Showing posts with label L-अशोकजी परांजपे. Show all posts
Showing posts with label L-अशोकजी परांजपे. Show all posts

साक्षीस चंद्र आणि,Sakshis Chandra Aani

साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते
त्या भोगल्या क्षणांना नव्हतेच काहि नाते

डोळ्यांत बिंब होते नुसते भिजून गेले,
नि:श्वास ते कळ्यांचे कोषांत लाजलेले
होता फुलून आला अंगावरी शहारा
गात्रांत मात्र राजा, कसलेच भान नव्हते !

प्रतिसाद मूक होता ओठांत थांबलेला,
तो शब्द रे सुखाचा हृदयात कोंदलेला
गालांवरी खुळी रे, कळ एक साचलेली
दु:खात की सुखी रे, काहीच ज्ञात नव्हते !

सावळ्या हरिचे घेइ सदा,Savalya Hariche Ghei Sada

सावळ्या हरिचे घेइ सदा नाम
तेणं तुझे काम पूर्ण करी

प्रल्हादाची भक्ती पाहुनी जो धावे
केशवा त्या ध्यावे, मनमंदिरी

चोखोबाचा भाव मानी सदा चोखा
तोच हरि देखा, घरोघरी

मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास
हरि ही तयास हृदयी धरी

समाधी घेऊन जाई,Samadhi Gheun Jai

समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये

निवृत्तीनाथांनी चालविले हाती
पाहुन ती मूर्ती धन्य वाटे
आपण निर्गुण मागे परी दान
विश्वाचे कल्याण-निरूपण

सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ
मायेचे हे बळ राया बोले
ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट
फुटली पहाट ब्रम्हज्ञान

नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ
सज्जनाचे बळ समाधान

गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले ?
पद्माचे आसन घालविले जाण
ओंकार ते पूर्ण पंचप्राण

पैलतिरी हाक आली आज कानी
करूनी निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्तजन

विनायका हो सिद्धगणेशा,Vinayaka Ho Siddhaganesha

विनायका हो सिद्धगणेशा !
रंग सभेला या तुम्ही या

पक्षी गाती घरट्यांमधुनी
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या

नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु-तोमर
नाग कटिला बांधुन या

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या

आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊन या

वाट इथे स्वप्नातिल,Vaat Ithe Swapnateel

वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे बावरी तनू

दऱ्यांतुनी आनंदला पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो ग गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग इंद्राचे धनू

पैलतिरी रानामाजी,Pailtiri Ranamaji

पैलतिरी रानामाजी, नको नको, येऊ नको रे
प्रीत आहे माझी भोळी, साद तिला घालू नको रे

बालपण दूर गेले निघुनी, श्रावणाचे स्वप्न आले
बांधावर कोणी आले शिवारा, पाऊल ते कानी आले
ओलावल्या गीताला तू सूर ओला देऊ नको रे

भारावले डोळे गेले मिटुनी, भावनांचे सूर झाले
शोध घेती आज भाव-किनारा, ओठांतही शब्द आले
गंधवेड्या शब्दांतुनी या, अर्थ वेडा काढू नको रे

पाहू द्या रे मज विठोबाचे,Pahu Dya Re Maj

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥

कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी
अंगवी बरवी उटी गोपाळाच्या ॥

जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा
घालू घननीळा आवडिने ॥

नामा म्हणे विठो पंढरीचा राणा
डोळिंया पारण होत असे ॥

पाखरा जा दूर देशी,Pakhara Ja Dur Deshi

पाखरा जा दूर देशी
सांग माझा निरोप माझ्या साजणा

चैत्राचे चांदणे मला आज बोलवे
बोलण्यात त्याचिया भान पार मालवे
मी आज एकली, साथ ना कुणाची
म्हणूनिच लाडक्या जा सांग ना

मैनेचे बोलणे मला आज आठवे
आठवांत होई ग मन फार हळवे
प्रित आज हसली, साथ ना मनाची
म्हणूनिच लाडक्या जा सांग ना

