Showing posts with label काळी बायको (१९७०). Show all posts
Showing posts with label काळी बायको (१९७०). Show all posts

सूर्यदेव आला Suryadev Ala



आभाळानं उघडला सोनियाचा डोळा
निळ्यानिळ्या अंगणात सूर्यदेव आला

कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जाग
गोठ्यामधे बोलाविते गाय वासराला

झाली तुळशीची पूजा, गाव लागे कामकाजा
दूरिताला पुण्याईचा मिळाला उजाळा

या नव्या सुखाला काय,Ya Navya Sukhala Kaay

या नव्या सुखाला काय म्हणू
हे भाग्य नव्हे, सौभाग्य जणू

नटली शोभा नव्या घराची
ठेव सासरी माहेराची
अखंड माया संसाराची
गोफ लागले विणू

फांदीवरती चिमणा चिमणी
खुणावती मजला रे घरट्यामधुनी
एकांतीचे सुख पाहुनी
थरथरली ही तनू

या राजाची मी तर राणी
जीव फुलविते मोरावाणी
आनंदाचे आळवित गाणी
किती किती मी शिणू

कुणी ग बाई मारली,Kuni Ga Bai Marali

अजुनी जाईना कळ दंडाची चढवू कशी मी चोळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?

दिसं जत्रंचा होता पहिला, साजा संगं मी शिणगार केला
मी बाई भित्री, हरिणी बावरी, नाजुक चंद्रावळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?


हौशी, गवशी, नवशी पोरं, फिरू लागली मागं म्होरं
कोण कसा ग डिवचून गेला राधेला वनमाळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?

कळ गेली ग काळीज चिरुनी, काटा आला अंगावरुनी
दवापाणी मी करू, कशाची उगळून लावू मुळी?
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?