Showing posts with label L-शांताराम नांदगावकर. Show all posts
Showing posts with label L-शांताराम नांदगावकर. Show all posts

हे चांदणे HE CHANDANE



हे चांदणे ही चारुता, ही भावभोळी लोचने

मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतीची मधु गुंजने

पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी

मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने

सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी

ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे



Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM NANDGAWAKAR
Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -कुंदा भागवत, अरुण दाते ARUN DATE

हे सावळ्या घना HE SAVALYA GHANA

हे सावळ्या घना
का छेडिसी मनाच्या अशा तारा पुन्हापुन्हा

पानांतुनी या मोहुनी गाणे जलाचे फुले
गाण्यांतुनी त्या दाटुनी झेले फुलांचे हासले
वारा हळू हा प्रीती-स्वरांनी झुलवी तृणातृणा

थेंबापरी या नाचवी पक्षी स्मृतींचा तुरा
त्या आठवांनी भारले माझ्या मनाच्या अंबरा
आता प्रियाची चाहूल ऐसी भुलवी कणाकणा

Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM
Music -अनिल-अरुणANIL- ARUN
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDWAL
Movie / Natak / Album -GEET गीत 

सजल नयन नित धार बरसती SAJAL NIT DHAR BARASATI

सजल नयन नित धार बरसती

भावगंध त्या जळी मिसळती

वीणेचे स्वर अबोल झाले

गीतामधले काव्यहि सरले

मुक्या मनाचे मुकेच आठव

मूक दीपज्योतीसम जळती

चंद्र चांदणे सरले आता

निरस जाहली जीवनगाथा

त्या भेटीतिल अमृतधारा

तुझ्याविना वीषधारा होती

थकले पैंजण चरणहि थकले

वृंदावनिचे मोहन सरले

तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले

अजुनि उखाणे मला घालिती


Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM NANDGAONKAR
Movie / Natak / Album -कविता KAVITA

तुझी माझी जोड़ी जमली ग TUJHI MAJHI JODI JAMALI G



अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी गोरी कोरी कोरी 
इश्काची नोट ही वटली हाय हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

निळ्या निळ्या नभात या दोघांची प्रीती नटली हाय
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
थोडीशी मी लाजाळू ,
ज्वानी कशी सांभाळु
भीती तुला कसली ग
मनात प्रीती वसली ग
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

जाई जुई शेवंती ,तशीच मी रे लजवंती
पाहूनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले
माझी ग तू फुलवंती
मिठीत ये ना फुलवंती
ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

गुलाबाची लाली तुझ्या, गालावरी कशी आली ग
ओठात लपली ,प्रीती ही आपली
लाजन  बहरून आली ग
प्रेमाच्या या खाना खुणा
मुक्या नं  घ्याव्या जाणून
डोळ्यातं  टिपल मनात जपल
प्रीतिच फूल मी गोडिनं
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी माझी जोड़ी जमली ग

Lyrics -शांताराम नांदगावकर  SHANTARAM NANDAWAKAR
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -माझा पती करोड़पती MAZA PATI KARIDPATI

रात अशी ही प्रीत रसीली RAT ASHI HI PRIT RASILI



रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का
सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली

बेधुंद हा  गंध स्वप्नाळ ली  रातरानी
तारयात वारयात पाण्यात ही प्रेम गाणी
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली

नयनात अदरात हृदयात तू तू तूचे  राणी
भाळी तुझ्या लावितो चांदनी ही  मी जानी
ओ मी तुझी स्वामिनी
सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली


Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM NADAGAWAKAR
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -माझा पती करोड़पती MAZA PATI KARODPATI 

चोरीचा मामला,CHORICHA MAMLA


चोरीचा मामला,मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना,करू नको दैना
या इष्काच्या  गोड गोड राती
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा  वेळ  बसा जरा तरी सोसा
या प्रीतीच्या, धुंद  धुंद राती
ये ना रानी,तू येना
ना ना राजा ना ना ना
दूर अशी तु राहु नको,प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली तुही रसीली
मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको
ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा,प्रीतीचा लागलाय नारा
ये ना रानी,तू ये ना
ना ना राजा ना ना ना
वेड तुझे हे आहे मला,सांगु मी कशी वेड्या तुला,रंगबसंती मिलन राती
लाजून चुर मी झाले,प्रीत फुला तु लाजु नको
ओढ़ अशी ही धरु नको,धुंद जवानी आज पुरानी
मदहोश जग हे झाले
मी ना राजा तू ये ना
ना ना ना राणी तु येणा
चोरीचा मामला,चोरीचा मामला,
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना,करू नको दैना
या इष्काचा गोड गोड राती
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ  बसा जरा तरी सोसा
या प्रीतीचा धुंद  धुंद राती
ये  ना राणी  तू ये ना
ना ना  राजा  तु येणा।

