुरांला
गोकुळचा तो मुरलीवाला, चोरिली नीज राधिकेची

यमुनालहरी हरिगुण गाती
पायी पैंजण रुणझुणु करती
वाजवि पावा तो जगजेठी

रंगले गोकुळ, रंगलि गौळण, रंगली सखी मोहनाची

कां रे ऐसी माया,Ka Re Aisi Maya

कां रे ऐसी माया । कान्हा लाविली मला ॥

क्षणभरी सोडूनि दूर तुला ।
राहिना कसा जीव पहा ।

का रे सांग राजसा ॥

किती समयी जरी झाला अबोला
जडतो का तरी छंद तुला हा ।
ना जाणे कशी वेल्हाळा ।
झाली वेडी राधिका ॥

कंठातच रुतल्या ताना,Kanthatacha Rutalya Tana

कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा, घेउनि या मोहना

कदंब-फांद्यावरी बांधिला, पुष्पपल्लव-गंधित झोला
कसा झुलावा, परि हा निश्चल, कुंजविहारीविना

थांबे सळसळ जशि वृक्षांची, कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता, थबके ही यमुना

मुरलीधर तो नसता जवळी, सप्तस्वरांची मैफल कुठली ?
रासक्रिडेची स्वप्ने विरली, एका कृष्णाविना

कंठ आणि आभाळ दाटून,Kantha Aani Aabhal Datun

कंठ आणि आभाळ दाटून येती
आणि कोसळती ..... सरीवर सरी !

पहिल्या उन्हाची हळद ओली होती

फांदीवर पाने जन्म घेत होती
भवताल त्यांना अजून ठाऊक नव्हता
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !

आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !

आता कुठे नुकतेच पंख लांब केले
आता कुठे घरट्यातून फांदीवर आले
आभाळ या पिलांचे खूप लांब आहे
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !

उधाण आहे आकाश पेलताना
उभ्या जन्माचा पाऊस झेलताना
स्वत:चे स्वत:शी लढणे दिनरात आहे
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !

कोपलास कां दया सागरा,Koplas Ka Daya Sagara

कोपलास कां दया सागरा, का झाला अन्यायीं

रडवितोस कां तुझ्या लेकुरा, जगती ठायीं ठायीं



का तव माया ममता सरली

कृपा तुझी का ओसरली ?

म्हणूनच का रे दैव कसाई काळिज तोडुन खाई