Showing posts with label L-मधुकर ठाकूर. Show all posts
Showing posts with label L-मधुकर ठाकूर. Show all posts

करुया उदो उदो उदो,Karuya Udo Udo Udo

अंबाबाईचा उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
घेऊया लाभ दर्शनाचा, उदो उदो !

साऱ्या जनतेची आई, माता अंबाबाई
हाकेला उभी राही, सारं काही तीच्या ठायी

सत्य डोळ्यांनी पाही, दंड दुष्टांना देई
अनेक रूपे तीही घेई भक्तांच्या पायी
अश्विनी प्रथम दिनी, बसते सिंहासनी

होतो जयघोष माऊलीचा, उदो उदो !

तेथुनी जरा दुरी स्वामीची गगनगिरी
अंश तो परमेश्वरी, भक्ती दत्ताची खरी
गुहेत स्थान जरी, बाजुला खोल दरी
रूप ते त्यांचे जणू शिवशंकरापरी
भेटुया त्यांना चला पाहुया ईश्वरी लीला
भरे दरबार भाविकांचा, उदो उदो !

डोंगरी माथ्यावर जोतिबांचे मंदीर
जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर
असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार
करिती देवींचा तो उत्सव घरोघर
सोहळा मनोहर, रम्य तो खरोखर
सुटे मधुगंध चंदनाचा, उदो उदो !