कळेना अजुनी माझे मला
असा मी काय गुन्हा केला ?
हितगूज केले ज्या नयनांनी
त्या नयनांतुनि येई पाणी
दोन जीवांची प्रीतही रुसुनी
गेली सोडुनि आज अम्हाला
जागे होता घाव अंतरी
नको नको ते येई पदरी
दुःख प्रीतीचे सांगावे तरी
जनरूढीची भीड मनाला
सुखशांतीला फितुर होऊनी
दैवहि माझे गेले निघुनी
उभी एकटी वेड्यापरि मी
काय विचारू कसे कुणाला ?
No comments:
Post a Comment