बंदु येईल माहेरी न्यायला BANDU YEIL MAHERI NYAYALAबंदु येईल माहेरी न्यायला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

सण वर्साचा हा गौरी गणपती
सण वर्साचा गणपती
सण वर्साचा गणपती
इथ येईल आनंदाला भरती 
येई आनंदाला भरती
येई आनंदाला भरती

साडी चोळी नवी ओ ओ ओ ओ
साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

तिथ जमतील लाडक्या मैतरणी
माझ्या लाडक्या मैतरणी
माझ्या लाडक्या मैतरणी

घेर धरतील भवती साऱ्या जनी
घेर धरतील साऱ्या जनी
घेर धरतील साऱ्या जनी

मला विनवणी करतील नाचायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला 

माहेरी जाया घूमत मन पाखरु
हे घूमत मन पाखरु
हे घूमत मन पाखरु

आय बापाची ओढ कशी आवरु
मी ओढ कशी आवरु
मी ओढ कशी आवरु
गोड कौतिक करउनी घ्यायला
गोड कौतिक करउनी घ्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला 
गौरी गणपतीच्या सणाला 
गौरी गणपतीच्या सणाला 


Lyrics - Vilas Jaitapkar विलास जैतापकर
Music -Arvind-Nirmal अरविंद -निर्मल
Singer - Madhuri Karmakar माधुरी कर्माकर

 Netbhet Youtube Channel


No comments:

Post a Comment