Showing posts with label L-रमेश अणावकर. Show all posts
Showing posts with label L-रमेश अणावकर. Show all posts

वाऱ्यावरती घेत लकेरी,Varyavarati Ghet Lakeri

वाऱ्यावरती घेत लकेरी, गात चालल्या जल-लहरी !

चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवि सुरेल संगित
अन्‌ संध्येच्या गाली नकळत स्वप्न रंगवी निलांबरी !

ताल धरोनी हरित तृणाचे
मोहक पाते मुरडत नाचे
फूल हो‍उनी कुंदकळीचे, गंध उधळिते मोदभरी

भेदभाव हे विसरुन सगळे
आनंदाने गायिलले
सप्त स्वरांचे गीत रंगले सात वेगळ्या सरोवरी

लाजवी मला हे नाव गडे,Lajavi Mala He Naav Gade

लाजवी मला हे नाव गडे
अन्‌ नयनी मनोहर प्रीत दडे

नजरानजरी हसण्यामधली
क्षण ओळख ती क्षणात जडली
प्रीत सुगंधित कळी कोवळी
गाली उधळीते गंधसडे

अवखळ माझे डोळे दोन्ही
'लाजू नका ग' म्हणती हसुनी
भाव मनीचे हसरे बघुनी
हसु का रुसू ? प्रश्न पडे

जगताहुन ही अगदी निराळी
धुंद मनाची आशा भोळी
ठरल्या जागी ठरल्या वेळी
पाऊल माझे अचुक अडे

लाजली सीता स्वयंवराला,Lajali Sita Svayamvarala

पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला

नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनकाजवळी
घेउनी, धवल फुलांची माला

धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काहि सुचेना
न्याहळी, दुरुनी श्रीरामाला

मुनीवरांना मान देउनी
उठले रघुविर असे पाहुनी
मनासारखे येता जुळुनी
नाचते, हर्षभराने मिथिला

रंग तुझा सावळा दे मला,Rang Tujha Savala De Mala

रंग तुझा सावळा
दे मला, गोविंदा घननिळा

तुझ्या रूपाचे नयनी काजळ
सूर मुरलीचे कानी कुंडल
मुग्ध मनाची करुनी ओंजळ करिते अर्पण तुला

तरूतळी या कुंजवनातुन
तू गोरा मी काळी हो‌उन
गोपी कृष्ण हा गोफ गुंफुन करु दे नर्तन मला

तुझिया चरणी क्षणि एकांती
धुंद जळी या यमुनाकाठी
माझी भक्ती हो‌उन मुक्ती करु दे मधुकर ताला

मृदुल करांनी छेडित तारा,Mrudul Karani Chedit Tara

मृदुल करांनी छेडित तारा
स्मरते रूप हरीचे मीरा

कमलदलापरि मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरि
हर्षभराने तनुलतिकेवरि
पडती अमृतधारा

कालिंदीच्या नीलजलापरि
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तिरी
खुलवी प्रीत-फुलोरा

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभुचरणाची
मिटल्या नयनी धुंद मनाची
रंगवि हसरी मथुरा

मुकुंदा रुसू नको इतुका,Mukunda Rusu Nako Ituka

मुकुंदा, रुसू नको इतुका
विनविते तुझी तुला राधिका

तुझ्या मुरलिला आतुरलेली
गवळ्याची मी गौळण भोळी
तू माझा, मी तुझी सावली
नको रे, राग धरू लटका

खिन्न होऊनी तुझियासाठी
नाच थांबला, यमुनाकाठी
गोपिनाथ तू, तुझ्याभोवती
जमल्या साऱ्या या गोपिका

पुन्हा एकदा पहा विचारुनि
तुझे तुला तू मनापासुनी
तू नाही, तर तुझ्यावाचुनी
मंजुळ नाद येइल का ?



मी मनात हसता प्रीत,Mi Manat Hasata Preet

मी मनात हसता प्रीत हसे
हे गुपित कुणाला सांगु कसे

चाहुल येता ओळखिची ती
बावरल्यापरि मी एकांती
धुंद जिवाला डोळ्यांपुढती
नव्या नवतिचे स्वप्न दिसे

किंचीत ढळता पदर सावरी
येता जाता माझि मला मी
एक सारखी पाहि दर्पणी
वेड म्हणू तर वेड नसे

काहि सुचेना काय लिहावे
पत्र लिहू तर शब्द न ठावे
नाव काढिता रूप आठवे
उगा मनाला भास असे

मी एकला वेड्यापरी,Mi Ekala Vedyapari

मी एकला वेड्यापरी येतो इथेच आणि
वाळूवरी आसूभरी लिहितो जुनी कहाणी !

हा तोच चंद्र आणि चौफेर तोच वारा
झुडुपास बिलगलेला खडकाळ हा किनारा
हे तेच ते सारे इथे, माझे मला न कोणी !

ते दृष्य़ आठविता माझे मला न ठावे
हा दोष काय माझा ? हे का असे घडावे ?
तो ढासळे ही आसवे मज आसरा म्हणोनी

मी जाणतो परंतु जाणून काय त्याचे
जाणील कोण आता हे बोल या मुक्याचे
ना बोलता माझी व्यथा गाई मनी विराणी

मस्त ही हवा नभी,Mast Hi Hava Nabhi

मस्त ही हवा नभी, वाटते नवे नवे
तू जिथे तिथे तुझी, धुंद मी तुझ्यासवे

स्पर्ष हा तुझा प्रिया, या जगात या क्षणी
सौख्य अर्पितो मला अमृतात न्हाऊनी
स्वप्न पाहता नवे पापणी हळू लवे

वेल बहरुनी वरी, गंध फेकिते कळी
प्रीत याहुनी नसे या जगात वेगळी
हात हा तुझा सखे जोवरी न सोडवे

मुग्ध भावनेतले गीत आज रंगुनी
धुंद प्रीत आळवी वेगळ्या सुरांतुनी
अर्थ तोच शब्दही, जे तुला मला हवे



मज सांग सखे तू सांग,Maj Sanga Sakhe Tu Sang

मज सांग सखे तू सांग मला
पत्रात लिहू मी काय तुला ?

चंद्रमुखी तू चांद म्हणू तर
प्रिये म्हणू का तुज घटकाभर
रूप तुझे गिरवीत निरंतर,
शब्द सुचेना काहि मला

किंचित हसऱ्या तव नजरेवर
लाज बावरी, रूप मनोहर
नजरानजरी मीही क्षणभर,
अर्थ मनीचा जाणियला

लिहितालिहिता शब्द थांबती
लिहू नये तर कसली प्रीती
नाव सारखे ओठांवरती,
वेड लाविते जीवाला

बोले स्वर बासरिचा,Bole Swar Basaricha

बोले स्वर बासरिचा
राधेला छंद तुझा

तरु-वेली-फुलांतुनी
गोकुळ हसऱ्या नयनी
यमुनातटि कुंजवनी
उधळी गंध मनीचा

कुणिहि किती हसु दे तिज
खंत न त्याचा कसला
भरदिवसा घेउन हरि
शिंपि सडा प्रीतीचा

राधेची कृष्णावर
ओढ कुणा न कळली
प्रभुचरणी गौळण ही
गुंफि भाव अंतरिचा

प्रभाती सूर नभी रंगती,Prabhati Sur Nabhi Rangati

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती

पानोपानी अमृत शिंपित, उषा हासरी हसते धुंदित

जागी होऊन फुले सुगंधित, तालावर डोलती

कृषीवलांची हाक ऐकुनी, मोट धावते शेतांमधुनी
पक्षी अपुल्या मधुर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळविती

प्रसन्न वदनी सुहासिनी कुणि, सडे शिंपिती मृदुल करांनी
श्रीविष्णूचे नाम स्मरूनी, तार कुणी छेडिती



पत्र तुझे ते येता अवचित,Patra Tujhe Te Yeta Avachit

पत्र तुझे ते येता अवचित
लाली गाली खुलते नकळत

साधे सोपे पत्र सुनेरी
नकळे, क्षणभर ठेवु कुठे मी
शब्दोशब्दी प्रीत हासरी
लाज मनाला, मी शरणागत

आजवरी जे बोलु न शकले
शब्दांवाचुन तू ओळखले
गीत लाजरे ओठावरले
गुणगुणते मी नयनी गिरवत

वेळिअवेळी झोपेमधुनी
जागी होते मी बावरुनी
खुळ्या मनीचा भास जाणुनी
गूज मनीचे हृदयी लपवित

निरोप तुज देता उर्मिला मी,Nirop Tuj Deta Urmila Mi

उर्मिला मी, निरोप तुज देता
जाउ नको वनी या क्षणी, सांगु कसे नाथा ?