नाविका रे वारा वाहे रे,Navika Re Vara Vahe Re

नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे

आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे

नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजले मी, चांदवा ल्याला
माझा जीवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संग त्याच्या भाव रे

नाम आहे आदी अंती,Naam Aahe Aadi Anti

नाम आहे आदी अंती नाम सर्व सार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नामे तरीले पतीत, तरीले पाषाण
नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण
नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नाममय झाला चोखा, ब्रम्ही लीन झाला
अजामेळ पापराशी, वैकुंठासी गेला
तेथे उभे पंढरीचे घेउनी आकार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नाम जपो वाचा नित्य, श्वासांतही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म
नामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

दीनांचा कैवारी दु:खिता,Dinancha Kaivari Dukhita

दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
मुला माणसात माझा विठ्ठल साजिरा

वेदनेत जन्मे हरी, संकटात रांगे

दरिद्र्याच्या झोपडीत गीता नित्य सांगे
दलितांच्या माथा धरितो मायेचा पिसारा

शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग
घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग
ऊब देतो थंडीमाजी पिऊनी निखारा

देव नाही राऊळात, नाही त्या आकार
देव आहे तुमचा-आमुचा मानवी आचार
तापलेल्या पाऊलांना होई जो आसरा

तुझिया गे चरणीचा झालो,Tujhiya Ge Charanicha Jhalo

तुझिया गे चरणीचा झालो मृगनयनी दास

जन्मजन्मीचे नाते अपुले
कामिनी, मम हृदयी विरह दु:ख सले

कैवल्याच्या चांदण्याला,Kaivalyachya Chandanyala




कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर

केतकीच्या बनी तिथे,Ketakichya Bani Tithe

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी, सोडला ग धीर

पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला ग, आसावला सूर

भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले
धुक्यातुनी कुणी आज, भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला ग, भारला चकोर



कुणी निंदावे वा वंदावे,Kuni Nindave Va Vandave

कुणी निंदावे वा वंदावे, फोल पसारा सारा रे
कृष्णरूप जग झाले आता, मी तर वेडी मीरा रे

सदनी असो वा वनात किंवा, जळात राहो रणांत अथवा
नामघोष तो एकच हृदयी, राधाधर हरि मिलिंद रे

वृंदावन जन गोकुळ गुणिजन, सेवा ध्यान तपोधन सारे
इच्छा एकच मनात नांदे, हरिपावन मन जीवन रे

देहचि मंदिर, आत्मा गिरिधर, नयन सरोवर तीर्थचि रे
मीरेचे प्रभु मोहन श्रीधर, पाप विनाशी नामचि रे

एकदाच यावे सखया,Ekdach Yave Sakhaya

एकदाच यावे सखया, तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे, धुंद त्या सुरांनी

असा चंद्र कलता रात्री, रानगंध यावा
सर्व भान विसरुन नाती, स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गूज अंतरिचे हे कथावे व्यथांनी

एकदाच वाटेवर या तुला मी पहावा
भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा
असा शांत असता वारा, रानपक्षि गावा
शब्दरूप प्रतिमा बघुनी जीव विरुनि जावा
स्वप्न हेच हृदयी धरिले खुळ्या आठवांनी

अवघे गर्जे पंढरपूर,Avaghe Garje Pandharpur

अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर

टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ति
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर

इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर

देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर

आला आला ग सुगंध मातीचा, Aala Aala G Sungadha Maticha

दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो
आला आला ग, सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग, सुगंध मातीचा

श्रावणात सारे जीव झाले बाई ओले
ऊन हळदीचे पानापानातुन खेळे
उभी पिके हिंडोलती, बाळे झाडांची बोलती
आला आला ग, सुगंध मातीचा

वसुंधरा आज नवरसात बुडाली
माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली
श्रियाळराजाचा सण चांगुणा मातेचा
नागपंचमीचा देव तो ग शोभला

कुणी गौरी ग पुजिती, गोफ रेशमी विणती
आला आला ग, सुगंध मातीचा