Showing posts with label L -सुधांशु. Show all posts
Showing posts with label L -सुधांशु. Show all posts

मी खरंच रुसले Mi kharach rusle

मी खरंच रुसले, उगाच चिडवू नका
गडे, तुम्हि माझ्याशि बोलू नका

मला हसून का हो हसवता ?
मला रुसून का हो फसवता ?
मी हसायची नाही, मी फसायची नाही
माझ्या नादाला लागू नका

तुमचे लाडिक हसरे बोल
नाही जायचा अशानं तोल
फोल लाडीगोडि, नका घालू कोडी
मला भोळीच समजू नका

इश्श, कशाला धरता पदर
जरा बाजुला घ्या ना नजर
बरं बोलेन हं मी, बाई भारिच तुम्ही
भीड भलतीच घालू नका


Lyrics - Sudhanshu सुधांशु
Music - R N Paradkar आर. एन्‌. पराडकर
Singer - R N Paradkar आर‌. एन्‌. पराडकर

इथेच आणि या बांधावर ,Ithech Aani Ya Bandhavar

इथेच आणि या बांधावर

अशीच श्यामल वेळ

सख्या रे, किती रंगला खेळ !


शांत धरित्री शांत सरोवर


पवन झुळझुळे शीतल सुंदर

अबोल अस्फुट दोन जिवांचा

अवचित जमला मेळ.


रातराणिचा गंध दर्वळे

धुंद काहिसे आतुन उसळे

चंद्र हासला, लवली खाली

नक्षत्रांची वेल.


पहाटच्या त्या दवात भिजुनी


विरली हळुहळु सुंदर रजनी

स्वप्नसुमावर अजुनि तरंगे

ती सोन्याची वेळ.