Showing posts with label ॐ. Show all posts
Showing posts with label ॐ. Show all posts

ॐकार स्वरूपा सद्‌गुरू Omkar Swarupa Sadguru



ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।

अनाथाच्या नाथा, तुज नमो ।

तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥


नमो मायबापा, गुरुकृपाघना ।

तोडी या बंधना मायामोहा ।

मोहोजाळ माझे कोण नीरशील ।


तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥


सद्गुरुराया माझा आनंदसागर ।

त्रैलोक्या आधार गुरुराव ।

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।

ज्यापुढे उदास चंद्र-रवि ।

रवि, शशी, अग्नि, नेणती ज्या रूपा ।

स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥


एका जनार्दनी, गुरू परब्रम्ह ।


तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥



ॐकार प्रधान रूप Omkar Pradhan Roop

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।

हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥



अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णु ।

मकार महेश जाणियेला ॥२॥



ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ।


तो हा गजानन मायबाप ॥३॥



तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी ।

पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥



ॐकार अनादि अनंत अथांग Omkar Anadi Anant Athang

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार

नाद ब्रम्ह परमेश्वर सगूण रूप साकार


सूर स्पर्श सूर श्रवण

स्वर गंधित आश्वासन

तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार



सूर साध्य स्वर साधन

सूर रूप स्वर दर्पण

स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार


सप्तसूर स्वर्ग सात

स्वर सांत्वन वेदनांत

सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार


ॐ नमोजी आद्या Om Namoji Aadya

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥

जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥


देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥

म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥


अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥


मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥


हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रम्ह कवळलें ॥

ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥


आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥

ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥


ओम्‌ नमो भगवते Om Namo Bhagavate

'ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय ते'

मंत्र जपताचि हा दुरित तम भंगते



जेथ ना हीनता, मलिनता न जिथे

दिव्य लोकी अशा अढळ पद लाभते !