पितृवचनी रामामागुनि
चरण चालती निश्चय करुनी
बंधुप्रेम हे गहिवरुनीया, मीच स्वये पाहता
निरोप तुज देता, उर्मिला मी !


रघुवंशातिल ज्या पुरुषाला
देव म्हणोनि मी पुजियला
वीर धनुर्धर त्या वीराची, असता पतिव्रता
निरोप तुज देता, उर्मिला मी !

मुग्ध मनाची वेडी माया
दु:ख झेलुनी झिजते काया
या झिजण्यातच शतजन्मीचे भाग्य मला लाभता
निरोप तुज देता, उर्मिला मी !

नाम घेता तुझे गोविंद,Naam Gheta Tujhe Govind

नाम घेता तुझे गोविंद
मनि वाहे भरुनि आनंद

हृषिकेशी बन्सिबिहारी
गोकुळिचा कुंजविहरी
कुणि म्हणती कृष्ण-मुरारी
कुणि मिलिंद आणि मुकुंद

विश्वाचा नाथ म्हणोनी
हासते विश्व तव वदनी
तव नामे तुझिया चरणी
नाचते यमुनाजळ धुंद

तू शब्द ओळिओळीत
तू अर्थ मधुर गीतेत
तू ताल भक्तिगीतांत
तू सुरासुरांत सुगंध

नकळत सारे घडले,Nakalat Sare Ghadale

नकळत सारे घडले
मी वळता पाउल अडले

ती पहिली क्षण ओझरती
परिचयात ओळख नुसती

संभाषण ओठांवरती,
लाजण्यात राहुन गेले

नजरेला नजरेमधला
हसताना भाव उमगला
प्रीतीचा डावहि पहिला
मी क्षणात मोहुन हरले

सोन्याहुन अति मोलाचे
हे माझे गुपित मनीचे
मनि सुगंध उधळित नाचे
क्षण मलाच का हे नकळे

दिनरात तुला मी किती,Dinrat Tula Mi Kiti

दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसती मला मी काय करू ?

भरल्या नयनी हात जोडुनी
सांगु कुणाला काय म्हणोनी ?
काहुर मनिचे येता दाटुनि
माझि मला मी कशी सावरू ?

कितीकदा मज बघुनी कष्टी

जे येती ते वेडी म्हणती
मुग्ध कळीपरि मिटल्या ओठी
ध्यानि मनी मी अशि किती झुरू ?

निराधार मी धुळीस मिळुनी
गेले वेढुनि चहु बाजूनी
खिन्न जगी या बंदीवान मी
तुला नव्हे तर कुणा विचारू ?

ते नयन बोलले काहितरी,Te Nayan Bolale Kahi Tari

ते नयन बोलले काहितरी
मी खुळी हासले खुळ्यापरी

निळ्या नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता बघता मीही क्षणभर
झाले ग, बावरी

क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनुकोमल या वेलीवरले
फूल फुले अंतरी

मला हवे जे अतिमोहक ते
कसे अचानक जुळुनी येते
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमात क्षणभरी

ते गीत कोकिळे गा,Te Geet Kokile Ga

ते गीत कोकिळे गा पुन्हा पुन्हा
लुब्ध तुझ्या गाण्याला मुग्ध भावना

तुझ्या गाण्याचे ऐकुन सूर
नदिनाल्यांस येती पूर
जललहरींतुनी प्रीत ये धावुनी
तरूवेलीस येई कल्पनासप्तसूरांत होऊन दंग
विश्व गाण्यात होई गुंग
दंवबिंदूंतुनी गीत ये रंगुनी
सूर तालास देई चालनातुझ्या कंठातले अमृताचे
गीत आहे तुझे मोलाचे
गोड गाण्यातले सूर हे आगळे
धुंद जीवास देई प्रेरणा

गुपित मनिचे राया,Gupit Maniche Raya

गुपित मनिचे राया सांगते तुला
हे तू नकोस सांगू कुणा
तुजविण मज कुणि नाही सजणा
हे तू नकोस सांगू कुणा

एकांती, अनुरागी हृदयीचे गुंफुन धागे
दिल माझे तुजसंगे मज घेऊन आले वेगे
मन सांगताना माझे आढेवाढे घेते

क्षण माझे नच ठावे प्रीतिला काय म्हणावे
तुजपाशी मी यावे अन्‌ जवळी मला तू घ्यावे

तुला पाहताना हे ऐसे कैसे व्हावे