Showing posts with label L-ग्रेस. Show all posts
Showing posts with label L-ग्रेस. Show all posts

मंदिरे सुनी सुनी MANDIRE SUNI SUNI



मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी, कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी

रात  सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
रात  सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी

गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी
गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी
दुःख बांधुनी असे, क्षितीज झाकिले कुणी
दुःख बांधुनी असे, क्षितीज झाकिले कुणी
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी

एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी

Lyrics -ग्रेस GRES
Music -पं. हृदयनाथ मंगेशकर P.HRUDAYNATH MANGESHAKAR
Singer - लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -सैल (२००६)  SAIL (2006)

वाऱ्याने हलते रान,Varyane Halate Raan

वाऱ्याने हलते रान
तुझे सुनसान
हृदय गहिवरले;
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले .....

डोळ्यात शीण
हातात वीण
देहात फुलांच्या वेगी;
अंधार चुकावा म्हणून
निघे बैरागी .....

वाळूंत पाय
सजतेस काय ?
लाटान्ध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
तुझ्या की ओठी ?

शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद
तुझा की वैरी ?

वाकल्या दिशा फुलून,Vakalya Disha Phulun

वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा.

या फुलांत, या सुरांत, चंद्र घालतो गळा
पावले अशी सलील नादती कुठून नाद ?
मी क्षितिज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत.

दु:ख एक पांगळे जशी तरूंत सावली
या उरात पेटलीस, का उन्हास काहिली ?
असे कसे सुने सुने मला उदास वाटते
जशी उडून पाखरे नभात चालली कुठे ?

भय इथले संपत नाही,Bhay Ithale Sampat Nahi



भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे


पाऊस कधीचा पडतो,Paus Kadhicha Padato

पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने.

डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दु:खाचा उडला पारा..... या नितळ उतरणीवरती.

पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला.

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा !

त्या व्याकुळ संध्यासमयी,Tya Vyakul Snadhya Samayi

त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो.


तू आठवणीतुन माझ्या
कधि रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधि असते माझ्यापाशी .....

पदराला बांधुन स्वप्ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई .....


तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा .....
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाऊस यावा !

तुला पाहिले मी नदीच्या,Tula Pahile Mi Nadichya

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली .....

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे .....

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा .....

ती गेली तेव्हा रिमझिम,Ti Geli Tevha Rimjhim

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता

घर थकलेले संन्यासी,Ghar Thakalele Sanyasi

घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झऱ्याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई

घनकंप मयूरा तुला,Ghankampa Mayura Tula

घनकंप मयूरा, तुला इशारा
खोल पिसारा, प्राण आडवा पडे
तू वळशिल माझ्याकडे ?

घनकंप मयूरा

घनसंथ मयूरा
घननीळ मयूरा
घनदंग मयूरा
घनरंग फकिरा

घनसंथ मयूरा धूळ दरारा
कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती
गीतांतुन गळते माती

घननीळ मयूरा रंग फकिरा
तुला पहारा ? कातडे वाळत्या वेळी
ते भीषण ऊन कपाळी

घनदंग मयूरा, नको सहारा
हलका वारा, बिंदीत चंद्र थरथरते
ती वस्त्र कुठे पालटते