Showing posts with label L-एस. एम. बापट. Show all posts
Showing posts with label L-एस. एम. बापट. Show all posts

विनवी नामा विठुरायाला,Vinavi Nama Vithurayala

विनवी नामा विठुरायाला
घास मुखी हा घ्यावा
गोड करा ही सेवा, देवा

तुला उपाशी ठेवूनी जाता
भरेल रागे मजला माता
घाली पाखर या बाळावर
धरिला का हो रुसवा, देवा

जाग कशी तुज येत न अजुनी
प्राण तुझ्या मी देईन चरणी
करुणामय ती द्रवली मूर्ती
पाहुनि प्रेमळ भावा, देवा

भरवी प्रेमे भक्त चिमुकला
डुले विटेवर हरि सावळा
तन्मय झाले सान थोर जन
सेवुनि तो हा सुख मेवा, देवा