Showing posts with label L-राम गणेश गडकरी. Show all posts
Showing posts with label L-राम गणेश गडकरी. Show all posts

साजणि बाई सजवी मजसी,Sajani Bai Sajavi Majasi

साजणि बाई । सजवी मजसि करि घाई ।
लगीन घडि जाई । वेळ आली भरा ।
देव आले घरा । करा चतुराई ॥

साजणि बाई । नटुनि थटुनि लवलाही ।
निघते अंगाई । राजराजेश्वरा ।
जवळि याहो जरा । बघिन मुख काही ॥

साजणि बाई । चपळ पळत मन पदी ।
जवळि नच राहो । मंगलाचे सडे ।
टाकि चोहीकडे । दावि नवलाई ॥

मंगल देशा पवित्र,Mangal Desha Pavitra

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥

भासे जनात राया,Bhase Janat Raya

भासे जनात राया । हां असे मनात राया
नवखंड देह नटला । दिलदार प्यार राया
मागे सदा फिराया । भागे अनंत काया
लावे जिवास माया । लाभे परी न राया
हाती अखंड भरला । इष्के शराबे प्याला
नाही अजून प्याला । दिलदार प्यार राया

नाचत ना गगनांत,Nachat Na Gaganat

नाचत ना गगनांत । नाथा ।
तारांची बरसात ॥

आणित होती । माणिक मोतीं ।
वरतुनि राजस रात ॥

नाव उलटली । माव हरपली
चंदेरी दरियांत ॥

ती ही वरची ।
देवाघरची दौलत लोक पहात ॥