Lyrics -शांताराम नांदगावकर  Shantaram Nandgavkar
Music -अरुण पौडवाल Arun Paudval
Singer -सचिन, अनुराधा पौडवाल Sachin, Anuradha Paudval
Movie / Natak / Album -  चोरीचा मामला, CHORICHA MAMLA     

निशाना तुला दिसलाना Nishana Tula Dislana








निशाना तुला दिसलाना
निशाना तुला दिसलाना
झिरमिर झिरमिर पाउस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना  सजणा ये ना
निशाना तुला दिसलाना
निशाना तुला दिसलाना
झिरमिर झिरमिर पाउस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना  सजणा ये ना
निशाना तुला दिसलाना
निशाना तुला दिसलाना
हरिणी आली दारी धुंद होऊनी
होना  तुच शिकारी डाव टाकुनी
हरिणी आली दारी धुंद होऊनी
होना तुच शिकारी डाव टाकुनी
नेम असा  धरूनी तु येना
सावध हे तू वेधून  घेना            
ये ना  सजणा ये ना
निशाना तुला दिसलाना
निशाना तुला दिसलाना
हरिणी आली दारी धुंद होऊनी
होना तुच शिकारी डाव टाकुनी
हरिणी आली दारी धुंद होऊनी
होना तुच शिकारी डाव टाकुनी
नेम असा  धरूनी तु येना
सावध तो वेचुन घेणा
ये  सजणा ये ना
निशाना तुला दिसलाना
निशाना तुला दिसलाना
सावज होई शिकारी जादु पाहुणी
घायालांची  प्रीती आली रंगुनी
सावज होई शिकारी जादु पाहुणी
घायालांची  प्रीती आली रंगुनी
नयनांचे शर मारु नको ना
प्रीत फुला तु जवळी येना
येना सजनी येना
निशाना मला जमलाना
निशाना मला जमलाना
झिरमिर झिरमिर पाउस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना  सजणा ये ना
निशाना मला जमलाना
निशाना तुला दिसलाना
निशाना मला जमलाना
निशाना ला ला ला

Lyrics -शांताराम नांदगावकर Shantaram Nandgavkar.
Music -अनिल अरुण Anil Arun
Singer -अनुराधा पौडवाल ,उत्तरा केळकर ,सुरेश वाडकर ,शोभा जोश Anuradha Padwal,uttara Kelkar,suresh             Wadkar,Shobha Josh
Movie / Natak / Album -नवरी मिळे नवरय़ाला   NAVRI MILE NAVRYALA

हि नवरी असली Hi Navri Asli



हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो...... धक धक धक धक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
मला येता जाता  चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो .....

मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
हि पोरगी पटली हो नवरी नटली
पोरं शालू नेसून चमकत जाईल हो.... लक लक लक लक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो .....


लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
आता तांडव सोडून मांडव घालू ये ..लग बग लग बग
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो ....धक धक धक धक

हा नवरा असला अरे हा मनात ठसला
मला येता जाता  चोरून बघतोय हो ...टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हा नवरा असला अरे हा मनात ठसला हो .....

Lyrics-शांताराम नांदगावकर
Music- अनिल  अरुण Anil Arun
Singer-:  -अनुराधा पौडवाल, सचिन Anuradha puadval -sachin
Movie / Natak / Album - नवरी मिले नवरयाला  Navri Mile Navrala 

हसलीस एकदा भिजल्या,Hasalees Ekada Bhijalya

हसलीस एकदा भिजल्या शारद राती
बहरली फुलांनी निशीगंधाची नाती

लेऊन शुभ्रतर किरणांचे फूलपंख
चरणांतुन पेरीत प्रीत-पैंजणे लाख
उधळीत अशी तू आलीस भावूक स्वाती

तू हसून बोललीस, होऊन लज्जीत थोडी
उलगडली नयनी तुझ्या गुलाबी गोडी
नजरेतुन झरल्या प्रणयगंध बरसाती

हे युगायुगांचे प्रीतीचे अनुबंध
तेजातून उजळीत हृदयातील आनंद
येईल निशेच्या दारी सौख्य प्रभाती

हरिनाम मुखी रंगते,Harinaam Mukhi Rangate

हरिनाम मुखी रंगते
एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते

घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा
तूच यदुनाथा सदा असू द्यावा
इतुकचि मागणे तुझ्यापाशी मी मागते

काम-क्रोध-मत्सर कधी ना पाहिले
लोभ-मोह सारे दूर मी सारिले
हरीच्याच चिंतनी जीवनास मी वाहते

सांज रंगात रंगून जाऊ,Sanj Rangat Rangun Jau

सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये हा दुरावा कशाला
मलमली रात येऊ दे थांब ना, चांदण्याचा घेऊन झुला

