Showing posts with label L-नाना पालकर. Show all posts
Showing posts with label L-नाना पालकर. Show all posts

यशाने दुमदुमवू त्रिभुवने,Yashane Dumdumavu

यशाने दुमदुमवू त्रिभुवने

सकल भेद भारती मिटावे
अभिमाने हे राष्ट्र उठावे
आकाक्षांनी अशा आमुची संचरलेली मने

कर्तुत्वाच्या विश्वासावर
सदैव आम्ही राहू निर्भर
नैराश्याचे ऐकु न येइल यापुढती तुणतुणे

मन का दुबळे अदास व्हाया ?
लोह असे का मन गंजाया ?
का भीषण त्या मुशीत सोने ठरते हिणकस उणे ?

वाळूवरती मीन तडफडे
तसेच अमुचे जीवन उघडे
ध्येयसागरी विहरू अथवा क्षणी संपवू जिणे

संकल्पाच्या सिद्धीवाचुन
थांबू आम्ही एकहि न क्षण
नेत्याच्या त्या आधीन केवळ अमुची ही जीवने

धीर-वृत्तिचा उंच हिमाचल
भीषणतेतहि निर्भय निश्चल
नेता ऐसा मिळे आम्हाला, काय असे मग उणे

चला निघू या सरसावोनी,Chala Nighu Ya Sarsavoni

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी !

विस्कटलेले अवघे जीवन, खंत जयांना याची
पडती स्वप्ने उत्थानाची, उज्ज्वल भवितव्याची
जागरुक अभिमानी असले, असती जे जे कोणी !

उधाणलेल्या जलधीसंगे यावा झंझावात
तशी देउनी पराक्रमाला अभिमानाची साथ
परक्यांची या टाकू पुसुनी येथिल नावनिशाणी !

तिखंडात दुमदुमुनी जावी जरि राष्ट्राची कीर्ती
कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती
भेद विरावे, स्फुरण चढावे, नवशुभ आकांक्षांनी !

ईर्ष्या अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी
’कसे व्हायचे’ अशी नसावी खचलेली जनवाणी
हासत जावे काट्यांवरुनी तरुणांनी अनवाणी !

उठता आपण नमतिल विघ्ने महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन तुंग हिमालय माथा ?
विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी !!