Showing posts with label S-सुरेश वाडकर. Show all posts
Showing posts with label S-सुरेश वाडकर. Show all posts

येई वो विठठ्ले YEI WO VITHTHALE



येई वो विठठ्ले ,भक्तजन वत्सल्ये
येई वो विठठ्ले ,भक्तजन वत्सल्ये
करुणा कल्लोळे  पांडुरंग ,करुणा कल्लोळे पांडुरंगे  पांडुरंगे
भक्तजन वत्सल्ये,भक्तजन वत्सल्ये
येई वो विठठ्ले ,भक्तजन वत्सल्ये

सजल जलद घन ,पीतांबर परिधान
सजल जलद घन ,पीतांबर परिधान
पीतांबर परिधान ,पीतांबर परिधान
पीतांबर परिधान
सजल जलद घन ,पीतांबर परिधान 
सजल जलद घन ,पीतांबर परिधान

येई उध्धरणे,येई उध्धरणे
केशीराजे,केशीराजे
भक्तजन वत्सल्ये,भक्तजन वत्सल्ये
भक्तजन वत्सल्ये,भक्तजन वत्सल्ये
येई वो विठठ्ले ,भक्तजन वत्सल्ये

नामा म्हणे तू विश्वाची जननी
नामा म्हणे तू विश्वाची जननी
विश्वाची जननी,विश्वाची जननी,विश्वाची जननी
नामा म्हणे तू विश्वाची जननी

क्षीरब्धी निवासनी जगदंबे ,क्षीरब्धी निवासनी जगदंबे
भक्तजन वत्सल्ये,भक्तजन वत्सल्ये
येई वो विठठ्ले ,भक्तजन वत्सल्ये
येई वो विठठ्ले ,भक्तजन वत्सल्ये
येई वो विठठ्ले
पांडुरंग पांडुरंग  पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग  पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग


Singer -सुरेश वाडकर SURESH WADAKAR

रूपे सुंदर सावळा RUPE SUNDER SAVALA

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी


Music -संत एकनाथ SANT EKANATH
Singer -सुरेश वाडकर  SURESH WADAKAR

हृदयी वसंत फुलताना HRUDAI VASANT FULATANA



हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..

मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको
मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको

गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..
पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..

उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे...
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...

हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा...
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल SURESH WADAKAR,ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -ASHIHI BANAVA NAVAVI अशी ही बनवा बनवी 

तुझा पाऊस वेगळा TUZA PAUS VEGALA

तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!
नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!
माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!

कण्हेरीच्या फुला,
गावचा पाऊस भारी... बेभान गं सरी!
तडातडा गारा ...शमे तहान गं उरी...
लाड पाऊस करतो ...मला कुशीत गं घेतो !
तळं साचूनी गं वेडा...जागा नौकेला या देतो !

मला एकटा बघुनी...आज घरात गाठूनी,
माझ्या डोळयापरि टिपं, त्यानं छतात गाळूनी,
तुझा सांगावा दिला...तोही हळवा झाला...
ऊनचटक्याचा सोस... त्याच्या डोळयात वाचला!
कण्हेरीच्या फुला,
माझा पाऊस गं लळा! . तुझा पाऊसच झळा!!

गावचा पाऊस म्हणे रानीवनी जातो!
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो !
ताल पाऊस धरतो ...माझ्या कौलावरी गातो !
तुझ्या रंगात न्हाऊनी ...मनामनात नाचतो !!

तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप !
व्याप पावसाला किती! ...तुला नदीतीरी ताप !
तुझा नकार घेऊनी... तो गं वळवाचा आला...
अस्सा विरह सोसेना ... तो गं पुरा कोसळला !!
कण्हेरीच्या फुला,
माझा पाऊस गं भोळा ! ...तुझा पाऊस गं चाळा !!

नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!
माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!
कण्हेरीच्या फुला,
तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!

Lyrics -प्राजक्ता गव्हाणे PRAJAKTA GAVHANE
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -सुरेश वाडकर SURESH  WADAKAR
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२)  KANHERACHI FULE(२०१२)

धाव घे करुणा करा DHAW GHE KARUNA KARA



धाव घे  करुणा करा ,पाव रे करुणा करा
धाव घे  करुणा करा ,पाव रे करुणा करा
धाव घे  करुणा करा ,

सावळ्या प्रभु सुंदरा  ,धाव घे  करुणा करा
तारावया  तारावया  भक्तजना
तु कृपेच्या सागरा,  धाव घे  करुणा करा ,
धाव घे  करुणा करा ,

ध्याणी मनी स्वप्नात तू
ध्याणी मनी स्वप्नात तू
गर्दीत तो विजनात तू
जेथे तिथे सर्वत्र तू
भाषात तू ,ध्यासात तू
भाषात  ,ध्यासात  ,श्वासात तू
सर्वेश्वरा, सर्वेश्वरा  धाव घे  करुणा करा 
धाव घे  करुणा करा
सावळ्या प्रभु चंदना ,धाव घे  करुणा करा

विश्वातला आनंद तो  ,हृदया तला हरी गंध तो
विश्वातला आनंद तो ,हृदया तला हरी गंध तो
लावण्य तो ,चैतन्य तो
आदि महंती सर्वत्र तू
लावण्य तो ,चैतन्य तो
आदि महंती सर्वत्र तू

विश्वेश्वरा,
विश्वेश्वरा ,धाव घे  करुणा करा ,
धाव घे  करुणा करा ,
सावळ्या प्रभु सुंदर ,धाव घे  करुणा करा
धाव घे  करुणा करा ,

धावती  दिल्या  किती  खोट घूमते
नवी  पताका नाचते ,खेळ मांडते
खेळ मांडते , खोट  घूमते
खेळ मांडते
धावती  दिल्या  किती  खोट घूमते
नवी  पताका नाचते ,खेळ मांडते

नामी तुझा रूपी तुझ्या
नामी तुझा रूपी तुझ्या
जनरंगती ,जगदीश्वरा  जगदीश्वरा धाव घे  करुणा करा ,
धाव घे  करुणा करा ,
सावळ्या प्रभु सुंदरा ,धाव घे  करुणा करा
धाव घे  करुणा करा





Singer -सुरेश वाडकर SURESH WADAKAR
Movie / Natak / Album -घराबाहेर  GHARABAHER

हा सागरी किनारा HA SAAGRI KINARA


हा सागरी किनारा, हा सागरी किनारा,
ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा,  ओला सुगंध वारा,

ओल्या मिठीत आहे ,हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा
हा सागरी किनारा,ओला सुगंध वारा,हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो  ,अंगावरी शहारा,अंगावरी शहारा
हा सागरी किनारा,ओला सुगंध वारा,हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा

मी कालचीच भोळी,मी आजचीच येडी ,इथेच वेगळी का ,आजचीच व गोडी
पाउल … ही पडावे
मी कालचीच भोळी,मी आजचीच वेडी ,इथेच वेगळी का रे,आजचीच व गोडी
पाउल … ही पडावे,पाउल … ही पडावे,

मन फुल घेई इशारा,ओल्या मिठीत येतो,अंगावरी शहारा
अंगावरी शहारा……   ओ… हा सागरी  किनारा

 होते  अजान तामी,ते छेडले तराने
 होते  अजान तामी,ते छेडले तराने
 स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाने
 हा रोम रोम जाळी ,हा रोम रोम जाळी
 दाटून गर्द सारा,ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा,रेशमी निवारा
 हा सागरी किनारा

बोलु मुके पनाने,होकार ओठ देती
नातीत ना मनांचे,ये एकरूप होती
एकात नात दोघ,फुलवून हा पीठारा
ओल्या मिठीत येतो,हा अंगावरी शहारा,अंगावरी शहारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा,हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा




Lyrics-जगदीश खेबुडकर  JAGDISH KHEBUDKAR
Music -विश्वनाथ मोरे VISHWNATH MORE
Singer -सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल  SURESH WADKAR,ANURADHA PAUDWAL
Movie / Natak / Album -असला नवरा नको ग बाई ASLA NAVRA NAKO G BAI 

स्पर्ष सांगेल सारी,Sparsha Sangel Sari

स्पर्ष सांगेल सारी कहाणी
शब्द बोलू नकोस आज राणी

संथ सागराच्या लाटा किनाऱ्यास येती
फेनफुले वाळुवरती अंथरून जाती
धुंद हृदयातुनी ही आर्त गाणी

हात गुंफिलेले हाती, फुले लाज गाली
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली
जन्मजन्मांतरीची ही विराणी

समजावुनी व्यथेला,Samajavuni Vyathela

समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली, निघून गेली
माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले ?

चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखेर माझे मज टाळता न आले !

शोधितो राधेला श्रीहरी,Shodhito Radhela Shrihari

शारद पुनवा, शांत चांदणे कालिंदीच्या तटी
गोपी जमल्या, रास रंगला कदंबतरूतळवटी

दिसेना सखी लाडकी परि
शोधितो राधेला श्रीहरी !

इथे पाहतो, तिथे पाहतो
मधेच थबकून उभा राहतो
बासरी मुकीच ओठांवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी
कशी ती वेळा टळली तरी
शोधितो राधेला श्रीहरी !

काय वाजले प्रिय ते पाउल
तो तर वारा तिची न चाहुल
भास हो फसवा वरचेवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

विठ्ठल आवडी प्रेमभावो,Vitthal Aavadi Prembhavo

विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥

तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥

म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥

नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥

विठुमाऊली तू माऊली जगाची,Vithu Mauli Tu Mauli Jagachi

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

वासनासुखाच्या रंगी,Vasana Sukhachya Rangi

वासनासुखाच्या रंगी रंगुनीया गेलो
तुझ्या किर्तनाच्या रंगा देवा अंतरलो

तुझे नाम ना घेता उभा जन्म गेला
पराजीत मानव तरीही अभिमान केला
तुझे रूप विसरुनी दूर दूर गेलो

प्रेमरस प्यालो अन्‌ द्रव्यलोभ केला
प्रपंचात गुंतुनिया जन्म घालविला
माझिया सुखाचा देवा मीच वैरी झालो

गांजता परंतु अंती आलो दर्शनाला
क्षमा तू उदारा आता करी पामराला
मुक्ती देई अथवा ना दे, तुझ्या दारी आलो

रुपे सुंदर सावळा,Rupe Sundar Savala

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥

रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥

गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥

एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

रुपे श्यामसुंदर निलोत्पल,Rupe ShyamSundar Nilotpal

रुपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा ।
सखीये स्वप्नी शोभा देखियेला ॥१॥

शंखचक्र गदा शोभती चहुकरी ।
सखीये गरुडावरी देखियेला ॥२॥

पितांबर कटी दिव्य चंदन उटी ।
सखीये जगजेठी देखियेला ॥३॥

विचारता मानसी नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी गेला ॥४॥

येथोनी आनंदू रे,Yethoni Aanandu Re

येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

महाराजाचे राऊळी ।
वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज झाली ।
प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनी नाम ।
पाहता मिळे आत्माराम ॥४॥



’मी मराठी’ वाहिनी गीत,Mi Marathi' Title Song

उत्तुंग भरारी घेऊ या !

उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश आहे अमुच्या आणि किर्ती ललाटी
मी मराठी ..... मी मराठी .....

अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
जिंकू आम्ही आव्हानांना देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....



मी एक तुला फूल दिले,Mi Ek Tula Phool Dile

मी एक तुला फूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता

त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता

हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता

का पान-फूल लज्जेने चूर जाहले
का सळसळत्या वाऱ्याचे नूपुर वाजले
त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता

बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता

माझ्या मना लागो छंद,Majhya Mana Lago Chhand

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥

गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥



मन हा मोगरा अर्पुनी,Man Ha Mogara Arpuni

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।
पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥

मन हे शेवंती देऊ भगवंती ।
पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥

मन हे तुळशी देऊ हृषिकेशि ।
पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥

तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा ।
तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥

मधु मीलनात या,Madhu Milanat Ya

मधु मीलनात । या । विलोपले ।
स्वरभाव काय विलोल हे ? ॥

सखि बोल जी हो कामना ।
करू सार्थ त्या सहयौवना ।
प्रणयान्विता । दे धन्यता ॥