नभ फुलले, ढग झुलले, सागराच्या किनाऱ्यास खग भुलले
स्वप्नगंधात न्हाऊन आली धरा, अंग अंगे सुखाचाच वाहे झरा
आज आनंद पानाफुलाला
गोजिरे प्रीतीचे गीत गाऊ लेउनी चांदव्याची दु:शाला

एक गाणे मनी या फुलपंखी, आळविते तुझी आज मधुवंती
शब्द माझे तुझी ही मधुगितीका, त्या स्वरांतून उमले जणू प्रीतिका
पश्चिमेला नवा रंग आला
त्याच रंगात रंगून जाऊ, ये प्रिये हा दुरावा कशाला

स्वर जुळता, मन मिळता, रोमरोमी सतारीच झंकारती
या सुखाने आता प्राण ओलावले, पापण्यांना तुझे ओठ हे स्पर्षले
मीलनाचा असा सोहळा
गोजिरे प्रीतीचे गीत गाऊ लेउनी चांदव्याची दु:शाला

सूर सनईत नादावला,Sur Sanait Nadavala

सूर सनईत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला

पुण्यवंतापरी या घरी जन्मले
सात जन्मांतले भाग्य जे लाभले
सात या पाउली विस्मरू मी कशी
मूर्त आई तुझी वत्सला ?

सान होते तशी मूक वेडी कळी
अमृताने तुझ्या वाढले मी खुळी
रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना
गंध विसरेल का गे फुला ?

पूस डोळे नको हुंदके, आसवे
चालले गे जरी मी पतीच्या सवे
माउली तू मला साउली जीवनी
मी तुझी लाडकी प्रेमला !

ससा तो ससा की कापूस,Sasa To Sasa Ki Kapus

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा

सजल नयन नित धार,Sajal Nayan Nit Dhar

सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती

चंद्र-चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविना वीषधारा होती

थकले पैंजण चरणहि थकले
वृंदावनिचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती

वृंदावनात माझ्या ही तुळस,Vrindavanat Tulas Dolate

वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते

घरकूल सानुलेसे या दोन जीवितांचे
येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे
सखयास मी मनाचे हे फूल वाहते

रघुनंद-श्याम-विष्णू त्यांच्यात मी पहाते
सानंद प्रीतिगंगा त्यांच्या हृदी वहाते
तृप्ती मनोरथांची त्यांच्यात राहते

गत जन्मिंच्या तपाचे हे पुण्य ये फळाला
या एक भाबडीला राजा गुणी मिळाला
दोघांस ईश्वराशी मी सौख्य मागते

विसर प्रीत विसर गीत,Visar Preet Visar Geet

विसर प्रीत, विसर गीत, विसर भेट आपुली
यापुढे न चांदरात, यापुढे न सावली

कंठ दाटतो असा शब्दही मुळी न फुटे
काळजात एक एक तंतुही तसाच तुटे
मीच मांडिल्या घरात शून्यता विसावली

शब्द तू दिलास एक राहिलो विसंबुनी
वंचिलेस गे अखेर तूच शपथ मोडुनी
तू उगाच स्वप्नवेल संशयात जाळिली

डोळियांत मी तुझ्या अखेर पाप जाहलो
झेलण्या उरी कलंक एकटाच राहिलो
विश्व मोकळे तुला मला चिताच लाभली

लक्ष्मी तू या नव्या,Lakshmi Tu Ya Navya

नकोस नयनी भरु आसवे देऊ नको हुंदके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके

तुझ्या पाऊली येईल आता
आनंदाची अमोल सरिता
घरकुल आमुचे प्रसन्नतेने होईल ग बोलके

इथे अंगणी किती नाचतिल
तुझ्या स्मितासम सुमने चंचल
तुझ्याच वात्सल्यातुन येतिल या सदनी माणिके

नको बावारु मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
तुझ्या गुणांची गंगा आम्हा पाहू दे कौतुके

रुपेरी वाळूत माडांच्या,Ruperi Valut Madanchya

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावीत प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा... असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करी पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा... तुझा निवारा

रामप्रहरी राम-गाथा,Ram Prahari Ram Gatha

रामप्रहरी राम-गाथा रंगते ओठांवरी

या दिशांनी राघवाचे गीत हे साकारिले
पाखरांनी आवडीने सूर त्याचे प्राशिले
रामनामी फूल फुलते डोलती तरू-वल्लरी

एकवचनी, एकपत्‍नी, एकबाणी जो सदा
जो प्रजेचे सौख्य पाही, दु:ख साही सर्वदा
तोचि विष्णू, तोचि शिवही, तोचि अपुला श्रीहरी

रात्र आहे पौर्णिमेची,Ratra Aahe Pournimechi

रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा